Link copied!
Sign in / Sign up
67
Shares

ह्या भारतीय मंदिरात योनीची पूजा केली जाते ! नाही केली तर काय परिणाम होतात ?


भारताची संस्कृतीचे आकर्षण अनेकांना आपल्याकडे खेचत आलेलं आहे. अनेक रूढी, परंपरांच्या समृद्धतेने भारत देश नटलेला आहे. मंदिर आणि मशिदींशी अनेक रंजक माहितीचा इतिहास साक्षीदार राहिला आहे. यातीलच एक आहे ते म्हणजे 'कामाख्या मंदिर'

अशी आख्यायिका आहे की भगवान शंकराची तपश्वर्या भंग केल्यामुळे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सती देवीचे ५१ तुकडे केले. ते तुकडे जिथे जिथे पडले त्यांना शक्तीपीठ समजण्यात आले. आसामच्या राजधानी दिसपूरमधील कामाख्या हे सती देवीचे मंदीर याच शक्तीपीठापैकी एक आहे.

कामाख्या देवीची गोष्ट मोठी रोचक आहे. आपले वडील दक्ष यांच्या मनाविरुद्ध जात देवी सतीने भगवान शंकराशी विवाह रचला. यामुळे सतीचे वडील दक्ष तिच्यावर नाराज होऊन राहत असत. एकदा त्यांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी जाणूनबुजून आपल्या लेक-जावयाला त्यांनी आमंत्रित केले नाही. या गोष्टीवर संताप झाल्याने कामाख्या शिवासह तिथे जाऊन पोहोचली. याचा राग मनात धरून दक्ष याने त्या दोघांचाही यथेच्छ अपमान केला. याचा परिणाम असा झाला की सतीने हवनकुंडात उडी घेऊन आत्महत्या केली. भगवान शंकरास याची खबर लागताच त्यांनी आपली पत्नी सतीचे जळलेले शव हातात घेत तांडव सुरू केले. यानंतर सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूने सतीच्या पार्थिवाचे तुकडे केले आणि सगळीकडे फेकून दिले. जिथे जिथे हे तुकडे पडले आता त्या स्थळांना शक्तीपीठ संबोधण्यात येते.

या मंदिराबद्दल आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते. नराका नावाचा एक राक्षस कामाख्या देवीच्या प्रेमात पडला होता. त्याने कामाख्या देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला, मात्र कामाख्याला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. यामुळे तिने त्याच्यासमोर एक अट ठेवली. जर त्याने पर्वतावर एका रात्रीतून पायऱ्या बांधल्या तर ती त्याच्याशी लग्न करणार होती. त्या राक्षसाने तिचे आव्हान स्वीकार करत पायऱ्या बांधायला सुरुवात केली. पर्वतावर पायऱ्या बांधायचे कार्य समाप्त होतच आले होते की कामाख्याने एक चाल खेळत कोंबड्याला पहाट व्हायच्या आधीच आरवायला सांगितले. यामुळे नराका राक्षसाचे काम अपूर्ण राहून गेले.

या ठिकाणी सती देवीची योनी पडली होती म्हणून आजही तिची पूजा केली जाते.

याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरनिवासी देवीचा मासिक धर्मही असतो. जो तीन दिवस चालतो. या दरम्यान सामान्य भक्तांना मंदीर प्रवेश बंद करण्यात येतो. याला अंबुवाचा काळही स्थानिक भाषेत म्हटले जाते. यादरम्यान येथे जत्रा भरवण्यात येते. मंदिरात एक सफेद अस्तर पसरवण्यात येते. या तीन दिवसाला मातेच्या रजस्वला होण्याचा काळ संबोधण्यात येते. असे म्हणतात या तीन दिवसात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणीही लाल होते.

मंदिरात एक पांढरा स्वच्छ कपडा अंथरण्यात येतो. तीन दिवसांत हा कपडा रक्ताने लाल होतो. जेव्हा चौथ्या दिवशी मंदीर उघडले जाते तेव्हा प्रसाद म्हणून कामाख्या देवीच्या रजस्व लागलेला ओला कपडा देण्यात येतो. या कपड्याला स्थानिक भाषेत अंबुवाची वस्त्र म्हणतात.

तर अशी होती कामाख्या देवीची ही अनोखी गोष्ट. या मंदिराबद्दलच्या या गोष्टी वाचणे तुम्हाला नक्कीच आवडले असणार, तेव्हा आपला आनंद इतरांशीही वाटायला अजिबात विसरू नका.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon