Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

आई म्हणून या ७ गोष्टींसाठी अपराधी वाटून घेऊ नका

आई म्हणून तुम्ही अनेक गोष्टींमधून जाता. मानसिक आणि भावनिक हेलकाव्यांमधून अनेकदा जाता. आई असणे म्हणजे स्वतःचे वेगळे अस्तित्व विसरणे नव्हे. तुम्हाला नेहमी ‘परफेक्ट मॉम‘ बनण्यासाठी तणावाखाली असण्याची गरज नाही. एक आई म्हणून तुम्ही करत असलेल्या अनेक गोष्टी या पुरेश्या असतात. एखादी गोष्टी तुमच्याकडून करायची हुकल्यास त्यासाठी कुठलीही अपराधीपणाची भावना मनात बाळगू नका.

ह्या ७ गोष्टींसाठी तुम्ही अपराधी वाटून घ्यायची गरज नाही.

१. तुमच्या कामावर तुमचे जास्त प्रेम असणे.

तुमचे बाळ काही महिन्यांचे असेल किंवा वर्षांचे, तुमच्या मनात परत कामावर रजू होतांना अपराधीपणाचीच भावना असते. ती काढून टाका. तुम्हाला परिवार आहे, बाळ आहे आणि त्यांच्या योग्य भविष्यासाठीच तुम्ही हा निर्णय घेतला आहे. नेहमीच कुटुंब आणि नोकरी ह्यांकडे पर्यायासारखे बघितले जाते. नोकरी करणारी स्त्री सुद्धा उत्तमपणे कुटुंब सांभाळू शकते. त्यासाठी तुम्ही दिवसभर तुमच्या मुलांसोबतच घालवला पाहिजे असे नाही. स्वतः च्या कामावर प्रेम असणे हे चुकीचे नाही. याविषयी मनात असणारे गैरसमज आत्ताच दूर करून एक क्लिअर निर्णय घ्या.

२. स्वतः साठी थोडासा मोकळा वेळ काढणे.

जेंव्हा तुम्ही सारखे घरकामात, मुलांच्या संगोपनात आणि त्यांच्या कामांसाठी बिझी असता तेंव्हा थोडासा स्वतःचा वेळ काढणे जरा अवघड असते. आणि जेंव्हा तुम्हाला असा वेळ मिळतो तेंव्हा तुमच्या मनात निवांत बसण्याबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण होते.

पण स्वतः साठी थोडा निवांत वेळ काढून एखादे पुस्तक आणि कॉफीचा मग हातात घेऊन बसण्यात काहीही स्वार्थ नाही. उलट तुम्हाला मिळणारा हा एकांत तुम्हाला तुमच्या इतर कामांसाठी उर्जा देऊ शकतो. तुम्ही कुटुंबाची जशी काळजी घेता तशी स्वत:ची देखील घ्या.

३. मुलांना रागावणे.

असे अनेकदा होते की तुमचे पेशन्स संपतात आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही मुलांवर त्याच्या कृत्याबद्दल रागावता. मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. तुम्ही कधी त्यांना त्यांच्या खोडकरपणाविषयी रागालात तर त्यात न तुम्हाला आनंद मिळतो न मुलांना ते आवडते. पण शेवटी त्यांच्या भल्यासाठीच ही गोष्ट योग्य असते. जेंव्हा तुमच्यावर एकाच वेळी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि कामे असतात तेंव्हा प्रत्येक प्रसंग शांततेने हाताळण्याची अपेक्षा तुमच्याकडून नसते.

४. पुरेसा व्यायाम न करणे.

तुम्ही पूर्वी जेंव्हा व्यायाम करून एकदम फीट राहायचात ते दिवस तुम्हाला सतत आठवतात का ? काळजी करू नका. एवढ्या सगळ्या कामांच्या ओझ्यामागे तुमचा व्व्यायामाला वेळ देणे शक्य होत नसेल तर त्यात गैर काहीच नाही. तसेही, तुमच्या मुलांच्या मागे धावण्यातच पुरेसा व्यायाम होऊन जातो.!

५. मुलांना जंक फूड देणे.

तुम्ही अगदी उत्तमप्रकारे मुलांचे डाएट प्लान केलेले असते. सकाळी ब्रेकफास्ट ला उसळी, रोज एक फळ आणि अजून काही काही. तुमच्या पोषक आहारासोबत जर एखाद्या दिवशी मुले पिझ्झा आणि बर्गर खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना रोखणे तुमच्यासाठी अवघड जाते. तेंव्हा एखाद्या दिवशी पिझ्झा खाणे तुमच्या लाडक्यांना खूप लठ्ठ बनवणार नाही! तेंव्हा कधीतरी एखाद्या दिवशी हे चालते!

६. नवऱ्यासोबत थोडासा वेळ घालवणे.

तुमचे तुमच्या मुलांवर खूप खूप प्रेम आहे. त्यांच्यासाठी तुम्ही सगळे काही करता. पण एखाद्यावेळी नवऱ्यासोबत थोडासा ‘क्वालिटी टाईम’ घालवावासा वाटणे सुद्धा योग्यच आहे. तुमचे अख्खे जग मुलांभोवती फिरत नाही. मुलांच्या जन्मानंतर तुमच्या दोघांमधले नातेसुद्धा बरेच बदलले आहे . तेंव्हा हा वेळ जपणे योग्यच आहे.

७. मुलांसाठी प्रत्येक वेळी हजर नसणे.

कदाचित तुम्ही काही काळासाठी कामात बिझी असाल आणि त्यानंतर तुमचा एक ब्रेक घेण्याचा मूड असेल आणि तेंव्हाच तुमच्या पाल्यासंबंधी काही गोष्टींसाठी तुम्ही वेळ देऊ शकत नाही आहात तर ह्यात वाईट वाटणे साहजिक आहे. पण ह्यात चुकीचे काहीच नाही. तुम्ही एखाद्या वेळी मुलांसाठी हजर नाही आहात तर त्यात अपराधी वाटून घेऊ नका. खूप महत्वाचे काही नसल्यास स्वतःसाठी थोडीशी विश्रांती घेण्यास काहीच हरकत नाही. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon