Link copied!
Sign in / Sign up
41
Shares

बाहेर महागडे पेडिक्युअर करण्यापेक्षा या प्रकारे घरच्या-घरी पेडिक्युअर करा.

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्री आणि हल्ली पुरुषही प्रयत्नशील असतात. चेहऱ्याचे सौदर्य जपण्यासाठी व्यक्ती अनेकदा फेशिअल, ब्लीच नि मेकअप करतात. मात्र चेहऱ्याच्या तुलनेत दुर्लक्षित असतात ते पाय. सौदर्यात पायांची काळजीही घेतली पाहिजे. बऱ्याचदा चेहरा खूप सुंदर दिसत असला तरी पाय मात्र अगदीच वाईट, भेगाळलेले, कोरडे दिसतात. मुळातच पायाची त्वचा जाड असते आणि कोरडी असते. वास्तविक त्वचेखाली सीबम तयार होतच असते आणि ते त्वचेवर येते. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना चेहऱ्यावर येणाऱ्या तेलामुळे लगेचच कळून येते. पण पायाची त्वचा जाड असल्याने त्वचेखाली तयार झालेले सीबम पायाच्या त्वचेच्या बाहेरपर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी पायाला नैसर्गिक तेल मिळत नाही. म्हणूनच पायांची नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पेडिक्युअर कशासाठी-

पायांची काळजी घेण्यामध्ये पेडिक्युअर हा उत्तम इलाज आहे. धावपळीच्या जगात बहुतेक जण कामाच्या मागे पळत असतो. त्यामुळे पेडिक्युअर केल्यास पायांची निगा राखली जातेच शिवाय आरामही मिळतो. ऑफिसमध्ये १० - १० तास पायात पादत्राणे किंवा बूट असतात. त्यामुळे वेळ असल्यास स्पा मध्ये जाऊन पेडिक्युअर करु शकता किंवा घरी देखील पेडिक्युअर करु शकता.

पेडिक्युअर साठी साहित्य-

छोटा टब, कोमट पाणी, शॅम्पू, हायड्रोजन पेरॉक्साईड, नेलपॉलिश रिमूव्हर, नेलकटर, ऑरेंज स्टीक, क्युटीकल पुशर, नेल फायलर, प्युमिक स्टोन, कोल्ड क्रीम, कापूस आणि नॅपकिन

कसे करावे पेडिक्युअर-

नेलपेंट काढा-

पायाला असणारे जुने नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करा. शक्य असल्यास पायाला क्लिन्झिंग मिल्कने स्वच्छ करुन घ्यावे.

पाण्यात पाय बुडवा-

छोट्या टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शॅम्पू मिसळावा आणि एक चमचा हायड्रोजन पॅराक्साईड टाकून मिक्स करा. किंवा कोमट पाण्यात ३ चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. या पाण्यात ५-१० मिनिटे पाय भिजवून ठेवा.

नखांना आकार-

आता पायाची नखे मऊ झालेली असतील त्यामुळे नखे कापून त्यांना चौकोनी किंवा गोलाकार द्यावा. तसेच ऑरेंज स्टीकवर कापूस लावून नखांच्या आतील घाण साफ करावी.

क्युटिकल-

पायाच्या बाजूने असणारी राठ त्वचा आता मऊ झाली असेल ती देखील काढून टाकावी.

एक्सफॉलिएट-

पाय पाण्यातून बाहेर काढून कोरडे करुन घ्यावेत. प्रत्येक नखाच्या शेवटी क्युटिकल क्रीम लावावे आणि काही मिनिटांसाठी तसेच ठेवावे. पायाची मृत त्वचा ओलसर झालेली असते प्युमिक स्टोन ने पाय घासावेत. त्यामुळे पायाची त्वचा नरम होण्यास मदत होते. यासाठी फूट स्क्रबही वापरू शकता. त्यानंतर क्युटिकल क्रीम पुसून टाकून क्युटिकल्स मागे ढकलावीत.

मॉश्चरायझर-

पायाची मृत त्वचा काढून टाकल्यानंतर आता वेळ आहे ती मसाज करण्याची. स्वच्छ पाण्याने पाय धुवून कोरडे करा. आता मॉश्चरायझर लावून पायाला छान मसाज करावा. त्यामुळे त्वचा मऊ होते आणि पायाला भेगाही पडत नाहीत. पायाला क्रीम लावले जात नाहीच त्यामुळे व्यवस्थित क्रीम लावून मसाज करावा. तळपाय, पोटरी पर्यंत मसाज करावा त्यामुळे नसांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते शिवाय त्वचा आणि पायाच्या स्नायूंचे पोषण होते. त्यानंतर उरलेले क्रीम कापसाने पुसून घ्यावे.

नेलपॉलिश-

आता शेवटचा भाग म्हणजे नेलपॉलिश लावणे. नखांवर सुरुवातील बेस कोट किंवा ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावावे. त्यानंतर मनपसंत रंगाचे नेलपॉलिश लावावे. नखाच्या बाहेर न येऊ देता कुशलतेने लावावे. त्यानंतर वीस मिनिटे तरी नेलपॉलिश व्यवस्थित सुकु द्यावे.

पेडिक्युअर म्हणजे पायांची काळजी घेणे असेच खरेतर अभिप्रेत आहे. जितके लक्ष आपण चेहरा आणि हाताकडे देतो तसेच थोडीशी काळजी पायांची घ्यावी. पेडिक्युअर नंतर शक्यतो पायात मोजे घालावेत जेणेकरून पायाला धूळ, माती लागणार नाही. अशा प्रकारची काळजी घेतली तर पाय सतत बुटांमध्ये झाकून ठेवावे लागणार नाहीत आणि वेगवेगळ्या प्रकारची पादत्राण़ेही घालता येतील. मुख्य म्हणजे पायांना भेगा पडण्याचे प्रमाणही कमी होते. घरच्या घरी २० ते ३० मिनिटांत पेडिक्युअर करा आणि पायांची निगा राखा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon