Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

ह्या अभिनेत्रींनी नॉर्मल डिलिव्हरी स्वीकारली आहे !

 

                  गरोदर स्त्रीला तिच्या डिलिव्हरीविषयी खूप चिंता असते. ती सिझेरियन होईल की, नॉर्मल होईल. आणि ह्याबाबत काही स्त्रियाही खूप भीती घालून देतात. म्हणून त्यांना खूपच चिंता लागून असते की, माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस काही होणार तर नाही ना. आणि त्यावेळी ज्या वेदना होतात म्हणून काही स्त्रिया गरोदरच होत नाही. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास होत असल्याने काही स्त्रिया सिझेरियन डिलिव्हरी करतात. ह्या अगोदर खूप ब्लॉग मधून तुम्हाला सिझेरियन आणि नॉर्मल प्रसूतिविषयी सांगितले आहे. ह्या ब्लॉगमधून आपण अशा कोणत्या बॉलिवूड हिरोईन आहेत की ज्यांनी स्वतःची प्रसूती नॉर्मल केली आहे. त्यांनी सिझेरियन डिलिव्हरीचा मार्ग स्वीकारला नाही.   

१) ऐश्वर्या राय बच्चन

तुम्हाला माहितीच असेल की, ऐश्वर्या रायने खूप उशिरा गोंडस मुलीला जन्म दिला. आता इतक्या वयात सुद्धा गर्भवती होऊ शकते का ? असा प्रश्न येतो. तर हो होऊ शकते. आणि ह्याचबरोबर ऐश्वर्या रायने स्वतःची डिलिव्हरी नॉर्मल केली. तिने सिझेरियन प्रसूतीचा मार्ग स्वीकारला नाही. ह्याबाबत तिने खान - पान वर खूप भर दिला होता.

२) रविना टंडन

ह्या हिरोईनला तुम्ही ओळखत असालच. तसे तर हिने २ मुलींना दत्तक घेऊन एक खूप छान उदाहरण दाखवून दिले होते. पण ह्यानंतर रवीनाने २००७ साली एका मुलाला जन्म दिला. तेव्हा तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. तिनेही सिझेरियन न करता नॉर्मल डिलिव्हरीला स्वीकारले. आणि त्याविषयी तिने मुलाखतही दिली होती.

३) तारा शर्मा

उत्तम फिटनेस साठी ओळखल्या जाणाऱ्या तारा आज दोन मुलींची आई आहे. आणि तिने दोन्ही डिलिव्हरीसाठी नॉर्मल प्रसूती केली आहे. त्यासाठी तिने सर्व काळजी घेतली होती. उलट तिने गरोदरपणात हलका व्यायामही केला होता.

४) ट्विंकल खन्ना

अक्षय कुमार पत्नी एक उत्तम लेखक असलेली ट्विंकलने नितारा नावाच्या मुलीला २०१२ मध्ये जन्म दिला होता. आणि ती डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. आणि ट्विंकल ला मुलगाही आहे त्याचे नाव आरव आहे.

५) मीरा कपूर

शाहिद कपूरची पत्नी असलेली मीरा कपूरने मिशा नावाच्या मुलीला जन्म दिला. आणि तिनेही नॉर्मल प्रसूती स्वीकारली.

तेव्हा ह्या हिरोईन च्या द्वारे हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की, नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे खूप काही संकट नसते. ह्या उदाहरणातून तुमची हिम्मत वाढेल. आणि ह्या हिरोईन होण्याअगोदर स्त्रिया आहेत. हे लक्षात असू द्या. म्हणून नॉर्मल डिलिव्हरी स्वीकारा.



Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon