Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

पीसीव्ही (लसी)बाबत माहिती असाव्यात अश्या गोष्टी

एक पालक म्हणून बाळाला तुम्ही बाळाला कायम सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही धडपडत असता. आणि तुमच्या बाळाला सगळ्या सर्वोत्तम गोष्टी मिळाव्या यासाठी प्रयत्न करत असता. अगदी डायपर,ते कार सीट पर्यंत सगळं काही.  बाळाच्या सुरक्षेसाठी एका आणखी महत्वाची गोष्टं करणे गरजेचे असते ते म्हणजे बाळाच्या लसीकरणाच्या वेळा पाळणं

लसीकरण तुमच्या बाळाला निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवतं. तसेच ते लसिकरणामुळे टाळल्या जाणाऱ्या गंभीर आजार आणि गुंतागुंतीच्या समस्या पासून वाचवत. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून यालसीकरणानें लाखो जीव वाचवून आजारांचा प्रादुर्भाव थांबवला आहे. न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन (वॅक्सीन-लस; Pneumococcal Conjugate vaccine) म्हणजेच पीसीव्ही ही  देखील बाळाच्या लसींमधील एक महत्वाची लस आहे.

न्यूमोकोकल डिसीज (Pneumococcal disease) म्हणजे काय?

न्यूमोकोकल डिसीज किंवा इन्फेक्शन हे ‘बॅक्टेरिअम स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया (bacterium Streptococcus pneumonia)’ या बॅक्टेरिआमुळे होते. यामुळे न्यूमोनिया, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन, ब्लड सेप्टीकेमिया  (blood septicaemia- एक प्रकारचं रक्ताचं दुषितीकरण/विषबाधा), मज्जारज्जू आणि मेंदूचा संदर्भातील आजार होतात यामुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा होणे किंवा मृत्यूही संभवतो.

पीसीव्ही काय करते ?

न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन (PCV किंवा PCV13) हे १३ प्रकारच्या न्यूमोकोकल बॅक्टेरिआ आणि न्यूमोकोकल रोगांपासून संरक्षण करते. PCV या लसी  मळे एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला रोगांची लागण होण्याचा धोकाही टळतो.

पीसीव्हीच का?

PVC न्यूमोकोकल रोगांना कमीत कमी ३ वर्षांसाठी दूर ठेवते. बॅक्टेरिआचे काही उपप्रकार पेनिसिलीन आणि अन्य काही औषधांना दाद देत नाहीत. याचमुळे PCV ही लहान मुले आणि प्रौढांसाठी एक महत्वाची लस ठरते.

लसीकरण कोणी करून घ्यावे?

न्यूमोकोकल रोगविरोधी लसीकरण कोणीही करून घेऊ शकतं. मात्र या ४ वयोगटातील लोकांनी नक्कीच हे लसीकरण करून घ्यावं:

- २, ४ आणि १२ ते १४ महिने वयोगटातील बालके

- ६५ पेक्षा जास्त वय असणारे प्रौढ

- दीर्घकाळ आजारी असणारे २-६५ या वयोगटातील कोणीही

- काही विशिष्ट होणाऱ्या कामामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असणारे, उदा. वेल्डर्स

PCVचे साईड इफेक्ट्स

PCVमुळे सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणे(reaction) पुढीलप्रमाणे

- इंजेक्शन दिलेला भाग लालसर किंवा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होणे

- इंजेक्शन दिलेला भाग सुजणे

- गुंगी येणे

- भूक न लागणे

- फझीनेस (चिडचिड)

- उलट्या होणे

- कणकण/ताप

प्रौढ व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे:

- इंजेक्शन दिलेला भाग लालसर होणे/दुखणे/सुजणे

- कणकण/ताप

- थकवा

- डोकेदुखी

- थंडी वाजून येणे/ अंगदुखी

लसीकरणानंतर गंभीर लक्षणे दिसल्यास काय?

गंभीर स्वरुपाची लक्षणे (reactions) या लसीच्या ऍलर्जीमुळे होऊ शकतात. त्याचबरोबर जास्त ताप आणि नेहमीपेक्षा वेगळी वागणूक, पुरळ किंवा मुरूम, घशाला किंवा चेहऱ्याला सूज, श्वसनास त्रास, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, गुंगी आणि अशक्तपणा, इ. लक्षणे दिसू शकतात. हे लसीकरणानंतरच्या काही मिनिटात ते काही तासात कधीही होऊ शकते. ही लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लसीचा डोस चुकल्यास काय करावे?

जर एक वर्षाखालील बाळाचा या लसीचाचा डोस चुकल्यास त्यांना उरलेले डोस दर दोन महिन्याआड द्यावेत. जर एक ते दोन वर्षं वयोगटातील बाळाचा डोस राहिल्यास त्यांना PCVचा एक सिंगल डोस देण्यात येतो. दोन ते पाच वर्षं वयोगटातील बाळाचा डोस राहिल्यास त्यांनाही PCVचा एक सिंगल डोस दिला जाऊ शकतो. हे मात्र जर मुलास न्यूमोकोकल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असल्यासच करतात . जर एखाद्या प्रौढ व्यक्तीचा डोस चुकला असेल तर त्या व्यक्तीने डोस पूर्ण करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon