Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

८० वर्षे वयाच्या मुलाची काळजी घेण्यासाठी ९८ वर्षच्या आईने काय केलं पहा...

ज्या जगात अनेक पालक त्यांची लहान बाळे सोडून देतात; त्या जगातील खरोखर सुंदर क्षण म्हणजे ९८ वर्षे वयाची इडा किटनने आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्याच्या वृद्धाश्रमात प्रवेश घेतला!

टॉम किटिंग आणि त्याची आई इडा किटन मध्ये एक विशेष नाते आहे. त्याने कधीच लग्न केले नाही आणि त्याच्या जन्मापासून तो आपल्या आईसोबतच राहिला. अद्यापही तो सकाळी आपल्या आईच्या मधुर हास्याने आणि 'गुड मॉर्निंग' ने जागा होतो. झोपण्याअगोदर एकमेकांना 'शुभ रात्रि' म्हणणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यांच्यातील कोणीही कधी बाहेर गेले की, दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीची येण्याची आतुरतेने वाट पाहते आणि एका घट्ट मिठीने त्यांचे घरात स्वागत करते. टॉम सांगतो की, अजूनही इडा त्याला नीट वागण्यास सांगते! 'तिने कधी आई बनण्याचे थांबवलेच नाही' असे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळते. इडा आणि तिच्या कै. पतीला चार अपत्ये आहेत- टॉम, बार्बरा, मार्गी आणि जॅनेट. आणि हे सर्व घर आणि नर्सिंग होमला नेमाने भेट देतात.

२०१६ मध्ये टॉम किटिंगने लिव्हरपूल मधील 'मॉस व्ह्यू केअर होम' चा आसरा घेतला; कारण त्याला विशेष काळजी आणि आधाराची गरज होती. एकाच वर्षात इडाने देखील त्याच वृद्धाश्रमात प्रवेश घेतला. मुलापासून विलग होणे तिला सहनच झाले नाही. टॉम आणि इडामधील घनिष्ट नाते पाहून त्या वृद्धाश्रमातील बाकी सदस्यांचे मन भरून आले. आई आणि तिचे मुल, विशेषतः जे एकमेकांपासून अलग होऊ शकत नाही, अशांना एकाच केअर होममध्ये राहताना पाहणे हे दुर्मिळ असते!

परिवारातील बाकी लहान सदस्य, त्यांचे जोडीदार आणि नातवंडे या दोघांना परत एकत्र पाहून अतिशय आनंदात आहेत. "आता जगात सर्व सुरळीत चालु आहे" असे ते म्हणतात!

ते एकत्र खेळतात, एकत्र टीव्ही पाहतात, एकत्र वाचन करतात आणि त्यांना एकमेकांचा कधीही कंटाळा येत नाही! त्याची काळजी घेण्यामध्ये ती अतिशय प्रवीण आहे आणि या वृद्धावस्थेतदेखील त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टींची ती काळजी घेते. आईचा अधिक सहवास मिळाल्यामुळे टॉम अगदी खुशीत आहे आणि केअर होम देखील या आई-मुलाच्या जोडीचा व्यतीत होणारा वेळ चांगला जावा यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे.

छायाचित्र सौजन्य- डेली मेल

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon