Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

हे असे बाळाचे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नका


नवजात बाळांचे विविध पोझ मधले गोंडस अनेक गोंडस फोटो आपण इंटरनेटवर बघत असतो. त्यात त्यांच्या  इतक्या गोंडस पोझ असतात ना कि कोणालाही आपल्या बाळाचे असे फोटो काढण्याचा मोह आवरला जाणार नाही. पण हे फोटो प्रशिक्षित आणि जाणकार फोटोग्राफर काढून काढून घेतलेले असतात अनेक फोटो विविध प्रकारे एडिट केलेले असतात. त्यामुळे असे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नये त्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता असते. आम्ही तुम्हांला  अश्या ५ पोझ सांगणार आहोत ज्या कोणत्याही जाणकारांच्या मदतीशिवाय काढणे कसे धोकादायक ठरू शकते. आणि हे फोटो काढताना कश्या युक्त्या वापरण्यात आल्या आहेत. ज्या जाणकारांच्या मदतीशिवाय करणे धोकादायक ठरू शकेल 

१. हाताची घडी घातलेलं बाळ

  

नवजात बाळाचे डोके हे जाड असते आणि त्याला ते सांभाळण्या  इतपत त्या बाळाच्या स्नायूंची वाढ झालेली नसते. त्यामुळे यप्रकाराचा फोटो काढताना बाळाच्या डोक्याला आधार देण्यात येतो आणि नंतर फोटोशॉपद्वारे किंवा विविध तंत्राद्वारे फोटो एडिट करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही जर असा फोटो घरी काढण्याचा प्रयन्त  केल्यास बाळाच्या मानेला आणि डोक्याला इजा पोहचण्याची शक्यता असते.

२. झोपाळ्यावरचा फोटो 

बाळ या फोटोमध्ये कसले गोंडस आणि सुंदर दिसत आहे. चॅन गुरफटून झोपाळ्यात झोपले आहे. पण खरं हा फोटो दोन वेगवेगळ्या फोटोचा मिळून बनला आहे. कसा ते आपण फोटो मध्ये पाहणार आहोत. असा फोटो जर आपण  बाळाला झोपल्यात झोपवून  काढायचा प्रयन्त केल्यास बाळाला इजा पोहचू शकते

३. हातावर हनुवटी ठेऊन 

हा इंटरनेटवर बऱ्याचदा आढळून येणारा  फोटो आहे. यात बाळ आपल्या हातावर हनुवटी ठेऊन बसली दिसते पण खरंतर हे बाळ  स्वतःच्या हातावर आपल्या मानेचे वजन उचलू शकेल इतकी क्षमता त्याच्या मध्ये नसते. म्हणून त्याचा असा फोटो काढताना फोटोग्राफरने आधी बाळाच्या डोक्याला हाताने आधार देऊन फोटो काढला आणि नंतर तो एडिट केला त्यामुळे असा फोटो मिळाला पण या करता बाळाला इजा न होता त्याचा मानेल आधार कसा द्यायचा हा अंदाज जाणकार फोटोग्राफर ला असतो आपण असा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना काही इजा होऊ शकते. त्यामुळे जाणकारच्या मदतीनेच असे फोटो काढणे योग्य ठरेल. 

४. सरळ बसलेले बाळ 

नवजात बाळ हे आपल्या डोक्याचे तसेच स्वतःचे वजन सांभाळून सरळ बसायला असमर्थ असते. त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज असते अश्या आधारानेच या बाळाचा असा फोटो घेतला आहे. आणि नंतर फोटोशॉप करण्यात आला. 

५. फोटोसाठी इतर वस्तूंचा वापर करणे. 

बाळाचे गिटारवर बसलेला, झाडावरचा एखाद्या घरट्यातला असे अनेक फोटो विविध वस्तूंच्या आधारे किंवा फोटोशॉपने तयार करण्यात आलेले अनेक फोटोआपण इंटरनेटवर बघतो.  पण असे फोटो कसे काढण्यात येतात यांबद्दल आपल्याला खरंच माहिती असते का ? बऱ्याच वेळा हे फोटो एडिट करून किंवा दुसरे फोटो एकत्र करून बनवलेले असतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon