Link copied!
Sign in / Sign up
44
Shares

हळदीचे फायदे : आरोग्यविषयक, सौंदर्यविषयक आणि इतर

हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्याला हळद म्हणून परिचयाची आहे. या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. या हळदीचे विविध उपयोग आणि आरोग्यविषयक फायदे आपण जाणून घेऊया

१. आहारातील हळदीचे फायदे

२. दूध-हळद फायदे

३. हळदीचे इतर घटकांबरोबरचे आरोग्यविषयक फायदे

४. हळदीचे सौंदर्यविषयक फायदे

५. झोपे संदर्भात हळदीचे फायदे

६. रोगप्राकारक आणि जंतुनाशक म्हणून हळदीचे फायदे

१. आहारातील हळदीचे फायदे

अ)गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी आणि,गर्भाशयाची ताकद वाढावी, आणि गरोदरपणानंतर जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी बाळंतिणीच्या आहारात हळदीचा समावेश असावा.

ब ) बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत बाळंतिणीला हळदीचे सेवन करावे (यासाठी दूध-हळद उत्तम तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

क)कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असता दोन आठवड्यांसाठी अर्धा चमचा हळद तुपाबरोबर सेवन करण्याची पद्धत आहे.

ड) भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर ओली हळद, आले, लिंबाचा रस व मीठ घालून केलेले लोणचे खाण्याचा उपयोग होतो.

हळद ही जंतुनाशक असते. हळद आणि दुधाचा विविध प्रकारे विविध आजारांवर उपयोग होतो हळद आणि दूध हे काही आजारांमध्ये आणि समस्यांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते आणि काही समस्यांच्या बाबतीत हळदीचा गुण इअर औषधांपेक्षा लवकर येतो. हळदीचे दूध कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते ते आपण पाहणार आहोत

२. दूध-हळद फायदे

अ) शरीरातील कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. कोणताही प्रकारच्या वेदना होत असतील किंवा मुकामार लागला असेल तर दूध-हळद घेतल्याने फायदा होतो'

ब ) हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेबाबत त्वचेच्या खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. तसेच त्वचेत एक चमक निर्माण होते.

क) सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो.

ड) दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

हळद दुधाच्या फायद्याविषयी अधिक जाणून घ्या

टीप-अतिप्रमाणात हळद दूध प्यायल्याने  आरोग्यविषयक काही समस्या देखील निर्माण होतात त्यामुळे प्रमाणात प्यावे विशेषतः ऍलर्जी किंवा पोटाची समस्या असणाऱ्यांनी आणि गर्भवती स्त्रियांनी अति प्रमाणांत हळद -दूध पिऊ नये थोड्य प्रमाणात चालेल  

३. हळदीचे इतर घटकांबरोबरचे आरोग्यविषयक फायदे

अ) हळद आणि गूळ यांच्या गोळ्या करून झोपताना घ्यावी आणि कोमट पाणी प्यावे त्यामुळे खोकला कमी होऊन खोकल्याची ढास कमी होतो.

ब ) शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायल्यास . हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.

क ) तसेच सर्दी- खोकला झाल्यावर देखील हळद आणि मध उपयुक्त ठरते.

४. हळदीचे सौंदर्यविषयक फायदे

अ) चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्वचा होईल.

ब) चमचाभर मधात हळद आणि दूध घालून ओलसर पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचा पोट सुधारतो, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा टोन समान होतो.

क ) ब्लॅक हेड्सची समस्या कमी होण्यासाठी कोथिंबिरी काही पाने मिक्सर मधून काढा त्यात दोन चमचे हळद घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. चेहरा, नाक, हनुवटी, कपाळ यावर झोपण्यापूर्वी लावा आणि वाळल्यावर धुवा.

ड) तीन चमचे डाळीच्या म्हणजेच बेसनात १ चमचा हळद घालून त्यात गुलाबपाणी किंवा साधे पाणी घालून फेसपॅक बनवा आणि हा फेस पॅक आठवड्यतून एकदा लावत जा चेहऱ्याचे सौंदर्य टिकेल आणि

चेहरा उजळेल

५. झोपेविषयक फायदे

शांत झोप न येणे ही सध्याची अनेकांची समस्या आहे . पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.(शक्यतो जेवणात दही किंवा आंबट पदार्थ खाल्लेला नसावा).

रोगप्रतिकारक शक्ती

हळदीमधील घटकामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती वाढते

मासिकपाळी दरम्यान हळदीचे पाणी किंवा दूध घेतल्याने येणारे क्रम्प्स कमी होतात.

शरीरावर कुठेही मुका मार लागला किंवा एखादा शरीरभाग मुरगाळला व त्या ठिकाणी सूज आली तर हळकुंड व आंबेहळद उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावण्याने लगेच बरे वाटते.

इतर फायदे

रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्यास अतिरिक्‍त चरबीचे प्रमाण घटण्यास मदत मिळते. त्वचारोगांमुळे जेव्हा असह्य कंड सुटते तेव्हा हळकुंड खोबरेल तेलात उगाळून त्याचा लेप करण्याने बरे वाटते.

जिभेला चव नसेल, तोंडाला वास येत असेल, तोंडात चिकटा जाणवत असेल तेव्हा हळकुंडाच्या काढ्याने तोंडात चूळ १० मिनिटांसाठी धरून ठेवण्याने उपयोग होतो.

हळदीमध्ये सूज कमी करण्याचे गुण असल्याने सांधे दुखीमध्ये हळद उपयुक्त ठरते

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon