Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

आईला स्तनपान देत येत नसेल तर..

बाळाला आईचं दुध पोषक असते. आईच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. पण हे दुध जर बाळाल मिळत नसेल तर बाळाला पोषक आहार मिळणार नाही. आईच्या स्तनाचे शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकिय कारणासाठी आई आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकत नसेल तर बाळाचे पोषण कसे होणार. तर आई स्वता: बाळाला स्तनपान न करता बाळ निरोगी आणि सुखी राहु शकतो का? तर याचं उत्तर होय आहे. ते कसे त्याचे काही पर्याय सांगणार आहोत

१. स्तनपानसाठी दाता शोधा

बाळाला आईचे स्तनपान उपलब्ध नसेल तर हा चांगला पर्याय आहे. दुध हेच बाळाचं सर्वात्तम आहार आहे. दत्तक आई आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकते. तसेच  डॉक्टरांच्या आणि काही संस्थांच्या मदतीने तुम्हांला बाळाला स्तनपानासाठी दत्तक आई आईचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो दत्तक माता बाळाला दुध दिल्यानंतर एका बाटलीत दुध घेऊन तेच दुध दिवसभर आपल्या बाळाला देऊ शकतो. नेमकं आपलं अडचण काय आहे हे सांगुन त्या मातेकडुन दुध घेता येते. हे दुध देणाऱ्या मातेला दुधाचं प्रवाह आणि नियंत्रण राहते. याचा फायदा त्या मातेला होतो. हे सगळ करताना त्या मातेचा ऋण विसरू नये. त्या मातेला लागणारा पोषक आहार द्यावा

 तज्ज्ञाचा सल्ला: आपण आपल्या बाळाला हे दुध देण्याआधी पाश्चराईज करून द्याव

२. घरगुती पोषक अन्न:

दत्तक मातेकडून बाळाला पुरेल एवढं दुध मिळेल असं नाही. दुध मिळत नसेल तर इतर उत्पादन मिळते. त्यांचे नियोजन करणं महत्वाचे आहे. काही आया घरी बाळाचे अन्न तयार करतात. अन्न बनवताना आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणे उत्तम राहिल. कोणता घटक किती प्रमाणात टाकावा. हे घटक टाकताना बाळाच्या आरोग्याशी काळजी घ्यावे. पचनास सोपा असेल त्या गोष्टी करा. हे सगळं करताना डॉक्टरांचा सल्ला महत्वाचे आहे. असे न केल्यास बाळाला त्रास होण्याची शक्यता असते.

३. विकतचा आहार

बाळासाठी बाजारात अनेक प्रकारचे तयार अन्न मिळते. बाहेरील अन्न घेताना योग्य प्रामाणित आणि परिक्षण केलेले असतं ते पडताळून घ्यावे. आपल्या बाळाला पोटाचा त्रास किंवा गँस इतर गोष्टींचा काळजी घ्यावा. बाळासाठी घरगुती आहार घेणार असाल किंवा तयार करत असाल तर कृती विषयी डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. याचा फायदा बाळासाठी नक्कीच होते.

कोणत्याही रासायनिक घटका शिवाय पोषक आहार तयार करा. हे करताना आईला बाळा विषयी काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या बाळाला स्तनपान शिवाय आहार देण्याचा विचार करत असाल तर  वरिल माहितीचा नक्कीच फायदा होईल. बाळाला पोषक असा आहार मिळेल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon