Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

अंघोळीसाठी कोणते पाणी वापरावे ? गरम का थंड ?

 रोज अंघोळ करताना पाण्याचे तापमान काय असावे हे आपण निश्चित करतो. आपल्यापैकी काही जण दररोज थंड पाण्याने आंघोळ करतात तर काही जण स्वच्छतेबद्दल समाधानकारक भावना मिळविण्यासाठी गरम पाण्याचा अंघोळीसाठी वापर करतात. त्यातही काही लोकांना खूप गरम किंवा खूप गार असे पाणी लागत नाही.

आपल्या शाररिक स्वच्छतेसाठी तुम्ही नेमके कोणत्या प्रकारच्या पाण्याला प्राधान्य द्यावे याबाबत साशंक असाल तर हे जरूर वाचा. आपल्या शरीरासाठी थंड आणि गरम दोन्ही पाण्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात.

प्रथम आपण थंड आणि गरम पाण्याचे फायदे काय आहेत ते बघूया :

दुखऱ्या स्नायूंसाठी उपयुक्त

गरम पाण्याने आंघोळ केल्याने व्यायामानंतर स्नायूंना आराम पडतो. हे शरीराची लवचिकता आणि स्नायूंचे लवचिकता सुधारण्यास मदत करते. हे अतिप्रमाणात ताणलेल्या स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत करते. अंघोळीचा शेवटी गार पाण्याने शेकावे यामुळे व्यायाम केल्यानांतर स्नायूंना आलेली सूज, ताठरपणा कमी करण्यास मदत करते.

अधिक दक्ष राहणाऱ्यांसाठी

ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या लोकांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, त्यांना थंड पाण्याने अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करणे कठीण जाते, पण हे थंड वातावरणात खूप लाभदायी ठरते. थंड पाण्याने श्वासोच्छवास दीर्घ होतो आणि जास्त वेळ शरीरात उब निर्माण होत राहते. परिणामी दिवसभर तुम्ही सतर्क आणि तुमच्या कामांवर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता.

सखोल स्वच्छ होण्यासाठी

गरम पाण्यामुळे तुमच्या शरीरावरील विषाणू,कीटक दूर होण्यास मदत होते. ते तुमच्या त्वचेत खोलवर जाऊन स्वच्छता करते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची एकूण स्वच्छता सुधारण्यास मदत होते. उबदार पाण्यात आंघोळ करण्याचा विचार खूप आनंददायी आहे त्यामुळे आपण पाणी गरम पाण्याने स्नान करण्याची शक्यता अधिक आहे.

आपल्या रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

 एका सर्वेक्षणाअंती असे लक्षात आले की, गरम पाण्याने अंघोळ करणाऱ्यांपेक्षा गार पाण्याने अंघोळ करणाऱ्यांची रोग प्रतिकारक क्षमता जास्त चांगली असते. हे ऐकायला जरी आश्चर्यकारक वाटत असले तरी सत्य आहे. म्हणून, रोगांपासून आपले संरक्षण करण्यासाठी, एक थंड शॉवर घ्या.

निद्रानाश कमी करते

तुम्ही रात्री जर नीट झोपू शकत नसाल तर गरम पाण्याने जरूर अंघोळ करणे उत्तम पर्याय आहे. गरम पाण्याने अंघोळ ही खरोखरी एक आरामदायी आणि त्याने त्वरित झोप येते. उबदार पाणी शांत झोपेसाठीच सर्वश्रुत आहे. यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे आपण अंगावरील सर्व घाण स्वच्छ करून बेडवर झोपायला जातो.  

वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी

तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण अंघोळ केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तुमचा गैरसमज असू शकतो की, कदाचित गरम पाण्याने तर तसे नसून थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होते. एक थंड शॉवर शरीरात चरबी उत्तेजित करणारा म्हणून ओळखला जातो, अशा प्रकारे दोन इंच चरबी कमी करण्यास मदत होते.

साठलेल्या सर्दी पासून मुक्तता

जर का तुम्हाला सर्दी, खोकला, कफ झाला असेल किंवा सगळे एकत्रित झाले असेल तर काळजी करू नका! गरम पाण्याने अंघोळ केल्यास यातून सुटका होते. गरम पाण्याच्या वाफेमुळे तुमच्या फुफुसात आणि श्वसननलिकेत साठलेले कफ किंवा सर्दी बाहेर पडण्यास मदत होते.

त्वचा उजळवण्यास मदत

तुम्हाला हे माहीतच असेल की, गार पाण्याने त्वचा तजेलदार होते. जरी तुम्ही गरम पाण्यानी अंघोळ केलीत तरी शेवटी थंड पाण्याचा थोडासा शिडकाव करा. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होण्यास मदत होते आणि त्वचा कोरडी पडत नाही व त्याचा पोत कायम राखला जातो. यामुळे केसगळती देखील कमी होते व केसांची मूळे मजबूत होतात. त्यामुळे थंड पाण्याने अंघोळ केल्यास तुमची त्वचा आणि केस कायम चमकदार राहतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon