Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

२६ व्या आठवड्यामध्ये किती महिन्याची गरोदर असते ?


२६ व्या आठवड्यात तुम्ही ५ महिने ३ आठवड्याचे गरोदर असतात. तुम्हाला २ आठवडे बाकी आहेत त्यानंतर तुम्ही सहा महिन्याच्या गर्भवती होणार. आता तुमचे बाळ एक जीव म्हणून वाढायला लागते. आणि आता पहिल्यापेक्षा गोष्ट जास्त वेगाने वाढायला आणि व्हायला लागतात. तेव्हा आता तुम्हाला थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल आणि ती कोणती काळजी आहे ह्याचा धांडोळा किंवा उपयुक्त अशा टिप्स देणार आहोत.

२६ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची साईझ काय असते ?

हा सामान्य प्रश्न आहे प्रत्येक आईला पडलेला असतो आणि त्यांना जाणून घ्यायचे असते. माझे बाळ आता किती मोठे झाले असेल. ह्या वेळी बाळाचा आकार हा १४.०१ इंच आणि ३५. सेंटीमीटर असतो. आणि बाळाचे वजन हे ७६० ग्राम असते.

आता तुमच्या बाळाची अशी वाढ झालीय का ? ते तुम्ही जाणून घ्या.

आता २६ व्या आठवड्यात बाळाची वाढ गर्भात कशी होते ते जाणून घ्या. बाळाच्या झोपेच्या पॅटर्न मध्ये रात्री बदल होऊन तो रात्री जागा राहतो.

 

गर्भाची वाढ २६ व्या आठवडयात ह्या दिवसामध्ये बाळाचे पावले, आणि पंचेस जास्तच ठसठशीतपणे जाणवायला लागतात.

२६ व्या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणते लक्षणे जाणवतील ?

ह्या ठिकाणी काही लक्षणे दिली आहेत कदाचित तुम्हाला ह्याप्रकारे येतील

१) झोपेत अडथळा येणे

ह्या वेळेला रात्री खूप गाढ झोप घेणे खूप अशक्य होऊन जाते. ह्यासाठी हळुवार व्यायाम करणे आणि जास्तीची उशी घेणे तुम्हाला रात्री झोप मिळवून देतील.

२) सूज

ह्या दिवसात हातापायाला सूज येते बऱ्याचदा हे खूप शरीरात खूपच पाणी धरून ठेवल्यामुळे होत असते. आणि खूपच सूज असेल आणि लवकर जात नसेल तर प्रीक्लीम्पशिया असू शकतो म्हणून त्यासाठी डॉक्टरांची अवश्य भेट घ्या.

३) डोकेदुखी/ मायग्रेन

डोकेदुखी मुखत्वे हार्मोनल बदलामुळे आणि अति चिंता करण्यामुळे होत असते. ह्यासाठी तुम्ही योगा आणि ध्यान करायलाच हवे ह्यामुळे तुमच्या बाळालाही खूप फायदा होतो आणि डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा ह्याचा फायदा होतो. शरीराला स्ट्रेंथ मिळते. आणि तुम्हाला जर वेगळे काही करायचे असेल तर तुम्ही ऍक्युपंक्चर किंवा शरीराच्या साध्या हालचाली करू शकता. आणि मायग्रेन साठी प्राणायाम आणि ध्यान करा.

४) विसरभोळे होणे

ह्या दिवसात खूपच हार्मोनल बदल होत असतो. ह्याचा परिणाम तुमच्या मेमरीवर पडतो. आणि तुम्ही विसरभोळे होतात. ह्यासाठी वाटल्यास वहीत लिहून ठेवत जा. किंवा कमी प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करून समस्या सोडवा.

५) ब्रुक्सटॉन हिक्स काँट्रॅकशन्स

काही गरोदर स्त्रियांना जर पोटात काही त्रास होत असेल किंवा आताच बाळ जन्माला येईल की काय ? असे वाटत असेल. आणि खूपच वेदना होत असतील. तेव्हा डॉक्टरांना लगेच संपर्क साधा. प्रसुतीपूर्व लेबर टर्म सुद्धा असू शकतो.

६) उच्च रक्तदाब

बऱ्याचदा रक्तदाब खूप वाढून जातो आणि तुम्ही त्यावेळी फक्त रक्तदाबच समजत असतात. पण लक्षात घ्या हे प्रीक्लीम्पशियाची सुद्धा लक्षणे असू शकतात.

७) दुखणे किंवा खाज येणे

जशी जशी गर्भाची वाढ होते तशी त्वचा ताणली जाते म्हणून इचिंग येते.

८) गॅसची समस्या

वाढणारे गर्भाशय हे पोटाला बाहेर ढकलत असते. आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्स गॅसच्या स्नायूंना रिलॅक्स करतात त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि तुम्हाला गॅसची समस्या निर्मण होते.

९) खूप वजन किंवा ओझं झाल्यासारखे वाटते 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon