Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

बाहेर असताना तुमच्या मुलांचा हट्टीपणा कसा सांभाळाल

जितके गोड आणि निरागस, तितकेच बदमाश आणि आगाऊ बनून पण मुले तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यांना मनाप्रमाणे गोष्टी करून घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळे आपण असे कोणत्या ठिकाणी करत आहोत याचे भान त्यांना राहात नाही. कदाचित तुमच्यासोबत सुद्धा असे याआधी घडलेले असेल. बाहेर असतांना मुलांचा हट्टीपणा आणि नखरे खूप त्रासदायक ठरू शकतात. त्यांना सांभाळतांना तुमच्या नाकी-नऊ येते, पण आम्ही तुमच्यासाठी अशी परिस्थिती सांभाळण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

१. अंदाज घ्या.

काय झाल्याने मुले चिडचिड करतील किंवा रडायला लागतील याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. अनेकदा भूक लागणे, मोठ्ठा आवाज, थकवा येणे, अनोळखी व्यक्ती अशा गोष्टींमुळे मुले त्रास होऊन रडायला किंवा चिडचिड करायला लागतात. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तिथे या गोष्टी आहेत का याचा पूर्वीच अंदाज घ्या. म्हणजे मॉल मध्ये गेल्यास बरीच खेळणी असतात, नातेवाईकांकडे गेल्यास नवीन वातावरण असते, दुकानात गेल्यास खायचे नवीन पदार्थ असतात, पार्कात अनोळखी माणसे असतात. अशावेळी नखरे करणे, हट्ट करणे, चिडचिड करणे अशा गोष्टी मुले होणाऱ्या असहजतेमुळे करतात. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास त्याच्या मागचे कारण तुम्हाला माहित होईल. तेंव्हा आधीच अंदाज घेऊन त्याप्रमाणे तयार राहा.

२. प्रतिबंध.

जर तुम्हाला मुलांच्या अशा वागण्याचा अंदाज आला असेल तर आधीच त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक ठरू नये म्हणून काळजी घ्या आणि थांबवा. म्हणजेच तुम्हाला कारणांचा अंदाज घेतांना त्याचे उपाय देखील शोधायचे आहेत. जर तुम्हाला दिवसभर बाहेर राहायचे असेल तर खाद्यपदार्थ आणि पुरेसे पाणी जवळ राहू दया. मुलांचे पोट भरलेले असले की मन शांत राहते आणि ते जास्त चिडचिड करत नाहीत. त्यांची बाहेर जाण्याआधी पुरेशी झोप होणे देखील तितकेच गरजेचे आहे. वाटल्यास मुलांचे आवडते खेळणे त्यांच्या हातात दया जेणेकरून त्यांना बाहेर असतांना कंटाळा येणार नाही.

३. कडक वागा.

लहान मुलांचा हट्टीपणा सांभाळतांना कडकपणे वागा. प्रत्येकवेळी त्यांचे नखरे ऐकून घेणे आणि हट्ट पुरवणे त्यांच्या अशा वागण्याला अजून प्रोत्साहित करते. तुम्ही दर वेळी त्यांचे ऐकून घेतल्यास - चिडचिड केल्याने किंवा हट्ट केल्याने हवे ते मिळते - असे त्यांना वाटेल आणि कदाचित भविष्यात तुम्हाला त्यांच्या अशा अनेक नखर्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही एखाद्या विषयावर कडक शिस्तीने वागलात आणि त्यांच्या रडण्याला किंवा हट्ट करण्याला न जुमानता तुम्ही परिस्थिती हाताळलीत तर असे वागल्याने काहीच उपयोग होत नाही हे त्यांच्या मनावर बिंबवले जाईल. आजूबाजूच्या अनेक गोष्टींना लहान मुले आत्मसात करत असतात.

 

३. मायेने देखील वागा.

कडक शिस्तीने वागणे जेवढे महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे की तुम्ही त्यांच्या या हट्टीपणाच्या मागचे कारण जाणून घेणे. मुलांच्या बाबतीत संवेदनशील होणे पण कधी कधी गरजेचे असते. त्यांचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या आणि त्यांना प्रेमाने समजावा. असे केल्याने देखील लहान मुले अनेकदा शांत होतात आणि तुम्ही त्यांच्या समस्येविषयी जाणून घेत आहात हे पाहून त्यांचा तुमच्याविषयी विश्वास वाढतो. आणखी म्हणजे मुलांना एखाद्या गोष्टीसाठी सरळ नकार देण्याऐवजी असे केल्याने तुम्हाला त्यांच्या वागण्यामागचे खरे कारण कळू शकेल.

४. खंबीर राहा.

एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी शिकणे गरजेचे आहे ती म्हणजे लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करणे. तुम्ही एखादया सर्वाजानिक ठिकाणी असाल आणि तुमचे मुल आरडा-ओरडा करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल तर साहजिक आहे की लोकं तुमच्याकडे बघणार. अशावेळी सगळे तुमच्याकडे बघत असतांना लाजिरवाणे वाटणे सुद्धा साहजिक आहे. अनेक पालाक अशा प्रसंगावेळी आपल्या मुलांना रागावतात. लक्षात घ्या की शेवटी तुमचे मुल हेच तुमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे. इतर अनोळखी लोकांचे मत नाही. गरजेचे आहे की तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीचा त्रास आहे आणि तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्याची समस्या दूर करावी. लहान मुले नैसर्गिकपणे हट्ट करतात आणि तुम्ही त्यासाठी क्षम्य असणे गरजेचे नाही. तुमचा राग लहान मुलांवर अशावेळी काढू नका आणि परिस्थिती प्रगल्भपणे हाताळा.

५. नियम

घराबाहेर पडतांना मुलांना आधीच सगळे नियम सांगा. मुलांनी कशाप्रकारे वागायचे आहे आणि त्यांचे कोणते हट्ट आणि कशाप्रकारचे वागणे खपवून घेतले जाणार नाही त्याबद्दल त्यांना स्पष्ट आधीच सांगा. जर हे नियम त्यांच्याकडून तोडण्यात आले तर काय शिक्षा होऊ शकते हे देखील त्यांना माहित असायला हवे जेणेकरून कसे वागायचे हे ते लक्षात ठेवतील. जर नियम मोडल्यास तुम्ही त्यांना रागावू शकता. जर असे नखरे बाहेर यायला लागल्यास त्यांना त्याच्या परिणामांबद्दल परत आठवण करून दया.

६. शेवटचा उपाय.

तुमच्या लक्षात आले की, आता या परिस्थितीबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही आणि हे हाताबाहेर गेले आहे तर जाऊ दया. कधी कधी जाऊ देणे पण गरजेचे असते. मुलांना अशावेळी त्या परिस्थितीपासून दूर न्या कदाचित त्यांचे रडणे बंद होईल. दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला स्पष्टपणे परत विचार करता येईल. याबाबतीत तुमची हार झाली असे समजू नका. मुले स्वतः च अनेकदा त्यांचा राग दूर करतात. त्यांना थोडे प्रेम दाखवा आणि सगळे निट होईल अशी आशा दया. मुले प्रेमाने सांगितलेले ऐकतात किंवा नंतर थोड्यावेळाने काही नवीन दिसले की राग विसरून जातात.

काहीवेळा लहान मुलांचा राग, त्यांचे रडणे, हट्टीपणा किंवा नखरे सांभाळणे सोप्पे असते आणि कधी कधी अवघड. पण तुम्ही तुमचा पारा चढू देऊ नका. तुमचा शांतीभंग झाल्यास परिस्थिती अजून चिघळेल. शांत राहून व्यवस्थित मुलांना समजवा. अनेकदा हे दिसते तितकेपण अवघड नसते. ट्राय तर करा !

उत्तम पालकत्व निभावण्यासाठी तुम्हाला शुभेछा!   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon