Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

असे बनवा व्हेजिटेबल कबाब

आपण बाहेर जेवायला गेल्यावर कबाब खातो किंवा कबाब बद्दल बरंच ऐकलं असतं पण हे कबाब घरी कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. खालील साहित्य साधारण ३ ते ४ प्रौढ व्यक्तीसाठीचे आहे. 

साहित्य
भाज्या

१. ३ उकडलेले बटाटे

२. १ मोठे गाजर, किसलेले

३. फरसबी १० शेंगा, बारीक चिरून

४. एक छोटी भोपळी मिरची बारीक चिरलेली

५. १/४ कप मटार, उकडलेले,

६. १/४ कप स्वीट कॉर्न

७. थोडीशी बारीक चिरलेली कोथींबीर

इतर साहित्य

१. कॉर्न पावडर

२. २ टीस्पून आलेलसूण पेस्ट

३.१ चमचा गरम मसाला किंवा आवडीचा मसाला

४. १ चमचा लाल तिखट

५. चवीपुरते मीठ

६. कबाब शेकण्यासाठी थोडेसं तेल

७. ४ ते ५ स्क्युअर्स (स्टिक)

कृती

१. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात १ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर त्यात फरसबी आणि गाजर घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे.

२.एका लहान वाटीत कॉर्न पावडर आणि २ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. निट मिक्स करून पॅन वर झाकण ठेवावे. काही मिनिटे शिजू द्यावे.

३. नंतर मीठ, मटार आणि स्वीट कॉर्न घालावे. ३-४ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.

४. बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. यामध्ये शिजवलेले भाज्यांचे मिश्रण घालावे. हे मिश्रण ४ ते ५ समान भाग करावे.

५. मिश्रणाचा एक मध्यम गोळा घ्यावा. स्क्युअरच्या स्टिकच्या भोवती घट्ट दाबून लावावा. कबाब तयार करावेत. प्रत्येक कबाबवर तेल लावावे.

६. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल लावावे. मध्यम आचेवर कबाब भाजून घ्यावे. दर २-३ मिनीटांनी कबाब थोडे फिरवावेत. अशाप्रकारे सर्व बाजूनी कबाब खरपूस भाजून घ्यावे.कबाब गरमागरम सर्व्ह करावे, सर्व्ह करताना थोडे लिंबू पिळावे. चव 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon