Link copied!
Sign in / Sign up
54
Shares

नैसर्गिकरित्या केस रंगवायचे आहेत ? हे वाचा


आधुनिक व तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढत आहे अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे अकाली पांढरे झालेले केस रंगवण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण यामुळे केस रंगवल्यावर रंग फार दिवस राहत नाही आणि सतत केस केमिकलयुक्त रंगाने रंगवले तर केस अजून पांढरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांना रंग तर येईलच आणि काही दुष्परिणाम देखील होणार नाहीत

१. लालसर किंवा चॉकलेटी केसांसाठी

मेहंदी केसांवर लावल्यास,ते लाल किंवा चॉकलेटी रंगाचे होतात. जर तुम्हाला केसांना लालसर रंग हवा असेल तर मेहंदीमध्ये बीटाचा रस मिसळून ती पेस्ट केसांवर लावा. जर तुम्हाला केस तांबूस रंगांनी रंगवायचे असल्यास, मेहंदी भिजवताना, लिंबाचा रस व दही यांचे एकत्र मिश्रण करून त्यात थोडा चहाचा अर्क टाकून केसांना लावा.आणि केस पांढरे झाले असल्यास मेहंदी भिजवताना पावडरमध्ये थोडे तीळाचे तेल व कढीपत्ता एकत्र करून लावल्यास फायदा होतो.

२. चॉकलेटी रंगच्या छटा 

मेहंदी व नीळ एकत्र केल्याने तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या विविध छटा मिळू शकतात. जर तुम्हाला केस लालसर रंगात हवे असल्यास हीना पावडरचे प्रमाण अधिक ठेवा. तर चॉकलेटी अधिक प्रमाणात करायचे असल्यास नीळ अधिक टाका.(नीळ केमिकलफ्री असेल याची खात्री करून घ्या.)

हीना केसांना लाल रंग देते तर नीळ टाकल्याने केसांना निळा रंग मिळू शकतो. मात्र हीना व नीळ एकत्र केल्याने तुम्हाला चॉकलेटी रंगाच्या विविध छटा मिळू शकतात. जर तुम्हाला केस लालसर रंगात हवे असल्यास हीना पावडरचे प्रमाण अधिक ठेवा. तर चॉकलेटी अधिक प्रमाणात करायचे असल्यास नीळ अधिक टाका.

अक्रोडाची टणक कवचं केसांना गडद चॉकलेटी रंग देण्यास मदत करतात. अक्रोडाची कवचं पाण्यात टाकून अर्धा तास उकळा. ते पाणी थंड होऊ द्या. नंतर केसांच्या ज्या भागावर रंग द्यायचा आहे. तेथे कापसाच्या बोळ्याने हे पाणी लावा. तासभर केस असेच राहू द्या. त्यानंतर केस सौम्य शाम्पू व पाण्याने धुवा. हा रंग कपडे आणि भांड्याना लागण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्या.

३. तपकिरी रंगासाठी

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस तपकिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते गरम पाण्यात मिक्स करून त्याचा वापर करा.

कॉफी पाण्यात उकळून ते मिश्रण केसांना लावल्यास गडद तपकिरी रंग मिळेल. यासाठी चहा किंवा कॉफीच्या पाण्यात केस बुडवून ठेवा. कॉफी डाय बनवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॉफी काही हेअर कंडीशनरसोबत मिक्स करा व केसांना लावा.

मेहंदी,कढीपत्ता डाय कृती

थोडे तिळाचे तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने टाकून तेल हवाबंद ड्ब्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला केस रंगवायचे असतील तेव्हा त्यात मेहंदी पावडर पावडर टाकून काही मिनिटांसाठी तेल गरम करून घ्या. मिश्रण थंड होईपर्यंत थांबा व त्यानंतर पेस्ट केसांवर किमान 3-4 तास राहू द्या.त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवून टाका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon