Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

सासूने हे प्रश्न सुनेला विचारू नये गैरसमज वाढतात

आजकाल सासुबाई आणि सुनेचे छान जमत असते. दोघी एकमेकींना छान प्रकारे समजून घेण्याचा प्रयन्त करतात परंतु काही अश्या गोष्टी असतात ज्या सासूबाई सुनेला विचारतात आणि मग एकमेकांविषयी गैरसमजांना सुरवात होते. सासूबाईंच्या बोलण्याचा उद्देश जरी चांगला असेल तरी हे प्रश्न कधी कधी टोमणे वाटू शकतात. नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. अश्या प्रकारे गैरसमज होऊन नात्यांमध्ये दुरावा येऊ नये असे वाटत असेल तर सासूबाईंनी हे प्रश्न सुनेला विचारणे टाळावे.

१ तू हे या पद्धतीनेच का करत नाही

प्रत्येकाची काम करण्याची किंवा एखादी गोष्ट करण्याची पद्धत वेगळी असते. आपल्या सुनेने एखादी गोष्ट आपण करतो त्याच पद्धतीनं करावी आणि ती न केल्यास तू हे असे का केले नाहीस असा प्रश्न विचारून तू हे याच पद्धतीनेच कर अशी जबरदस्ती करू नये. एखादं कां किंवा पदार्थ कसं करावा याचा सल्ला जर द्यावा पण ते काम तुम्ही सांगाल त्या पद्धतीनेच व्हावं असा जोर करू नये

२ तू तुझ्या बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाहीस का ?

तुम्हांला पालकत्वाचा दांडगा अनुभव असाल तरी तुमच्या सुनेचा हा पहिलाच अनुभव असतो. त्यामुळे ती आपल्या बाळाची काळजी घेण्याचा परोपरीने प्रयन्त करत असते. तीचे जर काही गोष्टीत चुकत असेल तर तील एकांतात ती गोष्ट शांतपणे समजून सांगा उगाच चार-चौघासमोर किंवा एकटे असताना तुला तुझ्या बाळाची काळजी घेता येत नाही का असे सतत बोलू नये. यामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. आणि बाळाची काळजी बाजूला राहून एकमेकांविषयी मने कलुषित होतात,

३ “तुला माहित नाही त्याला काय आवडते ते ?”

हा प्रश्न चुकून सुद्धा सुनेला विचारू नका, नवीन लग्न झाल्यावर ती आपल्या पतीच्या आवडी-निवडी विषयी हळू-हळू जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिला हा प्रश्न जिव्हारी लागण्याची शक्यता असते.तसेच तुमच्या प्रश्नाचा रोख चांगला जरी असला तरी या प्रश्नामुळे गैरसमज होऊ शकत असतात

४ "तुझं वजन जरा वाढलं आहे का ?"

हा प्रश्न जरी तुम्ही गंमतीने विचारला असला तरी लग्नानंतर वजन वाढल्यामुळे कदाचित सुनबाई हा प्रश्न गंभीरतेनं घेण्याची शक्यता असते. त्यामुळे असह्य प्रकारची गंमत मूड बघूनच करा किंवा करणे टाळा .

५ हे जेवण बाहेरून मागवलं आहे का ?

जर सुनेने एखादा पदार्थ खुप मेहनत घेऊन केला असेल आणि तुम्हांला माहित असेल कि हा पदार्थ सुनेनं केला आहे आणि तुम्हांला पदार्थ आवडला असले तर हा पदार्थ किंवा जेवण बाहेरून मागवले का म्हणजे एवढं चॅन तू कसा काय करू शकते असा त्याचा अर्थ निघू शकतो म्हणून हा प्रश्न टाळावा

६ “आज तू स्वयंपाक केलंस वाटतं ?”

सुनेने स्वयंपाक केल्यावर अशी टोमण्यासारखी टिपण्णी देण्यापेक्षा तिने केलेल्या प्रायत्नाचे कौतुक करा आणि नंतर काय कमीजास्त समजवून सांगा.

सासू आणि सून हे नाते असे आहे की यात दोघींनीएकमेकींना समजून घेण्याची गरजअसते. असे आहे की काही प्रश्न सासूने विचारू नये तसेच सुनेने देखील सासूबाईंनी विचारलेल्या प्रश्नामागचा उद्देश समजून घेण्याचा प्रयन्त करावा तरच हे नाते टिकू शकते अन्यथा तुमच्या दोघीच्या गैरसमजात कुटूंबाचे नुकसान होते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon