Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

हस्तमैथुन म्हणजे काय आणि त्या विषयांचे समज-गैरसमज?

          आपल्याकडे लैंगिक शिक्षणाबाबत योग्य प्रमाणात जागरूकता नसल्याने याविषयी आजही भरपूर गैरसमज समाजामध्ये दिसून येतात. हस्तमैथुन याविषयीसुद्धा अशाच प्रकारचे विविध समज-गैरसमज लोकांमध्ये पाहायला मिळतात. याबाबत काही माहिती सांगणार आहोत जी कदाचित तुमच्या बऱ्याच शंकाचे निरसन करेल.

हस्तमैथुन किती वेळा करणे योग्य असते

हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

हस्तमैथुन म्हणजे काय ?

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे,. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात.स्वतःच्या हाताने केलेला प्रणय म्हणजे हस्तमैथुन होय. यात स्त्री अथवा पुरुष त्याच्या लैंगिक अवयवाला उत्तेजीत करतात, त्याद्वारे लैंगिक उत्कट बिंदू गाठला जातो ज्याला हस्तमैथुन म्हणतात.

हस्तमैथुनाबाबत गैरसमज
१. शारीरिक कमजोरी

हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते किंवा तुमची लैंगिक शक्तीचा ऱ्हास होतो, असे बऱ्याच लोकांना वाटत असते. वास्तवात असे काहीही होत नाही. कारण तुमच्या शरीरात साठलेले अतिरिक्त विर्य याद्वारे बाहेर टाकले जाते. तुम्ही ही क्रिया केली नाही तरी नैसर्गिकरीत्या विर्य बाहेर टाकण्याचे काम शरीर करत असते. ज्याला काहीजण स्वप्नदोष असेही म्हणतात. त्यामुळे हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी येत नाही.

२. प्रजनन क्षमता कमी होणे

हस्तमैथुन केल्याने विर्य संपून जाते किंवा स्त्रीयांमधील प्रजनन क्षमता कमी होते, असा गैरसमज आहे. पुरुषाच्या शरीरात जसे इतर घटक तयार होतात तसेच विर्यही तयार होत असते. त्यामुळे ते संपण्याचा प्रश्नच येत नाही. उलट हस्तमैथुन केल्याने साठलेले विर्य बाहेर फेकले गेल्याने नवीन विर्याची शरीरात निर्मिती होते. जी प्रजननासाठी फायदेशीरच आहे.

तसेच लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही, हे सर्व गैरसमज आहेत.

३. स्त्री-पुरुषांमधील प्रमाण

स्त्री आणि पुरुष दोघेही हस्तमैथुन करतात. फक्त पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांमधील हस्तमैथुन करण्याचे प्रमाण कमी आहे. स्त्रियांच्या बाबतीत हस्तमैथुन ही नैसर्गिक गोष्ट आहे, स्वतःच स्वतःला काबूत ठेवणारी अशी ही बाब आहे. त्यामुळे अल्पकाळ का असेना पण यातून त्यांना आनंद मिळतो. या एवढ्याशा सुखाने देखील आयुष्यात बराच फरक पडत असतो.

ही काळजी घेणे आवश्यक आहे.

हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घ्या. . हस्तमैथुन करताना कोणत्या वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ नये याची काळजी घ्या. .

महत्वाचे

हस्तमैथुन करणे अजिबात चुकीचे किंवा पाप नाही. ती एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे सुख मिळत असते. तुमचे मन भरकटण्यापासून मदत होते. जोडीदार नसताना या क्रियेद्वारे तुम्ही तुमची शारीरिक गरज भागवू शकता. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे चुकीचे आहे. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही, हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon