Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

जाणून घ्या प्रसूतीच्या दरम्यान अनियोजित सिझेरियन का करावे लागते

तुम्ही पूर्ण गरोदरपणात जरी नॉर्मल प्रसुतीची  तयारी जरी करत असलात तरी कधी कधी तुम्हाला सी-सेक्शन सिझेरियन करावे लागते, कारण ते आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित उपाय असतो.जर तुम्ही गरोदर आहात आणि तुमची प्रसूतीची तारीख जवळ आली असेल आणि नैसर्गिक प्रसूतीसाठीची सगळी काळजी तुम्ही घेतली असेल तरी अचानक काही कारणाने सिझेरियन प्रसूती करावी लागू शकते याची मनाची तयारी करून ठेवा. I

अचानक सिझेरियन का करावे लागते.

अचानक कराव्या लागणाऱ्या सी-सेक्शन -सिझेरियन मधील emergency c-section आणि  unplanned c-section हे दोन वेगळे प्रकार आहेत हे आधी पक्के करून घ्या. emergency c-section हे केव्हा करावे लागते याबाबत जाणून घ्या

अ. नाळे विषयक समस्या

काही वेळा बाळाच्या नाईबाबत समस्या निर्माण होतात, जसं  नाळ बाळाच्या मानेला गुंढाळली जाते अश्यावेळी सी-सेक्शन करावे लागते. नाहीतर बाळाला श्वास,घ्यायला अडचणी निर्माण होऊ शकतात.

ब. गर्भवेष्टनातबाबत निर्माण झालेला समस्या Placenta abruption

गर्भवेष्टनाबाबत समस्या निर्माण होणे ही काळजी करण्यासारखी परिस्थिती असते. यामध्ये गर्भवेष्टन हे गर्भशयापासून वेगळे होते आणि  बाहेर येऊ लागते अश्या वेळी बाळाच्या आणि आईच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अश्यावेळी डॉक्टर नैसर्गिक प्रसूतीच्या ऐवजी सी-सेक्शन प्रसूतीचा सल्ला देतात.

अनियोजित सी-सेक्शन प्रसूती का करावी लागते त्याची प्रमुख दोन कारणे  पुढील प्रमाणे

अ. दीर्घकाळ चालू असलेल्या प्रसूती कळा

जर एखाद्या स्त्रीला अनेक तास प्रसूती कळा  चालू आहेत आणि बाळाची पुढे सरकण्याबाबत काहीच प्रगती दिसत नसेल तर डॉक्टर सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियनचा सल्ला देतात. पण हा सल्ला देण्याआधी डॉक्टर त्यांच्या परीने नॉर्मल प्रसूतीसाठी पर्यंत करून बघतात.

ब . ओटीपोटाच्या आकारमानामुळे निर्माण होणारी गुंतागुत(Cephalopelvic disproportion)

ही  समस्या त्यावेळी निर्माण होते ज्यावेळी बाळाचे डोके किंवा शरीर हे आईच्या ओटीपोटाच्या भागा पेक्षा मोठे असते. काही अंतरापेक्षा अधिक आई जर बाळाला पुढे ढकलू शकत नसेल किंवा त्याच ठिकाणी बाळा अडकले असेल तर अश्यावेळी सी-सेक्शन सिझेरियन करण्याची आवश्यकत असते.  

अनियोजित सिझेरियनचे नियोजन

प्रसूती कक्षात जाण्यापुरी आपल्याला सिझेरियन करावेच लागणार नाही असा विचार करून आत जाण्यापॆक्षा आपल्याला कदाचित सिझेरियन करावे लागू शकते, त्यासाठी मानसिक तयारी करून ठेवा. त्यामुळे जास्त दडपण न येत तुमची प्रसूती व्यवस्थित होईल. पुढील काही गोष्टी तुम्हाला अनियोजित सिझेरियनची तयारी करण्यास आणि निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतील.

१. आई किंवा पती यांना  प्रसूती कक्षात येण्याची परवानगी घ्या

अश्यावेळी आई -किंवा पतीचे बरोबर असणे तुम्हांला  निर्णय घेण्यास आणि मानसिक आधार देण्यास उपयुक्त ठरेल त्यामुळे तुम्ही हे डॉक्टरांना विचारून ठेवा

२. शंकांचे निरसन करून घ्या

सिझेरियन हे कदाचित काही स्त्रियांना भीतीदायक वाटू शकते त्यामुळे सी-सेक्शन विषयी डॉक्टरांकडून सगळ्या गोष्टी जाणून घ्या तुमच्या बाबतीतील शक्यता हे देखील जाणून घ्या.

३. सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचा विचार करा  

सिझेरियन करावे लागत असल्याची चिंता  आणि काळजी करत बसण्यापेक्षा आपले छोटेसे पिल्लू लवकरच आपल्या कुशीत असणार आहे, त्याच्याबाबत विचार करा.. चांगल्या गोष्टी आठवा. त्यामुळे तुमची मानसिक आणि शाररिक स्थिती दोन्ही चांगल्या राहतील

४. भावनांना वाट मोकळी करून द्या

त्यावेळी मनात असणाऱ्या भावनांना वाट करून द्या, जर रडावसं वाटत असेलतर रडा  काही बोलावसं वाटत असेल तर ते बोला उदास वाटत असेल तर तसे बोलून दाखवा फक्त चिंता आणि काळजी दूर ठेवा.

प्रसूती झाल्यावर गोष्टी इकडेच संपत नाही… तर त्यानंतर स्वतःच्या शरीराला सावरायला बरे होण्यासाठी वेळद्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon