Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

आनंदी आयुष्याचे गुपित: 'नाही' म्हणायला शिका!

             तुम्हाला कधी असे वाटते का की, तुम्ही समर्थ आहात त्यापेक्षा जास्त कामाची अपेक्षा तुमच्याकडून केली जात आहे? तुमच्या जोडीदाराला आणि मुलांना त्यांना हवे ते मिळवून देण्यासाठी तुम्ही राजीखुशी तयार होता; पण जेव्हा तुमच्या गरजांचा प्रश्न येतो त्यासाठी तुम्हाला वेळ नसतो- हे तुमच्या सोबतदेखील घडत असते का?

जर उत्तर हो असेल; तर तुम्ही योग्य जागी आला आहात! स्वतःसाठी पुरेसा वेळ न देणे हे तुम्हाला तणावग्रस्त आणि थकित करून सोडणार आहे. परिणामी तुम्हाला अपायकारक खाण्याच्या सवयी जडण्यास सुरुवात होते. तसेच अशक्तपणा आणि थकितपणा यांमुळे तुम्हाला लवकर उठून व्यायाम करण्याची प्रेरणा राहणार नाही. म्हणून जर तुम्ही योग्य प्रकारे खाणार अथवा व्यायाम करणार नसाल; तर मग तुम्ही नव्या वर्षी 'X' किग्रॅ वजन कमी करण्याचा केलेला संकल्प कसा पुरा करणार आणि तुम्हाला पाहिजे तसेच सुंदर कसे दिसणार?

स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढताना घेतलेले पहिले पाऊल म्हणजे 'नाही' कधी म्हणायचे आणि किती प्रमाणात म्हणायचे! येथे अशा काही परिस्थिती आहेत; जिथे तुम्ही नाही म्हणू शकता आणि तुम्ही म्हणायलाच पाहिजे:

     १. सर्वांसाठी स्वतः नाष्टा करणे टाळणे

सकाळचे तास हे घरातील सर्वांसाठी भरपूर गडबडीचे असतात. तुम्हाला बाळांना त्यांच्या शाळेला जाणाऱ्या सकाळच्या बससाठी तयार करायचे असते, पतीला परिपूर्ण अशी कॉफीबरोबर गरमागरम नाष्टा हवा असतो. पण सकाळ सर्वांसाठी योग्य प्रकारे आयोजित करणे यामध्ये तुम्ही स्वतः नाष्टा करणे विसरून जाता. म्हणून तुम्ही सकाळी नाही म्हणण्याच्या कलेचा सराव करू शकता. तुमचा पती स्वतः त्याची कॉफी तयार करू शकतो, बाळे स्वतः आंघोळ करू शकतात आणि नंतर स्वतः तयार होऊ शकतात.

२. मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणे

एकदा बाळे तीन वर्षांची झाली की, ते काही गोष्टी स्वतःहून करणे शिकून जातात. ते स्वतः कपडे घालणे शिकतात; तुम्हाला फक्त त्यांच्यासाठी कपडे बाजूला काढून ठेवण्याची गरज असते. एकदा ती थोडी मोठी झाली की, ते कपडेदेखील स्वतः निवडायला शिकतील. हेच आंघोळीला आणि त्यांची रूम साफ करायला देखील लागू पडते. तुम्हाला रूम साफ करायला त्यांना मदत करायला सांगणे, हे त्यांना ते कसे करतात हे शिकवून जाते आणि त्याची सवय लावते.

३. जेव्हा तुम्ही काम करण्याच्या दिवशी आजारी असता

असे काही दिवस येतात, जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि तुम्हाला काम करायला जाणे शक्य होत नाही. तरी तुमची प्रकृती नाजूक असताना देखील तुम्ही प्रवास करता आणि ऑफिसला जाता; जेव्हा खरे तर तुम्ही घरी विश्रांती घेत असायला हवी! हे असे चालणार नाही. तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायलाच हवी.

४. उशिरा रात्रीचे जेवण घेणे

कामाच्या पसाऱ्यात तुम्हाला रात्री नऊ वाजण्याच्या अगोदर जेवण घेणे शक्य होत नाही. आपण सर्व जाणतोच की, जेवण उशिरा करणे आरोग्‍याला किती हानिकारक आहे! म्हणून उशिरा काम करण्याला नाही म्हणण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही ऑफिसचे काम घरी नेत असाल; तर थांबा. ते काम सकाळपर्यंत वाट पाहू शकते. तुमचा पती जमिनीवर अस्ताव्यस्त कपडे टाकून जातो, ते तुम्ही उचलायची काहीही गरज नाही. तो ते उचलण्यासाठी आणि जागेवर ठेवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

५. रात्री उशिरा समागम करणे

कामाचा दीर्घ दिवस आणि घरी आल्यानंतरही जास्तीचे काम- यामुळे तुम्हाला लगेचच झोपायची इच्छा होते. पण जेव्हा तुम्ही डोळे मिटत असता; तेव्हाच तुमच्या पतीला संभोगाची कामना होते. नाही, यापुढे हे कधीही होणार नाही! जर त्याला खरेच तशी इच्छा होत असेल; तर त्याने मध्यरात्री अगोदर प्रयत्न करावा.

६.  स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी ताण घेणे

काही कारणांसाठी तुम्ही नेहमीच स्वतःला परिपूर्ण बनविण्यासाठी निष्फळ प्रयत्न करत राहता. जरी घरातून लवकर निघाला; तरीही तुम्ही ट्रॅफिकमधून वाट काढत, पायऱ्यांवरून धावतपळत ऑफिसला उशिरा पोहोचता! तुम्ही बनवलेला घरगुती केक तुम्हाला पाहिजे तितका नरम बनलेला नसतो. जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रस्त करत असतील; तर तुम्हाला स्वतःला थोडी सूट देणे गरजेचे आहे. नेहमीच तुम्ही परिपूर्ण असावे; असे काही नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे दिवस येतात, जेव्हा आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. लक्षात ठेवा की, काही गोष्टी अधूनमधून पाहिजे तशा नाही झाल्या; तरी काही फरक पडत नाही.

७. पतीसोबत बोलण्यासाठी वेळच नसणे

तुम्ही कामात आहात; म्हणून तुम्ही कधी आपल्या पतीसोबतचा फोनकॉल लवकर संपवला आहे का? तुम्ही सहजपणे काही मिनिटे बाजूला काढून त्याच्याशी बोलला असता आणि मग काम सुरू केले असते; पण तसे तुम्ही केले नाही! हे असे संबंधांमधील काही मिनिटांचा उपयोग न करण्याची किंमत नंतर भोगावी लागू शकते. म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी नेहमी काही वेळ काढून ठेवत जा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon