Link copied!
Sign in / Sign up
431
Shares

अंगावरचे दूध न येणाऱ्या व कमी असणाऱ्या मातांसाठी काही गोष्टी


जास्त दूध येण्यासाठी आणि दूध न येणाऱ्या मातांसाठी काही करता येईल का ? असा प्रश्न अंगावरचे दूध नसणाऱ्या मातांना असतो. तेव्हा त्यासाठी काय उपाय करता येतील ते तुम्ही खाली दिलेल्या गोष्टींमधून बघू शकता. आणि सुरुवातीचे चार महिने आणि जास्तीस्त जास्त ६ महिने बाहेरचे किंवा पाणी असे काहीच बाळाला देऊ नये. तर बाळाला फक्त स्तनपानच द्यावे.

* आईचा आहार हा चौरस, सकस, आणि परिपूर्ण असावा. स्तनपान देणाऱ्या मातेला वाढीव उष्मांक, कॅल्शियम, लोह ह्यांची खूप आवश्यकता असते. तेव्हा तिने नेहमीपेक्षा जास्त खायला पाहिजे. आणि त्याचबरोबर भरपूर पाणीही प्यायला हवे.

*गरोदरपणी जर २५०० उष्मांक(कॅलरी) लागत असेल तर बाळंतपणात तर त्याहून जास्त उष्मांक(कॅलरी) लागत असतात.

त्यासाठी रोजच्या जेवणात नाचणी, (नागली) बाजरी, गूळ, पालेभाज्या, विविध फळे त्याचबरोबर मांस, मासळी, मासे, हेही खायला पाहिजे.

* तुम्हाला दूध जर आवडत असेल तर पनीर, दूध, ताक, चीज, हे पदार्थ जास्त जेवणात घ्यावेत. आणि तुपाचा वापर जेवणात, पोळीत जास्त करावा.

* कॅल्शियम, लोह, जीवनसत्वाच्या पूरक गोळ्या डॉक्टरांना विचारून घ्याव्यात. आणि जोपर्यंत तुम्ही स्तनपान करत आहात.

* अळीव, डिंक, शतावरी, ह्या पदार्थामुळे प्रोलेक्टिन ह्या अंतस्रावाची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते. तसेच दूध वाढीसाठी औषधे चालू आहेत असा दिलासा मिळाल्यामुळेही दूध वाढण्यास मदत होत असते.

* त्याचप्रकारे दूध वाढवणारी औषधे - मेटोक्लोप्रोमाइडच्या १० मिलिग्रॅमच्या गोळ्या दिवसातून तीन वेळा दहा दिवस घेतल्यास दूध वाढत असते. ह्यासाठी प्रसूतीतज्ज्ञाच्या सल्ला घेऊ शकता.

* दूध वाढण्यासाठी बाळाने नीट दूध पिणे हाही एक मोठा उपाय आहे.

बाळासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे त्याविषयी “ पार्थास बोध केला येथेच माधवाने, हा देश स्तन्य प्याला, गीताच्या अमृताचे” ह्या ओळींमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आईचे दूध, अमृत आणि गीता ह्यांचे माहात्म्य समसमान आहे. तेव्हा स्तनपानाला खूप महत्व आहे. 

     साभार - डॉ-अश्विनी भालेराव- गांधी

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon