Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

आहारातील घटकांचा कामजीवनावर होणार परिणाम

कामजीवन हा आयुष्याचा आणि सहजीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे, सहजीवनासाठी निरोगी आरोग्य महत्वाचे असल्यामुळे, आणि निरोगी आरोग्यासाठी योग्य प्रमाणात योग्य घटकांनी युक्त असा  आहार महत्वाचा असतो. इतर क्रियांप्रमाणे आहाराचा संबंध कामजीवनाशी देखील असतो. त्यामुळे आहारातील कोणत्या घटकांचा कामजीवनावर काय परिणाम करतात ते पाहणार आहोत

१. प्रथिने

प्रथिनांची कमतरता असल्यास शुक्राणूंची संख्या. व टेस्टोस्टेरॉन यांच्या निर्मितीत समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच स्त्रीबीज निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण घटते.त्यामुळे आहारात प्रथिनाचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक असते. यासाठी आहारात दूध, अंडे, डाळी, कडधान्ये एकदल धान्ये यांचा समावेश असावा.

२. कर्बोदके

कर्बोदके आपल्या शरीराला ऊर्जा पुरवितात. परंतु कर्बोदकेयुक्त पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की मग चेतातंतू कमजोर होतात यामुळे नपुंसकत्व येते. साखर,गूळ मध यातून कर्बोदके अढळतात

३. स्निग्धता

आहारात स्निग्ध पदार्थाचे योग्य प्रमाण आवश्यक असते. परंतु या पदार्थाचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाल्यासवाईट कोलेस्टोल वाढून  रक्तदाब वाढतो रक्तवाहिन्यात काठिण्या निर्माण होते. शिश्नाच्या रक्तवाहिन्यात काठिण्या निर्माण  नपुंसकत्व येते. य प्रकारचे प्रमाण कमी आहे. परंतु याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. 

४. जीवनसत्वे 

शरीराच्या चयापचयासाठी, आणि इतर अनेक क्रियांसाठी जीवनसत्वांची गरज असते.या जीवनसत्वाचा काय परिणाम कामजीवनावर होतो ते आपण पाहूया. 

 १. ‘अ’जीवनसत्व

जीवनसत्वे ‘अ’ चा अभाव असल्यास वंध्यत्व(मूल न होणे) येते. कारण पुरूषात शुक्राणूंची निर्मिती वृषणात व्हावी तितक्या प्रमाणात होत नाही आणि स्त्रियातील स्त्रीबीजग्रंथी व्यवस्थित कार्यरत न राहिल्यामुळे स्त्रीला मासिकपाळी वेळेवर येत नाही.

२. ‘ब’जीवनसत्व 

जीवनसत्वातील पायरिडॉक्सिन, पँटोथिनिक आम्ल ब १२ या घटकांची उणीव असेल तर पुरूषातील वृषणांची कार्यक्षमता घटते. कामोउत्तेजनाचे प्रमाण कमी होते. 

३. इतर जीवनसत्वे 

जीवनसत्व ‘अ’, ‘ब’, ‘क’ , व ‘ई’ या जीवनसत्वामध्ये  अँटीऑक्सिडंट असतात. यांच्यामुळे शरीरातील पेशींची क्षमता चांगली राहते. आणि शरिराची क्षमता चांगली राहते. ताज्या पालेभाज्या हातसडीचे तांदूळ, सुकामेवा डाळी याच्या सेवनाने हि जीवनसत्वे मिळतात. 

आपला आहार चौरस ठेवा प्रत्येक प्रकारचा घटक आहारात योग्य प्रमाणात घ्या. कोणत्याही प्रकारचा अतिरेक हा घातकच असतो म्हणून कोणत्याही पदार्थाचा आहारात अतिरेक करू नका. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon