Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

आपल्या मुलांनी आपल्याशी संवाद साधावा यासाठी काय करावे


आपली मुले अखंड न थांबता बोलतात आणि न संपणारी प्रश्नांची मालिका सुरु असायची आणि थोडीशी मनःशांती मिळावी म्हणून कानात हेडफोन्स घालून बसण्याची तीव्र इच्छा व्हायची आणि मग काही दिवसांनी शाळा सुरु होते आणि मुले पालकांसमवेत हिंडाफिरायला लागतात, इकडे तिकडे जातात. आठवतात हे सर्व दिवस. कदाचित मुले आत्मकेंद्री किंवा लाजाळू होण्यासाठीचा हा पायाच तयार केला जातो. मात्र मूल आणि आपण यांच्यामध्ये एक पूल बांधण्याचे कामही पालक म्हणून आपल्यालाच करायचे असते आणि त्यांना आपल्याशी संवाद साधण्यास उद्युक्त करायचे असते. मुलांच्या आयुष्यात खूप नाक न खुपसता किंवा ढवळाढवळ न करता जर मुले आपल्याशी संवाद साधत असतील तर नक्कीच आपण स्वतःची पाठ थोपटून घेतली पाहिजे. पण मुलांनी आपल्याशी म्हणजे पालकांशी संवाद साधावा यासाठी खूप झगडावे लागत असेल तर पुढील काही पावले किंवा डावपेच वापरून मुलांना सहज संवाद साधण्यास प्रवृत्त करु शकता.

१. पहिला मदतीचा हात- संवाद सुरु करण्यासाठी संधी

मुलांना आपल्याशी बोलायचे असते तेव्हा ते काही तरी इशारा किंवा सूचना देतात. पालकांनी म्हणजे आपण काय करायचे तर त्या संधीचा फायदा घ्यायचा आणि संवादाला सुरुवात करायची. आपल्या व्यग्र आयुष्यात कामातून स्वतःला बाजूला काढणे आणि मुले काय सांगू इच्छितात किंवा बोलू इच्छितात ह्याकडे लक्ष देणे अवघड आहे पण मुलांच्या गरजांच्या वेळी आपण त्यांच्यासाठी कायम हजर असणार आहोत आणि ते आपल्याला गृहित धरु शकतात ह्याची मुलांना जाणीव झाली पाहिजे किंवा खात्री असली पाहिजे.

२. लक्ष देऊन ऐका.

शांतता अस्वस्थ करते हे खरेच आहे. बऱ्याचदा पालकांची चूक होते की ते शांत राहातात आणि मुले बोलत असताना मध्येच बोलायला लागतात. मुलांना असे नकोच असते. पालकांनी मुलांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घ्यावे आणि समजून घ्यावे अशी मुलांची अपेक्षा असते. ते बोलत असताना आपण स्वतःचेच म्हणणे मांडत बसलो तर मुले हिरमुसली होतात आणि त्यांच्या भावना शब्दात व्यक्त क़रणे अधिक अवघड जाते. त्यामुळे मध्ये बोलायची इच्छा झाली तरही जीभ चावून संपूर्ण लक्ष आणि कान मुलांच्या बोलण्याकडे ठेवा.

३. गरज असल्याशिवाय उपाय किंवा सल्ला नकोच

एखादी गोष्टीने मुलांना दुःख झाले असेल किंवा एखाद्या गोष्टीचा राग आला असेल त्याविषयी मुले सांगत असताना पालक चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी सरसावणार हे अगदी सहज घडते. पण मुलांना खरी गरज असते ती मोकळे होण्याची, दबलेल्या भावना खुल्या करण्याची. मुलांना पालकांकडून कोणताही उपाय किंवा सल्ला अपेक्षित नसतो. त्यांना स्वतःच उपाय शोधण्याची संधी हवी असते. स्वतःच प्रश्नांची उत्तरे आणि उपाय शोधल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतोच शिवाय ते सक्षमही होतात. त्यापेक्षा त्यांच्या परिस्थितीविषयी सहानुभुती ठेवावी आणि त्यांना त्यांच्या भावना प्रतिबिंबित होऊ द्या आणि उपायांसाठी डोके लढवू द्या.

४. व्यक्तिनिष्ट प्रश्न विचारा

मुलांना दिवस कसा गेला किंवा काय विशेष असे विचारल्यावर ठीक आहे. चांगला गेला असेच उत्तर मिळणार पण त्याऐवजी आज दिवसभरात काय केले ? आजचा दिवस कोणाबरोबर घालवला, शिक्षकांनी काय सांगितले असे प्रश्न विचारल्यास विस्तृत उत्तरे मिळतील आणि मुलांबरोबर संवाद साधायला सुरुवात करता येईल.

५. खरी उत्तरे अपेक्षित असणारे टीका न करणारे प्रश्न विचारा

 एखाद्या प्रश्नाची सुरुवात का ने झाल्यास बहुतेकदा मुले बचावात्मक पवित्रा घेतात. का केलेस तु असे ? असा प्रश्न विचारण्यापेक्षा जर या परिस्थितीत तुझ्या मित्रांनी काय केले असते असे तुला वाटते असा प्रश्न विचारल्यास तो अधिक प्रभावी वाटून मुलांकडून त्याचे खरे उत्तर मिळू शकते.हेच काही उपाय मुलांना आपल्याशी बोलते करू शकतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon