Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

भारतीय आर्मी अतिरेक्यांनी साठी कठोर पण ह्या घटनेने त्यांचे हृदयस्पर्शी मन कळेल........


ती’ घरात असताना अचानक त्या घरावर दहशवाद्यांनी हल्ला चढवला. ती एकदम गोंधळून गेली. तिचा नवरा तिच्या सोबत घरातच होता पण तो तिला वाचवण्याचे काम करणार की, इतर नागरिकांना वाचवणार. त्याचा पुढे प्रश्न असतानाच त्याचा वडिलांचा म्हणजे तिच्या सासऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. आणि अशा खूप कठीण समयी तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्यात. ही दोन दिवसांपूर्वीच घडलेली घटना. जम्मू - काश्मीर मध्ये रहिवासी आर्मी कॅम्प मध्ये राहणारी गर्भवती स्त्री शहजादा खान हिची.

शाहजादा ही ३५ आठवड्यांची गर्भवती स्त्री होती. नुकताच ३६ वा महिना चालू झाला होता. आणि ती २ ते ४ दिवसानंतर डॉक्टरांना भेटणार होतीच. त्याचवेळी जैश- ए- मोहम्मदच्या अतिरेक्यांनी त्याच्या कॅम्पवर वर हल्ला केला. तिचा नवरा नजीर अहमद हा भारतीय आर्मीत रायफलमॅन म्हणून कार्यरत आहे. आणि ते जम्मू- काश्मीरमधीलच आहेत.

ज्यावेळी अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला तेव्हा तिच्या सासऱ्यांना गोळी लागली आणि ते जागीच गतप्राण झालेत. आणि त्याचवेळी गर्भवती शाहजादाला सुद्धा नितंबाला गोळी लागली. आणि त्याचवेळी ती’ ला खूप जोराने प्रसूतीच्या कळा(लेबर पेन) सुरु झाल्या. आणि तिचे बाळ गर्भातून खाली सरकायला लागले. कारण तिला गोळी लागल्याने त्याचा परिणाम तिच्या गर्भावर व बाळावर होऊन त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते. शाहजादा खूप जखमी झाली होती तिच्या शरीरातून रक्त खूप वाहत होते.

त्याचवेळी अशा वेळी तिच्या नवऱ्याने sos कॉल करून आर्मी च्या मुख्यालयाला सांगितले. लगेच मोठी कुमक(सैन्याची तुकडी) आणि त्यासोबत आर्मीचे डॉक्टर सुद्धा आलेत.

मग त्या गर्भवती स्त्रीला आर्मी च्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. आता आर्मीच्या डॉक्टरांपुढे खूप मोठे आव्हान होते कारण त्या गर्भवती शाहजादाला गोळी लागली आणि त्याच वेळी तिची डिलिव्हरी सुखरूपणे करून तिच्या बाळाला वाचवायचे होते. म्हणजे आई आणि बाळाच्या जीवाला धोका होता. अशावेळी आर्मीच्या डॉक्टरांनी रात्रभर प्रयत्न केलेत. तिच्या नितंबातून गोळी काढून आणि तिची डिलिव्हरी केली. पण त्यांना सिझेरियन प्रसूती करावी लागली कारण ह्यावेळी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

आणि शाहजादाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आणि शहाजादाने आर्मीच्या डॉक्टरांचे खूप आभार मानले. आता तिची व तिच्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.  आर्मीच्या जवानांना खूप आनंद झाला. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon