Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

अंतर्वस्त्राची काळजी कशी घ्याल : स्वच्छता आणि काळजी

अंतर्वस्त्र किंवा ब्रेसिअर,इनर असे शब्दही आजही कुजबुजत उच्चारले जातात किंवा अजूनही त्याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही तिथे त्यांची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी चर्चा करणे फार दूरची गोष्ट आहे. मात्र अतंर्वस्त्र वर्षातील सर्वच दिवस स्त्री व पुरुष वापरतात. दैनंदिन आयुष्याचा ते अविभाज्य घटक आहेत असे म्हटले पाहिजे.

स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे वापरावेच लागते. अंतर्वस्त्रांचा वापर कसा केला जातो आणि त्यांची स्वच्छता, काळजी कशी घेतो त्यावर अंतर्वस्त्रांचा टिकाऊपणा अवलंबून असतो. अंतर्वस्त्रांची काळजी योग्य प्रकारे घेतल्यास ते नव्यासारखे राहू शकतील आणि टिकतील.

अंतर्वस्त्रांची स्वच्छता

अंतर्वस्त्रांची स्वच्छता आणि काळजी घेणे महत्त्वाचे असते कारण मुख्यतः त्यांचा संपर्क थेट त्वचेशी येतो. विशेषतः स्त्रियांच्याबाबतीत तर अंतर्वस्त्रांची स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अंतर्वस्त्रे धुताना विशेष काळजी घ्यावी. कपडे धुण्यासाठी मशीनचा वापर केला जातो कारण हाताने कपडे धुण्याइतका वेळ नाही. पण अंतर्वस्त्रे उत्तम स्थितीत राहाण्यासाठी मात्र ती मशीनमध्ये न टाकता हाताने धुतल्यास अधिक योग्य. त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते. अंतर्वस्त्रे उलटी करुन धुवावीत. हाताने धुताना देखील पांढरे, काळे असे वेगवेगळे धुवावेत. साबणही सौम्य वापरावा. कारण अंतर्वस्त्रे थेट त्वचेला स्पर्श करत असल्याने साबण राहिल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो. कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी ती पांढèया व्हिनेगरमध्ये दहा मिनिटे भिजत घालावीत नंतर धुवून टाकावीत. पण सोडा किंवा ब्लिचिंगचा वापर करु नये.

मशीन वॉश करताना

मशीनमध्ये अंतर्वस्त्रे धुवायला टाकल्यास त्याचे इलास्टिक खराब होते. तसेच कापडही ओढले जाते. त्यामुळेच कापडाचे आयुष्य कमी होते. शिवाय काही वेळा रंग जातो, उतरतो. काही वेळा मशीनमध्ये इतर कपड्यांबरोबर धुतल्याने त्यावर रंगाचे किंवा साबणाचे डाग पडू शकतात. अगदीच मशीनमध्ये हे कपडे धुवायची वेळ आल्यास काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अतंर्वस्त्रे जाळीच्या पिशवीत किंवा एखाद्या पातळ उशीच्या खोळीत किंवा पिशवीत टाकून धुवावीत. त्यामुळे इतर कपड्यांत न गुंतल्याने ओढली जाणार नाहीत. टम्बल ड्रायरचा वापर करु नका त्यामुळे कपडा खराब होतोच पण रंग जातो आणि कपडे आटतात. मशीनमध्ये धुतानाही सौम्य साबणाचा ज्यात क्लोरिन नसेल असाच वापरावा.

कोणत्याही पद्धतीने अंतर्वस्त्रे धुतल्यानंतर ती हवेत वाळवावीत. अंतर्वस्त्रांचा वापर किती वेळा आणि कसा केला जातो

यावर ती कधी धुवावीत हे ठरते. बहुतांश वेळा अंतर्वस्त्रे रोजच्या रोज धुवावीत.

अंतर्वस्त्र कशी ठेवावीत-

स्त्रिया काय किंवा पुरुष काय प्रत्येकाने आपली अंतर्वस्त्रे इतर कपड्यांपासून वेगळी ठेवावेत. तसेच जर कपाटाच्या खणात ठेवणार असाल तर ती वर्तमानपत्र किंवा कापडाने गुंडाळून ठेवावी. हल्ली स्त्री - पुरुष दोघेही जिमला जातात तेव्हा येणारा घाम अंतर्वस्त्रात शोषला जातो. अशा वेळी अंतर्वस्त्रांची अधिक स्वच्छता ठेवावी लागते. त्यासाठी जिमला जाताना वेगळी अंतर्वस्त्रे वापरावीत आणि इतर दैनंदिन आयुष्यात वेगळी अंतर्वस्त्रे वापरावीत.

अंतर्वस्त्रे वापरण्याची मुदत - एक्सपायरी डेट

प्रत्येक वस्तुच्या वापरण्याला काही ठराविक मुदत असतेच. दैनंदिन स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाèया ब्रश, पेस्ट, पावडर प्रमाणे अंतर्वस्त्रांनाही अंतिम मुदत असतेच. हे ऐकून कदाचित खरेही वाटणार नाही. फाटलेले नसले आणि चांगल्या अवस्थेत असली तरीही प्रत्येक वस्तूप्रमाणे अंतर्वस्त्रांना अंतिम मुदत असतेच. अंतर्वस्त्रे ढीली होतात. पुरुषांनी वर्षातून एकदा त्यांची अंतर्वस्त्रे बदलावीत. जुने कपडे चांगले असले तरीही नवे घ्यावेत.. तर स्त्रियांनीही अगदी जादा जोड असले तरीही ९ ते १८ महिन्यांच्या कालावधीमध्ये् अंतर्वस्त्रे विशेषतः ब्रेसिअर्स जरुर नव्या घ्याव्यात. कारण सतत च्या वापराने अंतर्वस्त्रांचा आकार, लवचिकता तसेच कापडाची गुणवत्ता कमी होते.

कशी असावीत अंतर्वस्त्रे-

१. योग्य मापाची आणि आकाराची अंतर्वस्त्रे खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.  अंतर्वस्त्रे खूप घट्ट नसावे ज्यामुळे गुदमरल्यासारखे व्हावे तसेच ती अतिसैल नसावीत. अंतर्वस्त्रे योग्य मापाची नसतील तर त्वचेला संसर्ग होणे, घट्टपणामुळे त्रास आदी समस्या होऊ शकतात. त्यामुळे अंतर्वस्त्रे विकत घेताना साईज चार्ट ची मदत घ्यावी.

२. अंतर्वस्त्रे विकत घेताना दुसरा महत्त्वाचा निकष असतो तो कापडाचा. जननेंद्रिये किंवा गुप्तांगाचे संरक्षण हा अंतर्वस्त्रांचा मूळ हेतू आहे. अंतर्वस्त्रांचे कापड जर चांगल्या दर्जाचे नसेल तर घाम शोषला जात नाही. त्यामुळे जननेद्रिये किंवा त्वचा यांना संसर्ग होऊ शकतो. अंतर्वस्त्रे ही रोजच वापरली जात असल्याने सिंथेटीक कृत्रिम कापडाची - जशी नायलॉन, पॉलिस्टर यांची नसावीत

४. कारण ती ओलसर राहिल्याने बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वैदकीय दृष्ट्याही डॉक्टर सुती कापडाची अंतर्वस्त्रे वापरण्याचा सल्ला देतात. रोजच्या वापरासाठी हवेशीर, हलकी आणि घाम शोषून घेऊन त्वचा कोरडी ठेवू शकणारी अंतर्वस्त्रे वापरावीत. अंतर्वस्त्रे वापरताना काळजी घेतल्यास निर्धास्त राहू शकता. योग्य अंतर्वस्त्रे आरामदायी आणि सुखासीन वाटू शकतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon