Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

प्रसूती दरम्यान आकुंचन की जोराने ढकलणे


पायाची टाच जर टेबलाच्या कडेवर आपटली तर आपण किती जोरात ओरडू नाही का. त्याच्या वेदनांमुळे डोळ्यात पाणी येते आणि मग टेबलाचाच राग येतो. टेबलावर पाय आपटल्यावर डोळ्यासमोर दिवसा चांदणे येत असेल तर प्रसुतीच्या वेळी कसे होत असेल.

अर्थात आकुंचन हेच खूप जास्त वेदनादायी असते असाच निष्कर्ष काढणे अवघड आहे कारण ते प्रत्येकाच्या अनुभवावर आणि शरीराच्या कार्यपद्धतीवर ते अवलंबून असते. काही स्त्रियांनी या वेदना या मासिकपाळीच्या वेदनांसारख्या असल्याचे सांगितले. सुरुवातील मासिकपाळीच्या वेदनांसारख्याच या वेदना जाणवतात पण जसा वेळ पुढे सरकतो तश्या त्या अधिकाधिक वाईट होत जातात.

अधिक आखडल्यासारखे किंवा आकुंचन पावल्यासारखे वाटत असेल तर शरीराची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे थोडा आराम मिळू शकतो कारण ते ब्रॅक्स्टन हिक्स किंवा खोट्या तात्पुरत्या वेदना असू शकतात. या वेदना म्हणजे शरीर अंतिमतः प्रसुतीसाठी तयार होत असल्याचे लक्षण आहे.

प्रसुती ही वेदनादायी असते आणि योनीमार्गातून किंवा नैसर्गिक प्रसुती प्रक्रियेचे परिणाम आणि नंतर जाणवणारे परिणाम याविषयी स्त्रीला पूर्वकल्पना देणे आवश्यक असते. वेदनांची तीव्रता मोजायची ठरवल्यास प्रसुतीच्या कळा या दहाव्या क्रमांकावर असल्याचे अभ्यास आणि संशोधनातून सिद्ध झालेले आहे. या सर्व प्रक्रियेतून जाण्यासाठी व्यक्तीला शारिरीक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या तयारी करणे आवश्यक आहे.

मानवाने केलेल्या तांत्रिक आणि बौद्धीक प्रगतीमुळे आपल्या बाळाला या सुंदर जगात आणण्यासाठी अनेकविध मार्गांची उंची गाठली आहे याविषयी देवाचे आभारच मानले पाहिजेत. प्रसुतीविषयीचे योग्य ज्ञान, वेदनांचे व्यवस्थापन, श्वसनाचे व्यायाम यामुळे प्रसुती ही तुलनेने कमी वेदनादायी होते आहे. शेवटी स्त्री एका नव्या मानवी जीवाला जन्माला घालत असते आणि प्रसुती कशी व्हावी हे सर्व आईवर अवलंबून असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon