Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

अंजीर सेवनाचे फायदे

अंजिर या फळातून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. तसेच या फळात साखरेचे प्रमाण देखील भरपूर असते. अंजीर हे फळ खायला थंड व पचायला जड असतात. या फळांच्या सेवनाने आरोग्यविषयक कोणते फायदे मिळतात ते आपण पाहणार आहोत. 

 १. या फळाच्या सेवनाने पोटातील वात  कमी होऊन गॅसेसची तक्रार दूर होते. 

 २. तसेच या फळातील औषधीगुणांमुळे पित्त विकार, रक्तविकार, व वात ही दूर होतात.

३.   अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातून दोनदा असे एक तरी अंजीर खावे. 

३.  अंजीराच्या सेवनाने मानसिक ताण आणि शाररीक थकवा कमी होतो. 

४. लघवीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अंजिराचे सेवन करावे. यामुळे मुत्रविकार दूर होतात. 

 ५.अंजिरामध्ये तंतूमय (फायबर) चे पदार्थ प्रमाण भरपूर असल्याने पोट साफ होत नसल्यास अंजिराचे सेवन करावे. 

६. या फळाच्या सेवनाने रोगप्राकारकशक्ती वाढण्यास मदत होते. 

७. अंजीर गुणाने थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे

८. जागरण आणि व्यसनांमुळे यामुळे शरीरावर झालेले हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी  ताजे अंजीर खाल्यास फरक पडतो. 

९. आजारपणामुळे अशक्तपण आल्यास अंजिराचे सेवन केल्याने फरक पडतो. 

(मधुमेही व्यक्तीने आणि पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने अंजिराचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon