Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

सॅलड रेसिपीज भाग-२ : प्रोटीनयुक्त सॅलड

प्रोटीन सॅलड .

आता आपण काही वेजीटेरीअन सॅलड स पाहू ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असेल.

मोड आलेल्या मुगाचे सॅलड .

साहित्य

 २ कप मोड आलेले मुग, १ टमाटा, १ कांदा, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा चाट मसाला, हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरती काळीमिरी पावडर.

कृती

मोड आलेले मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यांना सकाळी वाफवून किंवा उकळून घ्या जेणेकरून ते पूर्ण शिजतील. मुगातले पाणी काढून टाका. या मुगात चिरलेला कांदा, चिरलेला टमाटा आणि हिरवी मिरची बारीक करून घाला. वरतून लिंबू पिळून घ्या. गरजेनुसार चाट मसाला आणि मीठ घाला. वरून काळीमिरी पावडर स्प्रीनकल करा. हे मिश्रण चांगले हलवून घ्या.

राजमाचे सॅलड

साहित्य 

२ कप राजमा, २ मध्यम आकाराचे टमाटे, १ कांदा, २ चमचे लिंबाचा रस, १ मध्यम आकाराची सिमला मिरची, २ चमचे आॅलिव्ह ओईल, १ कैरी (ऑप्शनल) १ चमचा मध (ऑप्शनल), ३ चमचे कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, मीठ आणि काळीमिरी पावडर.

कृती

टमाटे, कांदा, हिरव्या मिरच्या ,सिमला मिरची, कैरी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

राजमाच्या बिया नरम होण्यासाठी पाण्यात उकळून घ्या. कैरीचा गर काढून घ्या. (ऑप्शनल) यात लिंबाचा रस आणि राजमाच्या बिया टाका. एका बाउल मध्ये हे काढून त्यावर आॅलिव्ह ओईल, कोथिंबीर, चिरलेला टमाटा, कांदा, सिमला मिरची टाकून ड्रेसिंग करा. हे सॅलड थंडच सर्व्ह करा.

राजमा ऐवजी तुम्ही दुसऱ्या पर्यायाचा वापर करू शकता जसे, हरभरा.

चण्याचे  सॅलड .

पाण्यात उकळून घेतलेले चणे हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. याने वजन कमी होण्यास मदत होते.

साहित्य 

१ कप चणे, १ सिमला मिरची, १ टमाटा, ३-५ लसणाच्या पाकळ्या, २-३ चमचे आॅलिव्ह ओईल, २ लाल मिरच्या , २ चमचे लिंबाचा रस, चवीपुरते मीठ.

कृती : 

१.चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. या चण्यांना सकाळी मिठाच्या पाण्यात उकळून घ्या.

२. सिमला मिरची आणि टमाटे बारीक कापून घ्या.

३. एक पॅन मध्ये १-२ चमचे आॅलिव्ह आॅईल टाका. यात लसणाच्या पाकळ्या टाकून त्यांना थोडे हलकेच तेलात टाळून घ्या.

४. यात टमाटे आणि सिमला मिरचीचे काप टाकून परत मिश्रण हलवून घ्या.

५. या मिश्रणात चणे टाकून वरून मीठ घाला. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्या.

६. हे सॅलड तुम्ही सर्व्ह करू शकता. चवीसाठी वरून लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता.

या सॅलड मध्ये चण्यांच्या ऐवजी तुम्ही दुसरे कडधान्य सुद्धा वापरू शकता.

व्हेजिटेबल रायता आणि लो फॅट दही.

भारतीयांद्वारे रोजच्या जेवणात वापरला जाणारा अजून एक महत्वाचा पदार्थ म्हणजे दही. दह्यात देखील प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. तुम्ही दह्याचा वापर रोजच्या जेवणात केल्यास त्याचे अनेक फायदे होतील. ज्यांना वजन कमी करण्याची चिंता आहे ते हे सॅलड बनवू शकतात कारण यात लो फॅट दह्याचा वापर करून व्हेजिटेबल रायता बनवला आहे.

 

साहित्य

१ कप लो फॅट दही, १ सिमला मिरची, १ गजर, १ काकडी, १ टमाटा, १ कांदा, १/४ चमचा काळीमिरी पावडर, १/२ चमचा भाजलेले जिरे पावडर आणि चवीपुरते मीठ.

कृती : 

सिमला मिरची, गाजर, टमाटा, काकडी, कांदा हे सर्व बारीक कापून घ्या. यात लो फॅट दही तुमच्या आवडीनुसार टाकून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. यात वरून चवीपुरते मीठ आणि काळीमिरी पावडर स्प्रिंकल करा. भाजलेल्या जिर्-याची पूड सर्व्ह करतांना वरून टाका.

तुम्ही सॅलड मध्ये घरगुती पदार्थ वापरून सुद्धा ड्रेसिंग करू शकता. जसे की , काळी मिरी, मीठ सोबत तुम्ही लिंबाचा रस चटपटीत चव आणण्यासाठी टाकू शकता. लाल मिरची पूड चयापचाय क्रिया वाढवते, आॅलिव्ह आॅईल हे आरोग्यासाठी चांगले असते. लिंबाच्या रसाने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते.

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon