Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

आईच्या स्तनपानाच्या दुधाची एक्सपायरी डेट असते ? ती कशी !!!


आई होणे प्रत्येक स्त्री साठी मोठाच आनंदाचा क्षण असतो. आई झाल्यावर तिला तिच्या बाळाशिवाय तर काही सुचत नाही. आणि सर्वात जास्त आनंद तिला ज्यावेळी होतो जेव्हा ती आपल्या बाळाला स्तनपान करत असते. आणि आईचे दूध बाळासाठी अमृत मानले गेले आहे. आणि लहान बाळाला आईच दूध खूप पोषक आणि देणं खूप महत्वाचे असते. ह्यामुळे बाळाची इम्यून सिस्टम मजबूत होत असते. आणि आईचे आणि बाळाचे ऋणानुबंध ह्याचमुळे विकसित होत असते.

१) कंटेनर स्तनपानाचे दूध साठवण्यासाठी

अगोदर आणि काही वेळेस आताही आईला बाहेर जावे लागते तेव्हा तिला बाळाला सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करता येत नाही. पण आता तसे काही राहिले नाही, पण काही वेळेस स्त्रियांना खूप अशक्य होत असते. तेव्हा आईला आता कंटेनर मध्ये दूध साठवून ठेऊ शकते. अशी कंटेनर बाजारात मिळतात कि त्याच्याने आई आपले स्वतःचे दूध साठवून ठेऊ शकते. म्हणजे बाळाला आईचे दूध मिळेल.

पण तुम्हाला ह्यावेळेस एक प्रश्न पडला असेल की, जर स्तनपानाचे दूध साठवून ठेवू शकत असू तर त्याला एक्सपायरी डेट तर नक्कीच असेल. म्हणजे तेही खराब होत असेल तेव्हा त्यावेळी त्याविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला त्याविषयी सांगणार आहोत.

२) कसे ओळखायचे स्तनपानाचे दूध खराब झाले आहे असे ?

अगोदर दूध साठवण्यासाठी तुम्ही किती वेळ घेत आहात ते खूप महत्वाचे असते. जर तुम्ही तुमचे दूध चार पेक्षा जास्त तास साठवून ठेवले तर ते खराब होऊ शकते. ४ तासांपेक्षा जास्त साठवून ठेवलेले दूध तुमच्या बाळासाठी सुरक्षित नाही आहे.

३) जर तुमच्या बाळाला साठवून ठेवलेले दूध दिलेच आणि त्याने प्यायला नाही सांगितले तर समजून घ्यावे की, दुधाची टेस्ट खराब झाली आहे. म्हणून बाळाला दूध जबरदस्ती देऊ नये.

४) जर दूध बसलेले राहिले तर

सामान्य दुधासारखे स्तनपानाचे दूध जर खराब झाले तर बसून राहते किंवा फाटून जाते. तेव्हा हेही दूध असे होत असते. त्यासाठी तुमच्या दुधात वरची बाजू तरंगत असलेले काही दिसत असेल तर त्या दुधाला एकदा हलवून पहा आणि जर ते दुधात मिक्स झाले तर ठीक आहे आणि जर मिक्स झाले नाही तर समजून घ्यावे की, दूध खराब झाले आहे.

५) जर दूध खट्टे लागत असेल तर

कोणतीही आई बाळाला काही देण्याअगोदर स्वतःच त्याची चव घेत असते. आणि त्यानंतर ती बाळाला देत असते. तसेच हेही दूध बघून घ्यावे की, म्हणून जर तुम्हाला हे दूध खट्टे लागलेच तर समजून घ्या की, हे दूध बाळासाठी योग्य नाही. ते खराब झाले आहे.

६) जर दुधाचा वास येत असेल तर

जर साठवलेल्या दुधातून जर वास यायला लागला तर समजून घ्यावे की, दूध खराब झाले आहे. कारण दुधाची पौष्टिक तत्वे जर निघून गेलीत तर त्या दुधातून वास यायला लागतो. आणि ह्यातून समजून जाते की, हे दूध खराब झाले आहे.

७) ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या

स्तनपानाच्या दुधाला कधीच फ्रिजर मध्ये ठेवू नका. त्याला नॉर्मल फ्रिज मध्ये ठेवा.

१.१) ४ तासापेक्षा जास्त दुधाला साठवून ठेवू नका.

१.२) त्या स्तनपानाच्या दुधाला गरम करू नका, आणि जर तुम्हाला जर त्या दुधाला हलके गरम करायचे असेल तर कोणत्याही भांड्यात गरम पाणी घेऊन त्यावर ती बॉटलला ठेवून हलकी गरम करून घ्यायची.

१.३) दुधाला फ्रिज मध्ये ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की, त्याला पुन्हा -पुन्हा फ्रिज चा दरवाजा उघडण्याने त्याचे तापमान कमी -अधिक होऊन ते खराब होणार नाही.

ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जर तुम्हाला स्तनपानाचे दूध साठवून बाळाला द्यायचे असेल तर नक्कीच देऊ शकता. आणि ही गोष्ट खूप दुर्मिळ वेळेस उपयोगात आणा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon