Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

असा करा दुग्धवर्धक गव्हाचा / कणकेचा शिरा

बाळासाठीचा असणारा पोषक आहार म्हणजे स्तनपान या स्तनपानासाठी योग्य प्रमाणत आणि पोषक असं दूध बाळाला मिळावे या करता हा गव्हाचा शिरा आहारात घेतल्यास नक्कीच फायदा होईल.

साहित्य

१. अर्धा कप कोंड्यासकट कणिक साधारण- ५० ते ६० ग्राम

२. ३० ग्राम किसलेला गूळ

३. थोडासा सुकामेवा

४. २ ग्राम साजूक तूप

५. आवश्यकतेनुसार वेलची पावडर

कृती

१. दोन कप पाण्यात गूळ टाकून घट्ट होई पर्यंत उकळवा.

२. कढईत एक चमचा तूप गरम करून सुकामेवा परतून घ्या.

३. सुकामेवा परतून झाल्यावर एक चमचा तूप टाकून कणिक भाजून घ्या.

४. नंतर कणकेत गुळाचा पाक घाला आणि नंतर सुकामेवा घाला आणि वेलची पावडर घाला आणि शिरा घट्टसर होई पर्यंत परता

टीप - गरोदरपणात हा शिरा खाण्यास हरकत नाही प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon