Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

ॲल्युमिनियम फॉईल्सचा वापर करत आहात ? मग हे नक्की वाचा.

आजकाल सगळेच जण ॲल्युमिनियम फॉईल्सचा नियमित  उपयोग करु लागले आहेत. जेवण गरम राहावे म्हणून याचा उपयोग करण्यात येतो. पण सततचा याचा वापर हा आरोग्याला धोकादायक ठरू शकतो.ॲल्युमिनियमच्या सतत संपर्कात येण्याने अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

स्मृतिभ्रंश

या ॲल्युमिनियम फॉईल्सचा मेंदुमधील चेताकोषांमध्ये ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अडकल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंशाशी( अल्झायमर्सशी) असण्याची शक्यता आहे. एकंदरच मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येण्याची शक्यता असते.

हाडांचे आरोग्य

हाडांना सुदृढ ठेवणार्‍या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात, ज्यामुळे एकीकडे रक्तामध्ये नको तितके कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमी, परिणामी हाडे कमजोर होतात

वरील प्रमुख दोन समस्यांशिवाय कर्करोग आणि मूत्रपिंडाविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

काही अपरिहार्य कारणांमुळे जर ॲल्युमिनियम फॉईल्सचा वापरावी लागली तरी पुढील गोष्टी टाळाव्या

हे टाळावे.

१. अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक असतो म्हणून या फॉईल गुंढाळून अन्न गरम करू नये

२. मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, आंबट फळे, वा आंबट पदार्थ शिजवताना तर ॲल्युमिनियम फॉईल वापरू नाक त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता असते.

३. मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल्सचा उपयोग करु नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो, तरीही अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon