Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

आंब्याच्या रसावर अशी खान्देशी पुरणपोळी बनवा

 

खान्देशी पुरणपोळी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे तिची चव आणि गोडवा पूर्ण दिवसभर राहतो. आणि आता उन्हाळयात आंब्याच्या रसासोबत पुरणपोळीची चव आणखी वाढूनच जाते. तेव्हा ही रेसिपी जळगावच्या इंदिरा बोरसे ह्या आईने आपल्यासाठी लिहली आहे. तेव्हा ह्या दिवसात नक्कीच आंब्याच्या रस सोबत पुरणपोळी खाच.

पुरणपोळी बनविण्यासाठी साहित्य :

१) चणाडाळ पाव किलो 

२) गव्हाचे पीठ अर्धा किलो
३) साखर पाव किलो
४) मीठ(थोडेसे चवीला)
५) साखर
६) कढई किंवा खापर 

 

पुरणपोळी बनविण्यासाठी कृती :

* आधी चणाडाळ कुकर मध्ये पाण्यात शिजवून घेणे. नंतर ती शिजवलेली चणाडाळ थंड झाल्यावर एका भांड्यात काढून घेणे व त्यात पाव किलो साखर मिक्स करून घ्या, नंतर ते मिश्रण  मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

*  १ चमचा मीठ व अर्धा चमचा साखर ताटात घ्या व त्यात अर्धा किलो गव्हाचे पीठ योग्य प्रमाणात पाणी टाकून मळून घ्या. नंतर त्या कणकेचे छोटे गोळे बनवा .
*  आता कणिक आणि पुरण दोन्ही तयार झाले.
*  आता कणकेचे दोन गोळे घ्या आणि त्यांना थोडे लाटून घ्या. 


*  एका लाटलेल्या गोळ्यावर योग्य प्रमाणात पुरण भरावे आणि त्यावर दुसरे लाटलेले  ठेवा.
*  नंतर ते थोडे लाटून घ्या, नंतर ते फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे हातावर घ्या.
*  नंतर ते गॅसवर उलट ठेवलेल्या कढई किंवा खापर वर टाका.


*  पुरणपोळी नीट शेकून घ्या. नंतर ती ताटात काढून घडी करा.

Tinystep मराठीकडून ह्या आईला खूप धन्यवाद.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon