Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

सौंदर्यसाठी या सात गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील

प्रत्येक स्त्री दररोज निरोगी व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्नशील असते. पण एक जबाबदार आई म्हणून तुमच्या डोक्यावर बऱ्याच चिंता घोंगावत असतात ज्या एकाचवेळी सोडविणे कधी-कधी गरजेचे असते आणि म्हणूनच,​ ​तुमच्या प्राधान्यक्रमात केसांची आणि त्वचेची नियमित काळजी घेणे हे चवथ्या क्रमांकावर असते. आज या ब्लॉगमध्ये काही एकदम सोपे आणि पटकन होणाऱ्या सौंदर्य जपण्यासाठी टिप्स देत आहोत.

गडद पापण्या आणि भुवयांसाठी 

 कोणतीही जुनी मस्काराची बाटली घ्या ती स्वच्छ धुवा.ती बाटली 'ई' जीवनसत्वांनी युक्त अशा एरंडेल तेल आणि कोरफडीच्या गराने भरावी. हे प्रमाण एक द्वितीयांश आणि एक चतुर्थांश असे असावे. हे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित ढवळावे. आता मस्कारा ब्रशनी आयब्रो आणि पापण्यांना लावावे. असे दररोज किमान महिनाभर नियमितपणे रात्री झोपताना लावावे. त्यानंतर आश्चर्यकारक बदल पहा. तुमच्या पापण्या एकदम झुपकेदार आणि भुवया दाट झालेल्या असतील.

डोळ्याखालील काळी वर्तुळे 

 तुमच्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर कॉफी हा एक परिपूर्ण उपाय आहे. कॉफी उकळल्यानंतरचा चोथा किंवा कॉफीच्या बिया एकास एक प्रमाण घेऊन नारळाचे तेल मिसळा.​ ​यांची बारीक पेस्ट करून डोळ्यांखाली लावा. हे मिश्रण किमान पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे. चेहरा धुतल्यानंतर त्वचेवरील आश्चर्यकारक परिणाम पहा. चांगल्या परिणामांसाठी साधारणपणे आठवड्यातून तीन-चारवेळा लावावे.

​चमकदार आणि सिल्की केसांसाठी 

तुम्हाला जर निर्जीव केस आणि कोरड्या केसांपासून सुटका करून घेयची असेल ता त्यावर एक जालीम उपाय आहे. शाम्पूमध्ये दोन-तीन चमचे साधे मीठ आणि थोडे काळे मीठ घालावे. या मिश्रणाने केस धुवाण्यापूर्वी चार मिनिटे केसांच्या मुळाशी मसाज करावा. त्यानंतर तीन ते चार मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत.

 निरोगी नखांसाठी

 एकास एक अशा प्रमाणात नारळाचे तेल आणि मध घेऊन एक-दोन थेंब ​लव्हेंडरचे तेल ​घालून मिश्रण एकजीव करा. तुमची नखे सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मदत होईल. हे मिश्रण तुम्ही नेलपेंटच्या ब्रशने नखांवर लावू शकता

 पायांच्या भेगा 

पायांच्या भेगांवर एकच महत्वाचा घरगुती उपाय म्हणजे 'फूट स्पा'. आपल्याला पाण्यात थोडा वेळ पाय बुडवून बसायचे आहे. हे पाणी थोडे गरम असावे आणि त्यात एक द्वितीयांश कप ​खायचा सोडा ​आणि व्हिनेगर मिक्स करावा. असे पंधरा मिनिटे करावे. त्यानंतर पाय मऊ टॉवेलने पुसावे. पायाला क्रीम लावून स्पा पूर्ण करावा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon