Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

असे करा पेरूचे सरबत

उन्हाळा सुरु आहे आणि या कळत तशी भूक कमीच लागते. काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र तहान फार लागते. अशावेळी कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा मोह आवरता येत नाही. पण कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यावर थोडा वेळ ठीक वाटते. परंतु,ते आरोग्यसाठी हानिकारकच असतं ,तसेच काहीतरी वेगळ्या चवीचे देखील हवे असते आपण अनेक प्रकारची सरबते आणि तयार करत असतो आणि पीत असतो आज आम्ही तुम्हांला  एक वेगळ्या प्रकारचे सरबत कसे बनवावे ते सांगणार आहोत. 

साहित्य 

एक मोठा पिकलेला पेरू

दोन मोठे चमचे साखर

अर्धा इंच आल्याचा तुकडा किंवा रस 

चिमूटभर मीठ

अर्धा चमचा लिंबाचा रस

एक ते दीड कप पाणी  थंड पाणी

कृती 

पिकलेला पेरु धुवून व साले काढून फोडी करून घ्या.मिक्सरच्या ज्यूसरच्या भांड्यात या पेरूच्या फोडी,आल्याचे बारीक केलेले तुकडे,चिमूटभर मीठ,अर्धा चमचा लिंबाचा रस व एक कप गार पाणी घालून मिक्सर मधून ब्लेंङ करून घ्या आणि नंतर गाळण्याने गाळून घ्या आणि सर्व्ह  करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon