Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला यांवर देण्यात येणाऱ्या लसीबद्दल जाणून घ्या.


डिटीपीची लस हि घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या आजारांसाठी दिली जाते. हे तीन गंभीर आजार वेगवेगळ्या जिवाणूंमुळे होतात. यापैकी घटसर्प आणि डांग्या खोकला हे एका व्यक्ती कडून दुसऱ्याला संसर्गातून पसरू शकतात, आपल्याला जर का कापले असेल किंवा एखादी बरी न झालेल्या जखमेतून धनुर्वात पसरू शकतो.

घटसर्पामुळे सूज येते आणि याची जाडी प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असू शकते.यामुळे हृदय बंद पडणे, अर्धांगवायू किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या किंवा मृत्यू सुद्धा येऊ शकतो. धनुर्वात मध्ये संपूर्ण शरीराचे स्नायू आखडून जातात. यात त्या व्यक्तीचा जबडा असा आखडतो की, त्या व्यक्तीला तोंड उघडता येत नाही किंवा काही गिळता सुद्धा येत नाही. डांग्या खोकल्यामध्ये सारखी खोकल्याची जोरात ढास लागते जी सहन होत नाही आणि हा खोकला कित्येक आठवडे तसाच राहतो. यामुळे त्या व्यक्तीला न्युमोनिया, झटके किंवा त्यांचा मेंदूला दुखापत होऊ शकते.

डिटीपीची लस आपल्या बाळाचे या भयानक आजारांपासून प्रतिकार करते. काही ठिकाणी या लसीला डिटीएपीची लस असे म्हणतात. ही डिटीएपीची लस जुन्या डिटीपी लसीपेक्षा जास्ती सुरक्षित आहे. ही लस आपल्या बाळाचे संपूर्ण बालपणात संरक्षण करते. अगदी दुसऱ्या महिन्या पासून ते ६ वर्षां पर्यंत पाल्याला याचे पाच डोस दिले जातात.

डिटीएपीची लस दिल्यानंतर अगदी थोडा ताप किंवा काही मुलांमध्ये गंभीर ऍलर्जी सुद्धा बघायला मिळते. ताप येणे हे अगदी स्वाभाविक मानले जाते, पण जर का ऍलर्जी येत असेल तर मात्र तुम्हाला त्याकडे थोडे जास्ती लक्ष द्यायला हवे. अश्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे. या लसीमुळे इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात जसे की, लालसरपणा, सूज किंवा जिकडे ही लस टोचली आहे तिकडे वेदना होणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे किंवा उलट्या होणे असे होऊ शकते. पहिल्या काही मात्रेपेक्षा नंतर दिली जाणारी मात्रा ही अधिक तीव्र असते. जर का तुमच्या पाल्याला कोणता गंभीर आजार असेल तर ही लस देऊ नका, किरकोळ आजारपणात दिलेली चालते. जर पहिल्याच मात्रे नंतर तुमच्या बाळाला काही ऍलर्जी दिसत असेल तर पुढची मात्रा देऊ नका. तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि दुसऱ्या कुठल्या मार्गातून ही लस देता येते का हे बघा. सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हि डिटीएपीची लस दिली जाते. या पेक्षा मोठ्या मुलांना आणि प्रौढांना याची पर्यायी लस दिली जाते.ही लस दिल्यानंतर याची वेदना किंवा ताप आला असेल तर तो कमी करण्यासाठी आपण त्यांना ऍस्पिरिन देऊ शकतो.

ही लस बऱ्याच देशांत विनामूल्य आहे, पण काही देशांत मात्र याची अगदी किरकोळ किंमत भरावी लागते. या लसीबद्दल अधिक माहित हवी असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारा किंवा राज्याच्या शासकीय खात्याच्या संकेतस्थळावर मिळू शकते. या बद्दलची माहिती इंटरनेट वर पण उपलब्ध आहे फक्त आपण ज्या संकेतस्थळावर ही बातमी वाचतो आहोत ते खात्रीशीर आहे याची शहानिशा करून घ्या.

जर का ही लस दिल्यानंतर तुमच्या पाल्याला खूप गंभीर प्रतिक्रिया दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा. सरकारी दवाखान्यातील वैद्यक अधिकारी यांना देखील कळेल की, या लसीमुळे कश्या प्रकारच्या ऍलर्जी येऊ शकतात. काही देशांमध्ये विशिष्ट लसीने जखमी झालेल्यांना भरपाई देण्यासाठी भरपाई कार्यक्रम देखील आहेत.

या लसीचे काही दुष्परिणाम आहेत पण त्यापेक्षा जास्ती फायदेच आहेत. हे आपल्या पाल्यासाठी खूप चांगले आहे कारण यामुळे त्यांचे प्रदिर्घ काळासाठी निरनिराळ्या घातक आजारानं पासून संरक्षण होते. नेहमी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा आणि बाकी सगळी खबरदारी घ्या.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon