Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

आईपणावर, टीका करणाऱ्यांसाठी उत्तर . . . .

"मातृत्व ही एक महान आणि सर्वात कठीण गोष्ट आहे"- रिकी लेक

मातृत्व हे तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रेम, काळजी आणि ममता यांचा वर्षाव करण्याची अधिकृत परवानगी देते. त्याबरोबरच ते तुमच्यासमोर काही आव्हानेदेखील उभी करते. त्यांतीलच एक अनाहूत आणि त्रासदायक आव्हान म्हणजे, पालक म्हणून तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर उठवलेले प्रश्नचिन्ह होय! तुमचा परिवार, मित्र-मंडळी, जोडीदार किंवा अनोळखी व्यक्तीसुद्धा- या सर्वांकडून तुम्ही तुमच्या बाळासाठी जे जे करता, त्या सर्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तुमच्या स्तनपानाचा निर्णय, बाळासोबत झोपावे की नाही, तुमच्या झोपण्याचे वेळापत्रक, बाळाला काय खाऊ घालता, त्यांना कपडे कसे घालता आणि शिस्त कशी लावता या सर्वांवर शंका घेतली जाते. म्हणून जे आपल्यावर पाळत ठेवुन असतात आणि आपल्या अपयशाची वाट पाहत असतात, अशा टीकाकारांना कसे हाताळावे; यासाठी आम्ही येथे काही टिप्स देत आहोत:

विनोद

"मी हे योग्यपणे करीत आहे ना?" "मी माझ्या बाळाची काळजी नीट घेत आहे ना?" "बाळाला योग्य प्रकारे शिस्त लावत आहे ना?" या आणि अशा अनेक प्रश्नांच्या गोंधळामध्ये विनोद हे सर्वाधिक प्रभावी साधनांपैकी एक गणले जाते. जरी तुम्ही स्वतःच्या क्षमतांवर शंका घेत असाल वा कुणी तरी तुमच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल; जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करीत असेल; तेव्हा तुम्ही नेहमीच विनोदाचा कवच म्हणून वापर करू शकता आणि हास्याचा आनंद घेऊ शकता. सरतेशेवटी याच टीकाकारांच्या वाक्यांवर तुम्ही एक वा दोन वर्षांनंतर हसतच बसणार आहात!

अज्ञानातच आनंद असतो

जेव्हा तुम्हाला कुणी काहीतरी बोलून जाते, तेव्हा तुम्ही अतिविचार आणि काळजी का करत बसता; विशेषतः जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून आनंदीदेखील राहू शकत असला तर? तुम्ही काहीही करा; प्रत्येकाला त्यावर मत असणारच आहे आणि तरीदेखील तुम्ही ती गोष्ट करताच ना! म्हणून काळजी करण्यामध्ये आणि अनावश्यक गोष्टींमध्ये तुमची उर्जा वाया घालवण्याऐवजी, महत्त्वाच्या कामासाठी तुमची ऊर्जा वाचवा, तुमच्या टीकाकारांकडे न ऐकल्यासारखे करा आणि आनंदी आणि काळजीमुक्त व्हा.

अभिमान बाळगा

या जगात कुणालाही सर्व गोष्टी पहिल्यापासूनच मिळालेल्या नसतात. जेव्हा पालकत्वाचा विषय निघतो; तेव्हा त्यातील सगळ्या गोष्टी आपण चुकत चुकतच शिकतो. एखाद्या बाळासाठी जी गोष्ट योग्य ठरते; ती दुसऱ्या साठी योग्य ठरेलच असे नाही. म्हणून तुम्ही शोधलेल्या पद्धतींवर विश्वास बाळगा. जरी लोक तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये चुका शोधण्याचा प्रयत्न करणारच आहेत; तरी तुमच्या बाळाची जाण तुमच्यापेक्षा जास्त कुणालाच नसते. म्हणून प्रिय मातांनो; तुम्ही योग्य तेच करत आहात! फक्त संयम बाळगा आणि स्वतःचा आणि स्वतःच्या पालकत्वाचा अभिमान बाळगा.

आत्मविश्वास ठेवा

जगातील कोणत्याही नात्यापेक्षा तुमचे तुमच्या बाळाबरोबरचे नाते हे सर्वाधिक मोठे असते. तुमचे बाळ असेच का आहे, त्याला कसे शिकवता येऊ शकते, ते आपल्या भावना कशा व्यक्त करु शकते; या सर्व गोष्टी फक्त तुम्हीच समजू शकता! बाकी जे म्हणतात, ते अज्ञानातून म्हणत असू शकतात. कुणालाही तुमच्या बाळाचा पूर्ण भूतकाळ माहित नसतो किंवा तुम्ही विशिष्ट प्रकारेच बाळाची काळजी का घेता, हे माहीत नसते. म्हणून तुमच्या निर्णयांबाबत आत्मविश्वास ठेवा आणि तुम्ही जे करता, ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी योग्यच असणार आहे; बाकीचे जे म्हणतात ते नव्हे!

तुमच्या हितचिंतकांबरोबर राहा

तुमचा विश्वास बसणार नाही; पण पालकत्वाच्या वेळी असणारी ऊर्जा ही मौल्यवान असते आणि वाया घालवून चालत नाही. जर तुम्हाला खूप धडपड्या बाळ लाभले असेल; जे नेहमी पळत, उड्या मारत, खिदळत, धडपडत आणि गोंधळ करत असेल; तर तुम्हाला कळून चुकले असेल की, तुमच्या आताच्या दुप्पट शक्ती तुमच्याकडे असती तरी ती या बाळाला हाताळायला अपुरी पडली असती! म्हणून अशी मूल्यवान शक्ती तुम्ही जे लोक तुमचे मूल्यमापन करतात वा तुमच्या पालकत्वावर टीका करतात; मग ते तुमचा परिवार असो वा मित्रमंडळी- त्यांच्याशी वाद घालण्यामध्ये घालवू नका. हितचिंतकांबरोबर राहा आणि त्यांच्यासह जास्त वेळ व्यतीत करा. यामुळे तुम्हाला शांती लाभेल.

वस्तुस्थितीचा स्वीकार करा

टीकाकारांच्या विचारसरणी वा टीकेमध्ये तर्कशास्त्र असेलच, असे नाही. कधी कधी त्यांना फक्त आपले कुणीतरी ऐकावे, असे वाटत असते. मगच त्यांना बरे वाटते. बाकी वेळी टीका ही त्यांच्या स्वतःच्या असुरक्षितता झाकण्याचा वा ते काही गोष्टी वेगळेपणाने करू शकले असते, ही त्यांची खंत लपवण्याचा एक प्रयत्न असू शकतो. म्हणून पालकत्वामध्ये भरपूर आव्हाने आणि अनाहूत सल्ले येत राहतात, ही वस्तुस्थिती स्वीकारा. वायफळ टीका एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या आणि तुमच्या पालकत्वाच्या कौशल्याबद्दल निश्चिंत राहा!

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon