Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

आई होण्यातला आनंद :अनुभवलेल्या, अनुभव घेणाऱ्या आणि इच्छा असलेल्या आईंसाठी


आई होणे हे या भुतलावरवे सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक कार्य आहे. पण तुम्ही आईला विचारा ती तुम्हाला हेच सांगेल की या सारखे दुसरे सुख नाही. आईची भुमिका फक्त अष्टपैलू व पाल्याचे संगोपन करणे एवढेच नसून हा खरोखरीच एक सुखद अनुभव आहे. या अनुभवाला कसलीच उपमा नाही जो पर्यंत तो तुम्ही स्वत: अनुभवत नाही. आपण सगळेच हे मान्य करतो की एकदा का आई झालात की तुम्हला नीट झोप मिळणार नाहीये, स्वत:चा वेळ मिळणार नाही, सुट्टया मिळणार नाहीये, कधी कधी तर नीट श्‍वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही, पण जेव्हा आम्ही काही मातांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले तेव्हा त्यांनी देखील हे कबूल केले की, आई होण्या मध्ये एक वेगळाच आनंद आणि खूप छान भावना आहेत. अशा काही मातांचे अनुभव तुमच्यासाठी

१)  स्वत:चे बालपण परत जगल्यासारखे वाटते 

 तुमच्या चिमुकल्याला घर भर रांगतना पाहून तुम्हाला तुमच्या बालपण आठवत. आपल्या घराच्या भिंती कोणत्या रंगाऱ्यानी रंगवल्या आहेत की आपल्या बाळानी याचा आपल्याला काही फरक पडत नाही, बरेच पालक दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य देतात. तुमच्या बाळानी तुम्हाला पहिल्यांदा आई किंवा बाबा अशी हाक मारणे यातला निखळ आनंद आपण खरच शब्दात व्यक्त नाही करू शकत.

२)  बाळाचे बोबडे बोल 

घरात लहान मुल असले की, ते तुम्हाला कायम व्यग्र ठेवते आणि तुमच्या मनातून निराशाचे, त्रासाचे विचार दूर ठेवते. तुम्ही जेव्हा कामावरून थकून घरी येता आणि तुमचे बाळ येऊन तुम्हाला बिलगते आणि दिवसभरात त्यानी काय काय केले हे त्याच्या बोबड्या भाषेत तुम्हाला सांगू लागते तेव्हा सगळा थकवा निघून जातो. त्यांचे हासणे, खिदळणे खोटे खोटे रुसणे बघितले की वाटते तुमच्या जगात कोणताच असा मोठा प्रश्‍न नाहीये जो त्यावेळी लगेच सोडवला पाहीजे.

३)  जीवनात काही तरी उद्देश सापडणे 

 आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, नवरा बायको कामात एवढे गढून गेले आहेत की त्याना एकमेकांबरोबर घालवायला, बोलायला वेळ मिळत नाही. अशातच जर का तुमच्या आयुष्यात बाळाचे आगमन झाले तर त्याच्या अस्तित्वाने तुमचा वेग अपोआपच मंदावतो आणि यामुळेच तुमच्या नात्याला एक नवीन अर्थ मिळतो. घरात लहान मुल असल्याने तुम्हाला रोज सकाळी उठण्याचे नवीन कारण मिळते आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता ज्या तुम्ही क्वचितच केल्या असत्या.

४)  कायम तरूण आणि जिज्ञासू रहाणे 

 मुलांच्या मनात कायमच असंख्य प्रश्‍न असतात. ते कायमच सगळ्या बाबतीत उत्सुक असतात. मुलं त्यांना असलेल्या उत्सुकतेचे चिंतनच करत नाहीत तर बऱ्याचदा आपल्या ज्ञानसागरात देखील भर घालतात. मुलांच्या मागे धावत असल्यानी तुम्ही फक्त मानसिक दॄष्टया सावध राहत नाही तर शाररिक दॄष्टया देखील चपळ होतात.

५) परिस्थितीशी जुळवून घेणे

  काही वेळा असे होऊ शकते की, तुमच्या पाल्याला शाळेत एखाद्या कठीण प्रश्‍नांना किंवा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. ते फार गंभीर नसतील, पण त्यांचे निराकरण करताना आपल्याला स्वत:च्या आयुष्यात उद्भवणाऱ्या प्रसंगाना कसे सामोरे जावे या बाबत माहिती मिळते. आई होण्यातला जो आनंद आहे त्यानी स्वत:लाच खूप बरे वाटते व तुम्ही माणूस म्हणून चांगले होण्यास मदतीसाठी कायम पुढे येता. असे यामुळे घडते कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हा तुमच्या अवती भवतीच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसायला लगतात. आई होण्यातला आनंद खरंच अनुभव इतका सर्वांग अंर्तबाह्य आहे की आपण कितीही ठरवले तरी त्यातल्या भावना शब्दात मांडून एका कागदावर नाही उतरवू शकत, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समजू शकत नाही. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon