Link copied!
Sign in / Sign up
80
Shares

नवमातांनी लोकांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे!

स्त्री आयुष्यात मुलगी, बहीण , पत्नी अश्या अनेक भूमिका निभावत असते, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आईची.आपण अनेक ठिकाणी असे वाचतो किंवा ऐकतो मी आहेत ज्यामध्ये प्रत्येकजण, नवजात बाळाच्या आईच्या तिच्या बाळाच्या संगोपनविषयी शंका घेत असतात. तिला सतत काहीतरी टोमणे मारत असतात अगदी मित्र मैत्रीण, शेजारी आणि अगदी तिच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा.

 यामध्ये सर्वप्रथम,  हे लक्षात घेण्याची आवश्यकता असते की प्रसुतिनंतर स्त्री असह्य वेदनातून जात असताना, ती आपल्या शरीराच्या वेदना विसरून बाळाला सांभाळायचा प्रयत्न करत असते. तिला तिची रोजची कामे करताना त्रास होत असतो . तिच्या शरीराला पूर्ववत होण्यासाठी काही महिने लागतात. तसेच सी-सेक्शन प्रसूतीमध्ये तर वर्ष देखील लागू शकते. रोजची व्यग्र दिनचर्या सांभाळत-सांभाळता तिच्या नाकी नऊ येत असतात.  आणि अश्यावेळी तिच्यावर बाळाच्या सांगोपनाविषयक शंका घेऊन दुखावणे हे चुकीचे आहे. पुढे अश्या काही गोष्टी सांगितल्या आहेत,ज्या नवमातांना बऱ्याच वेळा ऐकायला लागतात.

१. स्तनपानबाबत बोलणे

जर बाळाला नीट दुध पिता येत नसेल किंवा सुरवातीला जर बाळाला दूध पाजताना त्रास होत असले आणि बाळाचे पोट भरत नसेल तर, जर तुम्ही वरचे दूध द्यायला सुरवात केली तर त्यामागचे कारण न जाणून घेता आईला कमी दूध येते आणि बाळाचे पोट भरत नाही. गरोदरपणात दुर्लक्ष केले म्हणून असे झाले अशी दूषणे लावणे सुरु करतात. पण नक्की काय समस्या आहे हे कोणी जाणून घेत नाही.

तसेच आईचे कपडे दुधाने सतत ओले होत असतील, तर आई योग्य प्रमाणात बाळाला स्तनपान देत असा आरोप करण्यात येतो. आणि बाळाला सतत दूध पाजले तरी देखील बाळाला सतत स्तनपान करू नये असे देखील सल्ले तेच लोक द्यायला कमी करत नाही. अश्यावेळी कमी दूध येत असेल, बाळाला कसे दूध पाजायचे,किती वेळा पाजायचे हे कळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . कोण काय बोलते याकडे दुर्लक्ष करावे तुमच्या बाळाचे पोट भरते ना यावर फक्त लक्ष द्यावे.

२. कामावर जाण्याबाबत टोमणे

आजची आई ही दुहेरी भूमिका निभावत असते. आपले काम आपले करियर आणि एक आई म्हणून अश्या दोन भूमिका तिला प्रसूतीनंतर निभवायच्या असतात. जर आईने काही महिन्यात कामावर जायला सुरवात केली तर लगेच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. बाळाला सोडून कामावर काय जातेस, बाळा पेक्षा काम महत्वाचे आहे का ? या मध्ये आई बाळाला सोडून जाताना तिची काय मनस्थिती होत असते हे तिलाच माहिती असते. परंतु तिला आपले करियर सोडून देणे देखील शक्य नसते. याबाबत तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. परंतु असे करताना तुम्ही कामावर जाण्या इतपत बऱ्या झाला आहात का ? बाळाची काळजी घ्यायला योग्य व्यक्तीची निवड केली आहे ना ? तसेच बाळाला जर अचानक तुमची गरज पडली तर तुम्ही त्याच्या पर्यंत कसे पोहचाल ? याबाबत तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने चर्चा करणे आणि काळजी घेणे आवश्यक असते.

३. बाळाचे आरोग्य

होय, याबाबत बहुतेक वेळा फक्त आईला जबाबदार धरण्यात येते. हे खरं आहे की बाळाच्या आरोग्याबाबत सगळ्यात जास्त माहिती आईला असते. त्याला होणाऱ्या त्रासाबाबत देखील तिला माहिती असते. आणि प्रत्येक आई आपल्या सर्वतोपरीने बाळाच्या आरोग्याबाबत काळजी घेत असते. साथ किंवा हवामान बदल किंवा अश्या अनेक कारणांनी बाळ आजारी पडण्याची शक्यता असते. बाळाची सगळ्यात जास्त काळीज आईला असते. याबाबत वाईट वाटून घेऊ नका यात तुमची काही चूक नसते, फक्त ज्यावेळी बाळ स्तनपान करत असते त्यावेळी तुम्ही पोषक आहार घेणे गरजेचे असते तसेच बाळांमध्ये  काही वेगळी लक्षणे आढळ्यास त्याबाबत त्वरित डॉक्टरांना सांगणे गरजेचे असते. तसेच याबाबत  डॉक्टरांचा सल्ला मानणे गरजचे असते. 

हे लक्षात घ्या...लोक काही टोमणे मारतील हवं ते बोलतील आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बाळाची आणि स्वतःची काळजी घेण्यावर भर देणे गरजेचे असते. यामध्ये पतीची साथ मिळाली तर उत्तम. तसेच या दरम्यान काही जुनी जाणती लोकांचे सल्ले  लक्षात घेणे आवश्यक असते. तसेच डॉक्टरांकडून  प्रत्येक शंकेचं निरसन करणे आवश्यक असते. त्यामुळे सतत डॉक्टरांच्या संपर्कत राहा. आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon