Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

ह्या कडक उन्हाळ्यात ह्या गोष्टी घ्याच !

 

बदलत्या तापमानामुळे उन्हाळा हल्ली फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरु होताना दिसतो. त्यानंतर तो वाढतच जातो. मग ओघाने उन्हाळ्यामुळे होणारे शारिरीक त्रासही सुरु होतात. पोटात आग होणे, उन्हाळी लागणे, घामोळे, पुरळ येणे. त्याव्यतिरिक्त चक्कर येणे, अतिघामामुळे शरीरातील पाणी कमी होणे, घशाला कोरड पडणे या परिणामांमुळे शक्तीपात झाल्यासारखे वाटते. शरीरातील पाणी घामावाटे निघून गेल्याने सतत पाणी पिण्याची इच्छा होते.

 

उन्हाळ्याच्या काळात मोठ्यांबरोबर लहानग्यांनाही उन्हाचा खूप त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांना त्यांना सोसवतील अशी सरबते थोड्या थोड्या प्रमाणात जरुर द्यावीत. काही नैसर्गिक गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरतील.

नारळाचे पाणी

मधुर, पचायला हलके, भूक वाढवणारे, लघवीला साफ करणारे, तहान शमवणारे, शरीराला ताकद देणारे असते. पित्त-वात कमी करणारे.

उसाचा रस

पचायला जड पण प्रकृतीने थंड, लघवीचे प्रमाण वाढवणारा, गोड, पित्त - वात कमी करतो पण कफवृद्धी करतो. शरीराची वाढ होण्यास उपयुक्त.

निरा

ताड, खजूर अशा झाडांपासून तयार होणारा नैसर्गिक रस. थंड प्रकृतीची, पोषक निरा फायदेशीर असते. मात्र ही निरा संध्याकाळच्या आतच घ्यावी. अन्यथा ती आंबू लागते.

या व्यतिरिक्त फळांचे रसही घेता येतात. मात्र जेवणानंतर फळांचे रस घेऊ नयेत कारण फळे पचायला जड असतात. खूप भूक लागलेली असताना आणि ताजे बनवलेले रस प्यावे. डाळीब, कqलगड, अननस, चिकू, आंबा ह्या फळांचे रस प्यावेत. पपई, आंबट संत्री, मोसंबी यांचे रस टाळावेत. रसामध्ये वेलची, साखर मिरीपूड घालून प्यावे.

या व्यतिरिक्त काही घरगुती पेये देखील आ़रोग्यास हितकारक असतात. कोणती पेये आपण सहज घरच्या घरी बनवू शकतो पाहूया.

लाह्यांचे पाणी

साळीच्या म्हणजेच भाताच्या लाह्या उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ तशाच ठेवून त्या कुस्करुन गाळून त्या पाण्यात मीठ आणि साखर घालून प्यावे. त्यामुळे तहान भागते, भूक वाढते आणि पचन सुलभ होण्यास मदत होते. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कोणत्याही ऋतुत हे पाणी उत्तम असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि नाजूक प्रकृतीच्या लोकांना हे पाणी जरुर द्यावे.

धन्याजिऱ्याचे पाणी

थंड पाण्यात जिरे, धणे घालून ते पाणी उकळावे. रात्रभर गार होऊ द्यावे. सकाळी दिवसभरात थोडे थोडे पाणी प्यावे. त्यामुळे पित्त कमी होते, उष्णता कमी होते आणि जिभेला चव येते.

काळ्या मनुकांचे पाणी

काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालाव्यात. मनुका त्यात कुस्कराव्यात आणि ते पाणी गाळून प्यावे. किंवा मनुका काढून त्या चावून खाव्यात आणि पाणी गाळून प्यावे. यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही, पोटात होणारी आग कमी होते. मात्र हे पाणी प्रमाणात सेवन करावे कारण ते पचण्यास जड असते.

जलजिरा

उन्हाळ्यात थंडावा देणारे पेय म्हणून याकडे पाहता येईल. हल्ली बाजारात जलजिरा तयार स्वरुपात मिळते. तसेच हातगाड्यांवरही उन्हाळ्याच्या दिवसात विक्रीला येताना दिसते. मात्र हे पेय घरी सहजपणे बनवता येते. त्या पेयाचे विविध फायदे असतात. जिरे पूड, सैंधव मीठ, पुदीना, आमचूर पावडर घटक या पेयासाठी लागतात. आवडीप्रमाणे या पदार्थांचे प्रमाण कमी जास्त करुन जलजिरा तयार केले जाते. पाण्यात हे पदार्थ चवीनुसार मिसळून जलजिरा तयार केले जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतोच परंतू शरीरातील उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता या तक्रारींपासून सुटका होते. तसेच अति उन्हाळ्यामुळे भूक न लागणे या तक्रारीवर हा उत्तम उपाय आहे.

लिंबू सरबत-

उन्हाळ्यातील नैसर्गिक पेय म्हणून याच्याकडे पाहू शकतो. थंड पाण्यात लिंबू, मीठ आणि साखर घालून लिंबाचे सरबत प्यायल्यास उन्हाने होणाèया काहिलीत जीव सुखावतो. शिवाय पित्तही शमते.

कोकम सरबत-

उन्हाळ्यात वापरावा असा पदार्थ म्हणजे कोकम. पित्तशामक, भूक प्रदीप्त करणारे हे एक फळ. त्यामुळे् उन्हाळ्यात होणारा दाह कमी होतो. कोकमाचा वापर भाजीत, आमटीत केला जातोच. परंतू त्याचा सर्वाधिक वापर केला जातो ते सरबतासाठी. कोकमाचे सरबत पित्ताची तक्रार कमी करते. बाजारात याचे तयार सरबत मिळते ते साखरयुक्त असते. त्याव्यतिरिक्त कोकम आगळ मिळते त्याचेही सरबत बनवता येते. थंड पाण्यात चवीप्रमाणे कोकम आगळ, साखर, वेलची घालावी ढवळले की सरबत तयार.

कैरीचे पन्हे-

उन्हाळ्यातील राजा फळाचे हे कच्चे रुप नक्कीच प्रत्येकाला आवडते. कैरी चवीला आंबट असली तरीही कैरीचे पन्हे आरोग्यासाठी उत्तमच असते. कैरी उकडून तिचे साल काढून तिचा गर काढावा. त्यात आवडीप्रमाणे वेलची, साखर किंवा गुळ घालून ते मिक्स करावे. आता त्यात जरुरीप्रमाणे पाणी घालून त्याचे पन्हे करावे. आवडत असल्यास केशराच्या काही काड्या घालाव्या. कैरीचे पन्हे पित्तशामक असते आणि अन्नपचन करण्यास मदत करते.

बडिशेपेचे पाणी

जेवण झाल्यानंतर बडिशेप बहुतेकजण खातात. त्यामुळे पचन सुधारते, गॅसेस होत नाहीत. उन्हाळ्यात नुसती बडिशेप खाण्यापेक्षा बडिशेपेचे सरबत बनवून ठेवणे फायद्याचे ठरते. हे एक उत्तम कुलंट आहे. पाचक रस स्रवतात आणि पित्त कमी होते त्यामुळे बडिशेपेचे सेवन किंवा सरबताचे सेवन प्रभावी ठरते.

बडिशेपाचे दाणे भाजून ते पाण्यात उकळवा. रात्रभ़र ते पाण्यातच राहू द्या. दुसèया दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यावे. लहान मुलांना हे सरबत देताना त्यात थोडी सा़खर किंवा मध घालून द्यावे. मुलांच्या दृष्टीने ते आरोग्यदायी ठरते.

पुदीन्याचे पाणी

पुदीना हा प्रकृतीने थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात होणारा दाह कमी क़रण्यास मदत होते. पुदीन्याचे पाणी करण्यासाठी एका बाटलीत पाणी घेऊन त्यात पुदीन्याची ८-१० पाने हाताने चुरुन घालावी. थंड हवे असल्यास पाणी फ्रीजमध्ये ठेवावे. या पाण्यात साखर घालण्याचीही आवश्यकता नाही. दिवसभरात थोडे थोडे पाणी प्यावे.

आंब्याचे सरबत

पिकलेल्या आब्यांचा रस काढावा. पाणी अजिबात घालू नये. असा रस दोन वाट्या, एक वाटी साखरेचा पक्का पाक करावा तो जरा थंड झाला की त्यात आंब्याचा रस जाड चाळणीने गाळून घालावा. मग पाव चमचा सायट्रिक अ‍ॅसिड, पाव चमचा पोटॅशिअम मेटा बाय सल्फेट घालावे. सर्व ढवळून काचेच्या बरणीत भरुन ठेवावे. वर्षभरही हे सरबत टिकते. सरबत करताना त्यात चवीला मीठ घालावे, पुरेसे पाणी घालून ढवळून हवा असल्यास बर्फ घालून द्यावे.

वाळ्याचे सरबत

यामध्ये उष्णता शोषून घेण्याची ताकद असते तसेच प्रकृतीने थंड, मुत्रप्रवृत्ती करणारे आहे. त्यामुळे उन्हाळी लागली असल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर प्यायल्यास आराम मिळतो. वाळ्याचे सरबती थंडावा देणारे आहे. त्यासाठी पाणी उकळून घ्यावे त्यात वाळा आणि चंदन पावडर घालावी आणि ते झाकून ठेवावे. दोन तासांनी मिश्रण ढवळून गाळून घेऊन मोजावे. पाणी आणि साखर एकत्र उकळून घ्यावे. या पाण्याला फेस येईल तो शांत झाला की गॅस बंद करावा आणि त्यात चंदन वाळ्याचे मिश्रण त्यात चांगले ढवळावे. 

उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी ही सरबते आहेतच शिवाय लस्सी, थंड दूधही पिऊ शकतो. वाढत्या प्रदुषणाच्या काळात घरच्या घरी केलेली सरबते नक्कीच आरोग्यदायी आणि उन्हाळ्यातही शीतलता देणारी असतील.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon