Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

आई झाल्यानंतरचे काही गोष्टी.... मला हे अपेक्षित होते पण... (अनुभव)

       आई होणं ही  खुप  सुंदर गोष्ट आहेच, परंतु  प्रसूतीनंतर बऱ्याच बदलांना देखील समोर जावं लागतं.  बाळंतपणाबाबत पुष्कळशा कल्पना वास्तवात उतरत नाहीत. याबाबत तुमच्या मनाची तयारी असावी म्हणून आम्ही काही स्त्रियांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहोत त्यांनी कोणत्या गोष्टींची कल्पना केली होती आणि त्यांना कोणत्या वास्तवाचा सामना करावा लागला .

 १) मला वाटत होते की  बाळाला स्तनपान करणे म्हणजे अगदी सहज आणि आनंददायी असेल आणि सर्व काही विनात्रास,योग्यच आहे. पण बाळाला स्तनपान करणे मला खूपच कठीण गेले. कारण  बाळाचे डोके माझ्या स्तनांवर आदळत होते आणि तरीही त्याला दूध पाजण्याची माझी  धडपड सुरूच होती. '' शबाना ,३२, हैद्राबाद 

२) ''एक  सुपर मॉम होण्यासाठी नेमके काय करावे लागेल हे मला मातृत्वाच्या उपजत भावनेने आपोआप उमजेल अशी माझी अपेक्षा होती. वास्तवात ,मी घेतलेल्या माझ्या प्रत्येकनिर्णयाचे मी चिंतन करते आणि माझ्या मुलांना मी बिघडवत तर नाही या बाबतीत ही  साशंक असते.''  कृतिका ,२९,मुंबई

 ३) ''सुरुवातीच्या काही  आठवड्यानंतर सगळी छोटी बाळं रात्रभर झोपत असतील असे मला वाटत होते . माझी मुलगी आता २ वर्षांची झाल्यानंतर पूर्ण रात्र झोपते.'' 

 ४) आम्हाला बोलतांना ऐकून माझा मुलगा बोलायला शिकेल,असे मला वाटत होते,पण मला लक्षात आले आहे कि,प्रत्येक मुलाची मौखिक कौशल्ये वेगळ्या पध्दतीने विकसित होतात. घरात दोन वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असतील तर मुले गोंधळून जातात आणि बोलण्या साठी त्यांना जास्त वेळ लागतो.'' अस्मिता,२७,पुणे

  ५) ''आई होणे माझ्या सहज अंगवळणी पडेल असे मला वाटत असे-सकाळी लवकर उठणे,मुलांना तयार करणे,न्याहारी बनवणे,त्यांच्या सोबत खेळणे आणि हे सर्व करतानाच    तत्परतेने स्वयंपाक आणि घराची स्वच्छता सुद्धा ! मी दोन मुलांची आई आहे आणि आता मला जाणवते कि हे सर्व अगदीच सहज आणि सोपे नाही.- पद्मा,३६,बेंगलोर

  ६)'' मूल होणे हि गोष्ट  तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडवून आणते  हे मला समजले,पण माझ्यात यामुळे किती बदल झाला आहे याची जाणीव मला नव्हती.  पहिल्यादाच आई  झाल्यापासून  मी जास्त शांत आणि संयमी झाले ,ज्याचा माझे करियर आणि सर्व गोष्टींवर चांगला परिणाम झाला आहे.-आरती,३३,चेन्नई  

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon