Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

अश्याप्रकारे मुलांना शिकवा शब्दलेखन/शब्दोच्चार

अनेक पालक शब्दलेखन/शब्दोच्चार करण्यावर किंवा मुलांना ते शिकवण्यावर थोडेसे किंवा अजिबात महत्त्व देत नाहीत. परिणामतः मुले त्यांना वाटते त्याच पद्धतीने शब्द उच्चारतात, लिहितात आणि त्याच पद्धतीने तो शब्द त्यांच्या मनात राहतो. मुलांच्या विकास आणि संरचना यांच्यात बाधा न येता योग्य पद्धतीने होण्यासाठी मजबूत पाया बांधला जाणे महत्त्वाचे आहे असे आपण कायमच म्हणतो. शिक्षणाबाबतही हेच महत्त्वाचे आहे. सुरुवातीला हे थोडेसे त्रासदायक वाटते पण याचे दीर्घकालीन फायदे जरुर पहायला मिळतील.

शब्दलेखन/शब्दोच्चार हे थोडे अवघड आहे. अगदी प्रौढ व्यक्तीही काही शब्दलेखन/शब्दोच्चार करताना गोंधळून जातात आणि एखाद दुसऱ्या शब्दाचे लेखन/शब्दोच्चार करताना चुकतात. मुले शिकण्याच्या प्रक्रियेत गुंतलेली असतात आणि आधीपासूनच अनेक गोष्टी शिकत असतात, सामावून घेत असतात. त्यासाठी छोट्या सोप्या शब्दलेखन/शब्दोच्चार पासून सुरुवात करावी आणि मग मोठे, मध्यम अवघड शब्दलेखन/शब्दोच्चार शिकवावे.

मुलांना शब्दलेखन/शब्दोच्चार शिकवण्याचे काही मार्ग-

१. फ्लॅशकार्ड

कोणत्याही नव्या गोष्टी शिकण्यासाठी फ्लॅशकार्ड हे अत्यंत परिणामकारक ठरतात. दररोजच्या आयुष्यात जे शब्द वापरले जातात त्याची यादी करून त्यावर आधारिक फ्लॅशकार्ड तयार करु शकता. घरातील वस्तूंवर शब्द लिहून चिकटवल्यास मुले सतत ते पाहातील त्यामुळे शब्द कसा लिहितात हे त्यांच्या लक्षात राहणार आहे. उदा. पाण्याचा फिल्टरवर ‘पाणी’ लिहावे किंवा खुर्चीवर ‘खुर्ची’ असे लिहून ठेवावे.

२. उलटे करा, पहा, म्हणा, लिहा

या खेळासाठीही फ्लॅशकार्डचा वापर करु शकतो. सर्व फ्लॅशकार्ड जमिनीकडे तोंड करून पसरवून ठेवा आणि त्यातील एकेक कार्ड मुलांना उचलायला सांगावी. त्यावरील शब्द पाहून तो लक्षात आहे का नाही ते पहावे. त्यानंतर ते फ्लॅशकार्ड बाजूला ठेवावे. त्यानंतर तो शब्द काय होता ते मोठ्याने म्हणायला सांगावा आणि त्यानंतर तो योग्य पद्धतीने लिहायला सांगावा. प्रत्येक योग्य (उच्चार आणि लेखन ) शब्दासाठी एक गुण मिळवतील. आपले मूल किती चांगली कामगिरी करते ते पाहण्यासाठी हे गुण उपयोगी पडेल.

३. समान उच्चार आणि सारख्या शब्दांवर लक्ष्य ठेवा

ज्या शब्दांचे उच्चार सारखे आहेत अश्या शब्दांची आणि ज्यांचे शब्दलेखन थोडे फार सारखे आहे अशा शब्दांची यादी करावी. मुलांना एका वेळी एकसारख्या शब्दांचे लेखन शिकवा त्यामुळे मुले ते लवकर ग्रहण करती आणि त्यांना ते शिकण्यात रस वाटेल. शब्दांच्या लेखनात त्यांचे उच्चार किती निर्णायक असतात ते मुलांना समजावून सांगा. त्यांना शब्दलेखन व शब्दोच्चार यांची सांगड कशी घालावी हे देखील शिकवा. अशा वेळी सारख्या शब्दांची एक यादीच बनवा आणि मुलांना त्यातील एकसारखेपणा शोधायला सांगा आणि मुले तसे करू शकतात का याकडेही लक्ष द्या. उदा. हाय, साय, फाईट, टाईट, लाईट, माईट, नाईट इत्यादी. या शब्दांचे उच्चार सारखे आहेतच पण लेखनातही काही अक्षरे सारखी आहेत. (मराठी मध्ये - पाणी -लोणी, वारा - गारा, तारा, जर तर, तारे - वारे, योग्य - अयोग्य)

४.  वाक्ये तयार करा.

शब्दलेखन/शब्दोच्चार योग्य आणि अचूक किंवा बरोबर येणे जितके महत्त्वाचे तितकेच शब्दाचा वापरही माहिती झाला पाहिजे. जर शब्द कधी आणि केव्हा वापरायचा हे कळत नसेल तर त्यांना अर्धवटच ज्ञान मिळाले असे म्हणावे लागेल. त्यांना उदाहरणे देऊन शब्दाचे योग्य अर्थ त्यांना समजावून सांगा आणि त्यांना काही वाक्ये तयार करण्यास मदत करा. शब्दांचा योग्य वापर करता येण्यासाठी काही लघुकथा तयार करु शकता.

५. रेघोट्या ओढणे, गोंधळून जाणे

मुलांच्या खेळण्यांमध्ये याचा समावेश करा आणि त्यांना खेळताना शिकण्याचा आनंद घेऊ द्या. हा खेळ अधिक चांगला आणि रसभरीत करण्यासाठी मुलांच्या मित्रांसमवेत काही खेळ घेऊ शकता किंवा स्पर्धाही घेऊ शकता.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon