Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

आहारात हा छोटासा बदल कराच !


बऱ्याच डॉक्टरांकडून माहिती मिळते की, सध्या किडनी, रक्तदाबासंबंधी, आणि वजन वाढण्याबाबत समस्या आहेत. आणि ह्याबाबत आहारातल्या एक घटक खूप महत्वाचा आहे. आणि तो म्हणजे मीठ. रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत खूप डॉक्टरांचे आहे.विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

१) देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.

२) २५ ते ३० वयोगटातील किडनी रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो. किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे.

३) मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठ सेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो. आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे.

४) लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत.

५) कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका.

६) वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

असे छोटे - छोटे बदल केल्याने आयुष्याच्या वाईट घडामोडीपासून आपण वाचू शकतो.

ब्लॉग आवडला तर नक्कीच शेअर करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon