Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

ह्या जिद्दी आणि अपंग असूनही एव्हरेस्ट सर केलेल्या मुलीचे लग्न झाले....कोण आहे ती जिद्दी मुलगी

 स्त्री एवढी जिद्दी कोणीच नसेल. तेव्हा ही स्टोरी सुद्धा एका स्त्रीची आहे. “तिने प्रतिकार केला म्हणून चोरटय़ांना तिच्या गळ्यातली साखळी चोरता आली नाही परिणामवश त्यांनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. समोरून येणाऱ्या ट्रेनने तिच्या पायाचा लचका तोडला. कृत्रिम पाय आणि कंबरेचं दुखणं तिचे सोबती झाले. त्याही अवस्थेत तिने एव्हरेस्ट चढून जाण्याचा विक्रम केला. मध्येच ऑक्सिजन संपलं. कृत्रिम पाय निखळला, तरीही ती जिवंत राहिली कारण समाजासाठी तिच्या हातून अनेक गोष्टी घडणं बाकी होतं. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, ‘पद्मश्री’ प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.

११एप्रिल २०११. लखनौ रेल्वे स्थानकावर नेहमीचीच गर्दी! दिल्लीला जाण्यासाठी अरुणिमा पद्मावती एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेनने वेग घेतला आणि चार-पाच रासवट तरुणांनी अचानक अरुणिमाचे सामान आणि गळ्यातली सोनसाखळी हिसकावण्याच्या हेतूने तिच्याशी झटापट सुरू केली. मुळातच क्रीडापटू असणाऱ्या तिनेही प्रतिकार सुरू केला. पण ती एकटी होती. ती दाद देत नाही असे लक्षात येताच त्या गुंडांचा अहंकार दुखावला. अपमानाने आणि संतापाने पेटून उठलेल्या त्या चार-पाच गुंडांनी तिला खेचत दरवाज्यापर्यंत आणले आणि चालत्या ट्रेनमधून तिला बाहेर फेकून दिले.

      ती सात तास तशीच ट्रॅकवर पडून होती. या घटनेत तिने आपला एक पाय गमावला आणि कंबरेच्या हाडाचे दुखणे कायमचे मागे लागले. पण तिची गोष्ट इथेच संपत नाही. तिने त्या कमतरतेवर मात केली. जिद्द आणि धाडसाच्या जोरावर ‘एव्हरेस्ट’ चढली.

अरुणिमाच्या तोंडून तिची हकीकत ऐकताना मन संतापाने पेटून उठते, विषण्णतेने झाकोळून जाते पण जसजशी तिची कहाणी पुढे सरकत जाते तसतसे तिच्याविषयी आश्चर्य, कौतुक आणि आदराचीच भावना मनात भरून राहते.

अरुणिमा सिन्हा! सांगते की,

आजही ‘त्या’ घटनेविषयी सांगताना तिचा आवाज कापतो, हुंदके दाटतात. ‘‘आईने माझ्यासाठी कौतुकाने बनवून घेतलेली सोनसाखळी सतत माझ्या गळ्यात असायची. प्रवासादरम्यान ती काढून ठेवावी हे मला सुचले नाही. माझ्या बोगीत असलेल्या काही भामटय़ांची नजर त्या साखळीवर पडली आणि त्यातल्या एकाने ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मी खेळाडू वृत्तीची आहे. सहजासहजी हार मानणे माझ्या रक्तात नाही. मी प्रतिकार सुरू केला. असेल नसेल त्या शक्तिनिशी मी त्यांना ठोसे, लाथा-बुक्क्यांचा चोप देऊ लागले. एक मुलगी आपल्याला आव्हान देते आहे हे त्यांच्या पुरुषी, पाशवी वृत्तीला मानवले नाही. त्यांनीही मला तेवढय़ाच क्रूरपणे मारहाण सुरू केली. अत्यंत दुर्दैवाची पण सत्य गोष्ट अशी की, बोगीतील इतर प्रवासी या सर्व प्रकारांकडे नुसतेच भेकडासारखे बघत राहिले. एकही जण माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही.’’

त्यांनी मला खेचत खेचत दरवाज्यापाशी आणले आणि. ट्रेनमधून निदर्यपणे खाली फेकून दिले. मी दाणकन दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये जोराने आदळले. माझा पायातून आणि कंबरेतून प्राणांतिक कळा निघत होत्या. माझे हाडबिड मोडले की काय? मी असा विचारच करते आहे तो दुरून एक ट्रेन मला वेगाने येताना दिसली. माझा एक पाय नेमका त्याच ट्रॅकवर पडला होता. मी जिवाच्या कराराने पाय बाजूला घेण्याचा, तिथून उठण्याचा प्रयत्न करीत होते. पाय बाजूला सरकवणे तर दूरच पण माझी कंबर जराही उचलली गेली नाही. वेदनेचे आणखी एक मोहोळ उठले आणि त्यांच्या डंखांनी विदग्ध असतानाच ती ट्रेन धडधडत माझ्या पायावरून निघून गेली..’’

रात्र असल्यामुळे अरुणिमा तशा अवस्थेत सात तास रेल्वे ट्रॅकवर पडून राहिली. आपल्या अर्धवट तुटलेल्या पायाचे लचके मोठमोठाल्या घुशी तोडत आहेत आणि ते असहाय्यपणे बघत राहावं लागलं.

माझ्या मनात एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर चढून जाण्याची आस लागून राहिली. माझी एकूण शारीरिक अवस्था पाहता हा निव्वळ वेडेपणा होता. मला अनेकांनी तसे सुनावलेदेखील, पण माझी आई, भाऊ, बहीण आणि जिजाजी यांनी सदैव माझ्या इच्छा-आकांक्षांना उचित आदर दिला आहे. त्यांच्या प्रोत्साहनानेच मी माऊंटेनिअिरगच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवलं.’’

आणि नंतर सर्वानाच ठाऊक आहे की, तिने नंतर एव्हरेस्ट शिखर सर केले आणि इतिहास लिहून ठेवला की, अपंग स्त्रीने हा पराक्रम केला. नियतीच्या क्रूर तडाख्यांना तितक्याच समर्थपणे टोलवून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अरुणिमा सिन्हा.

दुर्दैवाचे इतके क्रूर वार झेलूनही कुठेही विचलित न झालेली तिची दुर्दम्य जीवननिष्ठा, आपले जीवन सार्थकी लावण्याची तिची ऊर्मी आणि याच दुर्दैवाच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघालेलं हे निखळ, बावन्नकशी व्यक्तित्व! अरुणिमाच्या धैर्याला, तपश्चय्रेला आणि शौर्याला सलाम ! जर तुमची स्वतःची खूप जिद्धीची कथा आहे. आणि संघर्ष हा संघर्ष असतो तो मोठा लहान नसतो. म्हणून तुमचा सुद्धा संघर्ष आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तो इतर स्त्री पर्यंत पोहोचवू जेणेकरून त्यांनाही आत्मविश्वास मिळेल. त्यासंबंधी तुम्ही आमच्या tinystep मराठी च्या फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये मॅसेज टाकून द्या.

साभार - शर्वरी जोशी (लोकसता) 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon