Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

एका स्त्रीसाठीच आई होणं म्हणजे तिच्यासाठी ते किती आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे स्त्रीला तिच्या आरोग्यबारोबर प्रजननाच्या आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचे असते. परंतु काही कारणास्तव स्त्रीला गर्भधारणा होण्यास अडथळा येत असतो. हा येणार अडथळा कोणत्या कारणांमुळे येत आहे, हे लवकरात लवकर जाणून न घेतल्यास वंधत्वच्या समस्येला सामोरे  द्यावे लागते. म्हणून दैनंदिन जीवनात पुढील काही लक्षणे आढळ्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करत त्यावर वेळीच उपचार घेणे आवश्यक असते  

१. (गर्भाशयातून) अतिरिक्त रक्तस्त्राव

साधारणपणे फायब्रॉईड हे अश्याप्रकारच्या असामान्य गर्भाशयाच्या रक्तस्त्रावाचे कारण असण्याची शक्यता असते. फाइब्रॉइड गर्भाशयात स्नायूंच्या ऊतींचे जास्त प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे फायब्रॉईडच्या सामान्य ट्युमरची निर्मिती होते होते. हे फायब्रॉइड्स हे देखील वंध्यत्व एक कारण असण्याची दाट शक्यता असते.यासाठी उपचार घेणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्वाचे आहे.

२. चेहऱ्यावरील केसांची अतिरिक्त वाढ

टेस्टोस्टेरॉन हार्मोन जे पुरुष सेक्स हार्मोन म्हणून ओळखले जाते, हे अत्यल्प प्रमाणात स्त्रियांमध्ये देखील असते. या टेस्टोस्टेरोनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आपल्याला सामान्यतःचेहऱ्यावर विशेषतः वरच्या ओठ किंवा हनुवटीवर. आपण आपल्या किंवा छातीवर आणि ओटीपोटात भागात होणाऱ्या या अतिरिक्त केसांची वाढ सुरु होणे. ही लक्षणे संप्रेरकांचे म्हणजेच हार्मोन्सच्या असंतुलन दर्शवते. गरोदर राहण्यासाठी या हार्मोनल असंतुलनच्या बाबतीत प्रथम उपचार करणे आवश्यक असते.

३. मासिकपाळी न येणे किंवा अनियमित येणे

हो…. गरोदर राहण्यासाठी नियमित मासिकपाळी येणे आवश्यक असते. प काही स्त्रियांना मासिकपाळी येत नाही किंवा अनियमित येते. अनके महिन्यांच्या अंतराने येणारी मासिकपाळी हे देखील स्त्रियांमधील इन्फर्टिलिटीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे मासिकपाळीच्या बाबतीत जर अनियमित आढळून आल्यास किंवा २,किंवा ३ महिन्यांच्या अंतराने येणे असे प्रकार घडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

४. पाठदुखी आणि ओटीपोटात किंवा पोटात दुखणे

पाठदुखी आणि ओटीपोटात दुखणे हे पीआयडीचे लक्षण आहे. पी आय डी मुळे मेदयुक्त उती या फॅलोपियन ट्यूबल्समध्ये मध्ये तयार होतात. आणि या उती गर्भधारणेसाठी अडथळा निर्माण करतात. .प्रत्यक्षात असे दिसून आले आहे की पीआयडीच्या 10 पैकी 1 प्रकरणांमध्ये वंध्यत्वाचा शक्यता असते आणि त्यामुळे लवकर उपचार घेणं गरजेचे असते. यामध्ये दीर्घकाळ उपचार चालण्याची शक्यता असते.

५. संभोगाच्या दरम्यान होणाऱ्या अतिरिक्त वेदना

संभोग हा वेदनामय नसावा. पण जर संभोगाच्या दरम्यान आणि संभोगानंतर देखील वेदना जाणवत असेल तर एंडोमेट्रिओसिस ही समस्या असू शकते. ही परिस्थिती वंध्यत्वचे एक प्रमुख कारण  म्हणून ओळखले जाते.तसेच संभोगानंतर जर पोटातील आतड्यांच्या भागात जर वेदना होत असतील किंवा काही वेगळे तरी काहीतरी घडते आहे असे वाटले तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon