Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुम्ही आणि तुमच्या आईमधल्या सारख्या गोष्टी(एकदम सेम टू सेम)

आई असणे हा प्रत्येक स्त्री साठी खूप सुंदर अनुभव असतो. ह्या नात्याला उलगडण्यासाठी त्याचा सार्थ अनुभव आई होऊनच घेता येतो. आपण जसे जसे मोठे होत असतो तेंव्हा आई ही आपल्यापाशी एक खंबीर पाठींबा आणि आधार म्हणून उभी असते. आई आपल्याला योग्य वळण आणि शिस्त लावते आणि सोबतच एक मैत्रीण म्हणून पण आपल्या सगळ्या निर्णयात ती साथ देते. आईला एवढं सगळं कसं जमतं ? असा विचार करत असतानाच तुम्हाला एका क्षणी जाणवतं की आता तुम्हीही आई होणार आहात आणि आता तुम्हालाही तुमच्या मुलांच्या आयुष्यात ती भूमिका बजावायची आहे जी आईने तुमच्या आयुष्यात साकारली आहे.

तुम्ही तुमच्या आईचीच एक दुसरी प्रतिकृती आहात. तुमच्यात केवळ शारीरिक साम्यच नाही तर तुमच्या जन्मावेळी तुमच्या आईच्या मनाची जी अवस्था होती तिच आता तुमच्या मनाची आहे. आई आणि तुमच्यात अजून एक मजबूत धागा तुमच्या आई होण्याने बांधला जाणार आहे. इथे तुमच्या दोघींमधल्या काही सारख्या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत.

१. तुमच्या मुलांना सर्दी-पडसे झाले तर त्यावर घरच्या घरी काय उपचार करता येतील हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असते. आईने तुम्हाला बरे नसतांना केलेले घरगुती औषधोपचार तुम्हाला चांगलेच ठाऊक आहेत.

       २. तुम्हाला आठवतंय ? आई लहानपणी तुम्हाला चेहेर्यासाठी फेस पॅक बनवून द्यायची. दही आणि डाळ किंवा गुलाबपाण्याने बनवलेले ते मिश्रण तुम्हाला चेहेऱ्यावर लावायला अगदी नकोसे व्हायचे. आणि आज तुम्ही तेच फेस पॅक तुमच्या मुलांसाठी बनवता आहात. अर्थातच या घरगुती उपचारांनी तुमची त्वचा किती मुलायम झाली होती हे तुम्हाला माहित आहे.

३. रविवार किंवा सुट्टीचा दिवस हा हमखास गरम तेलाने ‘चंपी’ करण्याचा असे. १०-१५ मिनिटात आईच्या हातचा हा डोक्याचा मसाज केसांमध्ये जान आणत असे. शाम्पू आणि इतर रसायने असणाऱ्या प्रोडक्ट्समुळे केसांवर होणारे परिणाम होतात आणि वरून प्रदूषण आणि धूळ . यात ही केसांची मालिश खूप गरजेची असे. याने केस मऊ आणि सिल्की व्हायचे.

आईला घरगुती उपचार आणि केसांच्या सौंदर्यासाठी काय करावे ह्याच्या सगळ्या टिप्स माहित होत्या ज्या तिने तुम्हाला सांगितल्याच आहेत. आता तुमच्या मुलीसाठी या टिप्स तुम्ही वापरणार आहात.

४. आणि जेवणाविषयी तर आपण विसरूच शकत नाही. आईने शिकवलेल्या सगळ्या पाककृती आता स्वतः करून बघायला तुम्ही उत्सुक असणार. आईच्या पद्धतीने बनवून एखादी डिश तुम्हीपण तुमच्या लहानग्या लाडक्यांना त्याचं प्रेमाने खाऊ घालाल.

५. एखादा श्लोक किंवा मंत्र आणि त्याचे उच्चार तुम्हाला आईमुळेच स्पष्ट माहित आहेत. आता तुमच्या मुलांनादेखील तुम्ही या गोष्टी शिकवणार आहात. त्यांचे उच्चार स्पष्ट आणि भाषा सुधारित व्हावी म्हणून तुम्हीच प्रयत्न करणार आहात जसे तुमच्यासाठी आईने केले होते. आई नेहेमीच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकवायची जे आता तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायचं आहे.

६. मोठे होतांना आईने नेहेमीच तिच्या रुपात तुमच्यासमोर एक आदर्श ठेवला. कसे वागावे, कसे बोलावे याचे संस्कार आईने तिच्या वागण्यातून तुमच्यावर केले. आता तुम्हीपण तुमच्या मुलांसमोर हाच आदर्श ठेवणार आहात. जेंव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला ‘आई, मला तुझ्यासारखे व्हायचे आहे’ असे म्हणेल तेंव्हा तुमचे जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटेल.

७. तुम्ही लहानपणी आजारी पडायचात तेंव्हा आई सारखं तुम्हाला बजावायची, हे करू नकोस आणि ते करू नकोस म्हणून. त्यावेळी तिच्या सूचना तुम्हाला खूप त्रासदायक वाटायच्या पण केवळ तुम्हाला शिस्त लागावी आणि तुमचे आरोग्य निरोगी राहावे म्हणूनच आईची ही धडपड असायची. आज तुम्हीपण तुमच्या मुलांसाठी अशीच काळजी करता आणि त्यांच्या सुधृढ आरोग्यासाठी तुम्हीपण मुलांना अशाच सूचना करत असता.

८. तुमची तुमच्या मुलांवर कोणत्याही गोष्टीची बळजबरी करत नाही. त्यांना हवे ते योग्य स्वातंत्र्य आणि संस्कार तुमच्याकडून होतात. मुलांना त्यांचे निर्णय घेण्यात तुमचे मार्गदर्शन मिळते. ज्याप्रमाणे आईने तुम्हाला वाढवले आणि तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ दिली त्याचप्रमाणे तुम्हीपण तुमच्या मुलांसाठी आज उभे आहात.

९. तुमची आई ही नेहमीच एक खंबीर भूमिका घेत तुमच्या पाठीशी उभी राहिली. आज तुम्हीपण आई आहात आणि एका कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आईप्रमाणे तुम्हीपण कुटुंबाचा कणा बनून त्यांना आधार देण्यासाठी उभ्या आहात. तुमची साथ तुमच्या मुलांसाठी मोलाची आहे.

१०. तुमची आई तुमच्यासाठी ‘हिरो’ आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी ‘हिरो’ आहात. तुम्ही तुमच्या पाल्यासाठी सर्वकाही करत आहात जसे तुमच्या आईने तुमच्या भविष्यासाठी समर्पित केले होते.

प्रत्येक आई ही तिच्या मुलांसाठी देवाचा एक आशीर्वाद आहे. आपण सगळे देवाच्या या आशीर्वादासाठी कृतज्ञ आहोत.

   साभार - श्रावणी कुलकर्णी 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon