Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

पोट दुखत आहे..मग अपेंडिक्सच की नॉर्मल ? जाणून घ्याच....म्हणजे भीती राहणार नाही

 

 

     अ‍ॅपेडिंक्स हा मोठ्या आतड्याजवळ असणारा छोटासा अवयव आहे. त्या मराठी आंत्रपुच्छ असे म्हणतात. हा अवयव लहान आणि तुलनेने निरूपयोगी असतो. मात्र संसर्ग झाल्यास मात्र हा अवयव खूप त्रासदायक ठरतो. आंत्रपुच्छ किंवा अ‍ॅपेंडिक्सला सूज आल्यास उजव्या बाजूला पोटात खालच्या बाजूला खूप वेदना होतात. तपासणी केल्यास अ‍ॅपेंडिक्सला सूज आल्याचे निदान होते.

अ‍ॅपेंडिक्सचे स्थान नेमके कुठे

  तोंडावाटे खाल्ला जाणारा पदार्थ पोटात जाण्याचा एक ठराविक मार्ग आहे. म्हणजे अन्ननलिका, जठर, छोटे आतडे, मोठे आतडे हे सर्व एखाद्या नळीसारखे असते. म्हणजे आतून संपूर्णपणे पोकळ असते. खाल्लेलं अन्न आणि पचलेले अन्न या मार्गातून प्रवास करते. लहान आतडे संपते मग मोठे आतडे सुरु होते. मोठ्या आतड्याची सुरुवात होते तो भाग फुगीर असतो. तिथेच हा शेपटीसारखा अवयव असतो. हे पोकळ असते पण दुसरे टोक मात्र बंद असते. त्यामुळे जेव्हा संसर्ग होतो तेव्हा पोटात दुखते आणि जंतुसंसर्ग झाला तर त्याला अपेंडिसायटिस म्हणतो. जंतुसंसर्ग झाल्यास पिशवी सूज येऊन फुटू शकते आणि संपूर्ण पोटात संसर्ग होऊ शकतो.

अ‍ॅपेंडिक्सचा उपयोग

वास्तविक या अवयवाचा शरीराला काहीच उपयोग होत नसतो. सेल्युलोजचे पचन करण्याचे काम अ‍ॅपेंडिक्स मुळे होते. आदिमानव युगात कच्चे अन्न सेवन करत असताना ते पचण्यासाठी अ‍ॅपेंडिक्सचा उपयोग व्हायचा. मात्र उत्क्रांतीनंतर मानव शिजवलेले अन्न खाऊ लागला तसे या अवयवाचे कार्य कमी झाले आणि पर्यायाने त्याचा उपयोग कमी होऊ लागला. अर्थात काही वैद्यक तज्ज्ञांच्या मते शरीराच्या प्रतिकार शक्तीसाठीही अ‍ॅपेंडिक्सचा फायदा होतो.

अ‍ॅपेंडिक्सचा त्रास होण्याची कारणे

अन्न पचल्यानंतर उर्वरित अन्न आतड्यात जाण्याऐवजी चुकून अ‍ॅपेंडिक्स मध्ये जाते. अ‍ॅपेंडिक्स बंद असल्याने अन्न तिथून बाहेर पडू शकत नसल्याने काही काळाने कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. मग जंतुसंसर्ग होऊन अ‍ॅपेंडिक्सला सूज येते आणि वेदना होतात. त्यालाच अपेंडिसायटिस म्हणतात.

बद्धकोष्ठता -

शौचाला साफ न होणे. मोठ्या आतड्यातील अन्न पुढे न सरकल्यास आतड्यांमध्ये खडे होतात.

तंतुमय पदार्थांची कमतरता-

सतत ब्रेडचे सेवन, तळलेले पदार्थ, अतिप्रमाणातील मांसाहार केल्यास तंतुमय पदार्थ शरीरात जाण्याचे प्रमाण कमी असते. तंतुमय पदार्थांमुळे अन्न पुढे सरकण्यास मदत होते मात्र त्याच्या कमतरतेमुळे ही गती कमी होते आणि अन्न अपेंडिक्स मध्ये शिरते.

अंथरुणावरील रुग्ण-

जे रुग्ण अंथरूणाला खिळलेले असतात त्यांची शारिरीक हालचाल कमी होते त्यामुळे आतड्यांचे कार्यही मंदावते. मग अन्न अपेंडिक्समध्ये शिरते.

पोटात सातत्याने जंत होणे.

लक्षणे-

सुरुवातीला पोटदुखी होते. बेंबीच्या खालपासून वेदना सुरु होतात आणि हळूहळू पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना सुरु होता. काही वेळा फक्त बेंबीच्या खाली पोटात वायू धरल्याची भावना होते.

दुखणे गंभीर झाल्यास पोटदुखीबरोबर उलट्याही सुरु होतात.

अधिक संसर्ग झालेला असल्यास तापही येतो. अ‍ॅपेडिसिटिस मध्ये वेदना, उलट्या आणि ताप असा क्रम दिसतो.

त्याशिवाय भूक मंदावणे, जुलाब होणे, आंव पडणे किंवा बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसतात.

काही वेळा वेदना वेगळ्या जागी होऊ शकतात.

गर्भावस्थेत हा त्रास झाल्यस पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होत असतात.

निदान-

अ‍ॅपेडिक्सचे निदान क़रण्यासाठी रक्तातील पांढèया पेशींचे प्रमाण तपासणे. त्या वाढल्या असतील तर शरीरात संसर्ग झाल्याचे लक्षात येते. युरिन टेस्ट केली जाते. गरज भासल्यास सोनोग्राफी क़रण्यात येते. बहुतेकदा सोनोग्राफीमधून अ‍ॅपेंडिक्सला आलेली सूज दिसून येते. गरज भासल्यास डॉक्टर सीटी स्कॅन, एक्स रे करण्याचा सल्लाही देतात. त्याशिवाय रुग्णाच्या इतर काही चाचण्या केल्या जातात.

उपाय -

सर्वसाधारणपणे अ‍ॅपेडिक्स चे निदान झाल्यावर अँटीबायोटिक्स देऊन वेदना आणि संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यानंतरही वेदना आणि सूज कमी न झाल्यास शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो. त्यात दोन प्रकार आहेत. एक पोटाला चीर देऊन अ‍ॅपेंडिक्स काढून टाकले जाते आणि दुसरे लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाला भोक पाडून अ‍ॅपेडिक्स काढून टाकले जाते. दुसèया शस्त्रक्रियेत रुग्ण लवकर बरा होऊन दैनंदिन कार्य करु शकतो.

अ‍ॅपेडिक्स टाळता येईलच असे नाही पण दैनंदिन आहारात काही बदल जरुर करावेत. भरपूर पाणी प्यावे. तंतूमय म्हणजे चोथायुक्त आहार असावा. थोडक्यात रोजच्या जेवणात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, सलाड असावे. रोज फळांचे सेवन करावे. भाकरी पोळी यांचे सेवन करावे. तसेच हातसडीच्या तांदळाचा भात सेवन करावा. मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon