Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

समृद्ध आणि आनंदी कौटुंबिक आयुष्यासाठी काही गोष्टी

आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आणि व्यावसायिक आयुष्याचा ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नात असताना बहुतांश वेळा आपले कौटुंबिक आयुष्य मागे पडते. आपण कौटुंबिक आयुष्याला गृहित धरतो आणि आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी कौटुंबिक आयुष्य हा महत्त्वाचा घटक आहे हेच आपण विसरुन जातो. कौटुंबिक आयुष्य समृद्ध असेल तर एकंदर संपूर्ण आयुष्यच सुंदर किंवा आकर्षक होते. आपले कौटुंबिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी आणि व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्याला एक नवा चेहरा देऊ शकता.

१. कौटुंबिक संवादात सुधारणा

 संवाद म्हणजे फक्त बोलणे असा अर्थ नक्कीच होत नाही तर समोरची व्यक्तीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घेणे. एकमेकांविषयी रुचि किंवा आस्था दाखवून समजून घेऊन, एकमेकांना सहकार्य करणे.  एकमेकांच्या भावना समजून घेऊन जर प्रत्येक दिवशी कुटुंबात एकमेकांशी स्पष्टपणे बोलतील तेव्हा कुटुंबातील नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

२.  प्रक्षोभक शब्द टाळा

प्रत्येक कुटुंबात भांडणे, गैरसमज होत असतातच पण महत्त्वाचे आहे ते आपण ते कसे हाताळतो. अगदी प्रक्षोभक भाषा वापरल्यास उदा. एकमेकांना तू नेहमीच असे करतो किंवा तू कधीच असे करत नाहीस किंवा दुसèयाच्या मनाला लागेल असे बोलल्यास आपल्याला आणि कुटुंबियांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधा आणि शांतपणे आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवा. या संवादामुळेच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतील.

३. माफ करा

एकमेकांना क्षमा केले नाही तर लग्नबंधन क्षीण होते आणि कालांतराने ते तुटते. क्षमा करणे हा आनंदी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे. नकळत झालेल्या चुकांसाठी एकमेकांविषयी आढी किंवा द्वेष बाळगल्यास कौटुंबिक सदस्यांमध्ये भावनाशुन्यता वाढीस लागते. क्षमाशील राहिल्याने आपल्याला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही मनाची शांतता लाभते.

४. कुटूंबातील सदस्यांच्या सकारात्मक गोष्टी ओळखा 

 एखादी चांगली गोष्ट करताना आपल्या जोडीदाराचे किंवा मुलांचे चित्रीकरण करा. कुटुंबातील सदस्यांच्या सकारात्मक गोष्टीं नोंदल्या किंवा चित्रित केल्यास कुटुंब आनंदी होण्यास मदत होईल.

५. जेवणाच्या वेळी एकत्र या

 व्यग्र जीवनात सर्वच वेळी जेवताना कुटुंबासमवेत जेवता येणे शक्य होतेच असे नाही. पण रात्रीचे जेवण तरी सर्व कुटंबाबरोबर एकत्र घ्यावे. त्यामुळे एकमेकांशी अधिक चांगले नाते तयार होण्यास मदत मिळेल आणि एकमेकांच्या आयुष्यात काय सुरु आहे.

६. गॅजेटस बाजूला ठेवा.

 हल्लीच्या काळात आपण तंत्रज्ञानाच्या अधीन होत चाललो आहोत. मात्र आपल्या कुटुंबियांना त्याच्या अधीन होऊ न देण्यासाठी कोणतेही गॅजेट वापरायचे नाहीत असा एक नो स्क्रीन वेळ ठरवून घ्या. प्रत्येक दिवशी किमान ३० मिनिटे तरी असा वेळ असावा जेव्हा एकत्र पत्ते खेळणे किंवा मोबाईल तत्सम तांत्रिक वस्तू न घेता फिरून येणे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी छान बंध जुळतीलच पण मुलांना कुटुंबाचे महत्त्वही समजेल.

७. मुलांना सामावून घ्या.

 मुलांना घरातील कामे सांगण्यास बहुतेकदा आपण टाळाटाळ करतो कारण ती लहान आहेत. पण घरातल्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेणे त्यांना एखादे काम सांगितल्यास आपल्याला त्यांच्यासमवेत अधिक वेळ घालवता येतो आणि त्यामुळे पालक आणि मूल हा कायमस्वरुपी टिकणारा विकसित होणारा एक बंध निर्माण होतो.

८. प्रामाणिकपणा 

 आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आपल्या कुटंबांशी प्रामाणिक नसू किंवा कुटुंब आपल्याशी प्रामाणिक नसेल त्याचा कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणामच होणारच. त्यामुळे प्रामाणिकपणा हा कौटुंबिक जीवनात प्राधान्यक्रमावर असले पाहिजे.

 

९. कौटुंबिक परंपरांचा विकास

प्रत्येक कुटुंबात काही पारंपरिक परंपरा किंवा चालीरीति असतात त्या कुटुंबाची सर्वात मोठी ताकद होऊ शकतात. या चालीरिती किंवा परंपरा कोणत्याही स्वरुपाच्या असतील - वाढदिवसाला अनाथालयात अन्नवाटप असो किंवा महिन्यातून एकदा कौटुंबिक भेट असो. अशा प्रकारच्या चालीरिती किंवा परंपरा ह्या आपल्याला आणि मुलांनाही कौटुंबिक मूल्य आणि नातेसंबंध यांची किंमत ठेवायला शिकवतात.

१०. व्यक्त व्हा.

काही व्यक्ती आपल्या भावना बोलून दाखवत नाहीत काहींच्या बाबतीत अगदी नैसर्गिकपणे व्यक्त केल्या जातात. मात्र आपल्या कुटुंबाबद्दलचे प्रेम व्यक्त केल्यास त्याची मधुर फळेही चाखायला मिळतील. अगदी तू माझ्या साठी खूप महत्त्वाची आहेत किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो असाही संदेश कुटुंबातील व्यक्तीचा दिवस आनंदात घालवू शकतो. या सर्वांमुळे आपल्या कुटुंबाशी आपले असलेले नाते अधिक दृढ होण्यास आणि आपले आयुष्य समृद्ध होऊ शकेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon