Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

अति प्रमाणात केसांचे स्ट्रेटनिंग केल्यामुळे हे दुष्परिणाम होतात.

सौदर्यांचे काही निकष मानले जातात त्यात लांबसडक, काळेभोर, सरळ केसही आलेच. अर्थात केस लांबसडक असो किंवा छोटे असो त्यावर काही ना काही स्टाईल केली जाते. अगदी वेण्यांचे प्रकारापासून मोकले सोडण्यापर्यंत अनेक प्रकार केले जातात. केस मोकळे सोडताना ते सरळ हवे असा हट्टच असतो काही जणींचा. अधुनिक सौदर्योपचारात अनेकविध प्रकारे स्टाईलही केल्या जातात आणि त्यासाठी विविध उपचार केले जातात. स्ट्रेटनिंग हा त्यापैकी एक लोकप्रिय प्रकार. कोणत्याही अनैसर्गिक गोष्टींचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. कारण या उपचारांमध्ये थोडीतरी रसायने वापरली जातात किंवा ते करताना काही रसायने बाहेर पडतात त्यामुळे साहाजिकच केस खराब होतात.

स्ट्रेटनिंग मुळे केस अगदी सरळसोट दिसत असले तरीही अशा केसांची काळजीही घ्यावी लागते. शिवाय त्याचे काही दुष्परिणाम होतात.

स्ट्रेटनिंगचे दुष्परिणाम-

कोरडे केस

स्ट्रेटनिंग दिसायला आकर्षक दिसले तरी त्याचा एक दुष्परिणाम लगेचच केसावर दिसतो तो म्हणजे केस अत्यंत कोरडे होतात. स्ट्रेटनिंग करताना उष्णता आणि रसायने यांचा वापर करावाच लागतो. पण त्यामुळे केसातील नैसर्गिक तेले प्रभावित होतात. केसांची लवचिकता, मऊपणा कमी होतो. त्यामुळे केस रुक्ष आणि गुंतलेले दिसतात.

कुरळेपणा-

स्ट्रेटनिंग करताना केस कोरडे पडतात त्यामुळे ते कुरळे होतात त्याहीपेक्षा विस्कटल्यासारखे दिसतात. त्यामुळे स्ट्रेटनिंगने मिळालेला चांगला लूक खराब होतो. असे केस नीट लावणे किंवा त्यांची देखभालही अवघड असते. हवाही जर कोरडी असेल तर केसाची अवस्था अजूनच जास्त खराब होते. सतत स्ट्रेटनिंग केल्याने हे दुष्परिणाम वाढतात त्यामुळे स्ट्रेटनिंग न करता केसाला कंडिशनर लावावे. केसाचे पोषण होऊन ते मऊ होण्यासाठी केसाला हेअर मास्कही लावता येतो.

केस तुटतात.

केस गळणे-

हेअर स्ट्रेटनिंगचा हा सर्वात वाईट परिणाम म्हणून केस गळणे याकडे पहावे लागेल. अगदी योग्य काळजी घेऊनही आणि स्वच्छता राखूनही केस गळण्याची समस्या स्ट्रेटनिंग मध्ये जाणवू शकते. केस सरळ करण्यासाठी हॉट आयर्न वापरली जाते त्यामुळे केसाच्या उतींना धक्का बसतो त्यामुळे केस गळती सुरु होते. एकदा केस गळायला सुरुवात झाली की मग पुन्हा पूर्ववत होण्यास नक्कीच जास्त कालावधी लागतो. तसेच केसाला फुटी फुटण्याचे प्रमाणही वाढते. जास्त वेळा केस qवचरणे, सतत ड्रायरचा वापर करणे, ओल्या केसाची स्टाईल केल्याने केसाला फुटी फुटतात.

चमकहीन केस-

स्ट्रेटनिंग केल्याने केसाची चमक कमी होते. केस कोरडे पडल्याने चमकही कमी होते आणि ते निरोगीही दिसत नाहीत. डोक्याची त्वचा कोरडी पडल्याने नैसर्गिक तेलही कमी प्रमाणात बाहेर पडते. केसाचा मऊपणा कमी झाल्याने केस कोरडे आणि निर्जिव दिसू लागतात. केसाला नैसर्गिक चमक येण्यासाठी अव्हाकाडो तेल किंवा अॅकप्पल सायडर व्हिनेगर लावावे.

डोक्याला खाज-

स्ट्रेटनिंग करतान केसाचा नैसर्गिक पोत बदलावा लागतो त्यासाठी रसायने वापरावी लागतात. पण या रसायनांच्या वापराचा दुष्परिणाम म्हणजे डोक्याच्या त्वचेला खाज सुटते आणि कोंडा जास्त प्रमाणात होतो. त्याशिवाय डोक्याच्या त्वचेमधून नैसर्गिक तेल बाहेर पडतच असते त्याचा या कोंड्याशी संपर्क होऊन संसर्ग होण्याचा धोकाही असतो. काही वेळा बुरशीजन्य संसर्गही होतो. अशा वेळी त्वचारोग तज्ज्ञ किंवा हेअर एक्सपर्टचा सल्ला घ्यावा लागतो.

अंगाची जळजळ-

स्ट्रेटनिंग केल्याने फॉर्मलडिहाईड गॅस निघतो ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. केस मुलायम करण्यासाठी काही उत्पादनांमध्ये फॉर्मलडिहाईड गॅस निघतो. फ्लॅट आयर्न आणि ब्लो ड्रायर्स मध्ये हा गॅस असतो. त्यामुळे सतत केल स्ट्रेटनिंग केल्यास त्वचा, डोळे, नाक आणि फुफ्फुसात जळजळ होते. यातील काही हानीकारक रसायनांमुळे कर्करोगही होऊ शकतो.

मूळ पोत-

एकदा स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसाचा मूळ पोत हरवतो. ते पुन्हा पुर्वीसारखे होत नाहीत. सतत हॉट आयर्नचा वापर केल्याने केसांचा मूळ पोत कायमस्वरुपी बदलून जातो. केस सरळसोट होतात मात्र योग्य काळजी न घेतल्यास ते वाईट दिसतात. शिवाय केसाची कोणतीही रचना करताना सरळ केसावर जी योग्य दिसेल तीच करावी लागते. अन्यथा केस खूप वाईट दिसतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon