Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

आईंनो, ह्या गोष्टी करू नका !

बाळाची मालिश हलक्या हातानी करावी. एकदम बाळाला मोठे करायचे म्हणून  पैलवानांना रगडतात तसं रगडून बाळाला रडत ठेवणं योग्य नाही. कारण काही बाळांची हाड मुदली आहेत. अंघोळी आधी तेल लावत असाल तर अंघोळ करताना हात निसटणार नाही ह्याची दक्षता घ्या.नाहीतर तेल लावून हात निसटला तर बाळ पडू शकते. थोडस अंगाला तेल लावू शकता. 

 

तेल लावल्यानं बेंबी सुकणं लांबतं. सहाजिकच नाळ, पडायलाही वेळ लागतो. ओल्या नाळेवर जंतू बसून पू होतो. त्यातले जंतू बेंबीतून शरीरात पोचतात आणि सर्वत्र पसरतात. त्यानें बाळ आजारीही पडू शकतं. कधी कधी असा पू होण्याने शरीरावर होणारे परिणाम मोठेपणीही भोगावे लागतात. यासाठी, बेंबी स्वच्छ कोरडी ठेवायला हवी. आणि ओली रहात असेल आणि काही वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवा. 

बहुतेकदा बाळाला न्हाऊ घालायला ठेवलेल्या स्त्रिया इतर वेळा धुण्या-भांडयाची कामं करतात. त्यामुळं हाताला भरपूर भेगा असतात. यात अनेक प्रकारचे जंतू असतात. ते बाळाच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होतात. यातून डोळ्यात पू होऊन डोळे गेल्याची उदाहरणं आहेतबाळाची आंघोळ आईनं गोड हक्‍क समजून स्वतःकडे घ्यावी आणि हाताखाली कोणाला तरी मदतीला घेऊन ते काम करावं. बाळाला पायावर पालथं उलथं घेऊन, कढत पाण्यानं, चोळत आंघोळ घालणं आणि हातपाय ताणून, दाबून लांब करणं  व्यायाम होतो, असं म्हणत त्याच्या रडण्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही.

त्यापेक्षा टेबलावर टब ठेवून कोणाच्या तरी मदतीनं बाळाला आरामशीरपणे स्वच्छ केलं पाहिजे. आंघोळ घालतानाचं पाणी मध्यम कोमट असावं, हे कोपर बुडवून पहावं. बायकांच्या किंवा तुमच्या हाताला स्वयंपाकाचे चटके सहन करायची सवय झालेली असते म्हणून बोटं बुडवून पाहिल्यास खूप गरम पाणी कमी गरम वाटण्याची शक्यता असते.

आंघोळीनंतर लागणाऱ्या वस्तू म्हणजे कपडे, टॉवेल इ. आधीच गोळा केलेल्या असाव्यात. आंघोळीच्या वेळी नाक, डोळे, गळा, वळया, काखा, जांघा, शी शू च्या जागा स्वच्छ करण्याकडे कल असावा. आंघोळ घालताना विशिष्ट साबनानंच आंघोळ घालावी असं नाही. पण नाजूक त्वचेसाठी ग्लिसरीन साबण नेहमीच्या बेबी सोपपेक्षा सुध्दा चांगले असतात ते वापरावेत. आंघोळीनंतर बाळाला स्वच्छ, कोरडं करून, हवीत ती सौंदर्यप्रसाधनं बाहेरच्या बाहेर लावावीत.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon