Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

वॅक्सिंगच्या वेळी वेदना कमी होण्यासाठी काही टिप्स

मासिक पाळीमध्ये व्हॅक्सिंग टाळा

मासिक पाळीच्या काळात ओटीपोट, पाय दुखत असतात. त्या काळात वॅक्सिंग करताना वेदना जास्त होऊ शकतात. त्यावेळी स्त्रीच्या शरीरात स्रवणारे एस्ट्रोजेन नावाचे स्त्री हार्मोनमुळे शरीर अधिक संवेदनशील होते त्यामुळे शारिरीक वेदनांप्रती शरीर संवेदनशील असते.

मासिक पाळीच्या काळात एस्ट्रोजेनची पातळी उंचावलेली असते. संवदेनशीलतेमुळे वेदना सहन होत नाहीत. त्यामुळे पाळीच्या काळात वॅक्सिंगसाठी पार्लरला भेट न दिलेली बरी.

हे करून पहा

 

घरच्या घरी वॅक्सिंगसाठी वॅक्स तयार करता येते. एक कप साखर आणि १ कप मध, अर्ध्या लिंबाचा  रस आणि टी ट्री तेलाचे काही थेंब त्यामध्ये घालावेत. हे सर्व गरम करून वॅक्स तयार होते. ते त्वचेवर पातळ लावून कापडाच्या पट्टी लावून केस ओढू शकता.

एक्फॉलिएट आणि मॉश्चराईज

शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते पण त्याआधी एक्सफॉलिएट  करणे आवश्यक असते. त्यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते असे मानले जाते. त्यामुळे अंतर्गत वाढलेले केस निघतात त्यामुळे वॅक्सिंगची प्रक्रिया वेदनादायक असते. पण वॅक्सिंगच्या आधी ही प्रक्रिया टाळावी. त्याऐवजी वॅक्सिंग करण्याआधी २४ तास ही प्रक्रिया करून घ्यावी.

त्याशिवाय त्वचा कोरडी, रखरखीत असेल तर वॅक्सिंग करताना त्वचेची जळजळ होते. त्यामुळे अंघोळीनंतर पायाला थोडे मॉश्चरायझर लावावे. पण एक्सफॉलिएशन करून घेणार असाल तर वॅक्सिंग करण्यापुर्वी तसे न करता वॅक्सिंग करण्यापुर्वी काही तास आधी त्वचेला मॉश्चरायझर लावावे.

संगीताची दवा

वॅक्सिंग करायला जाताना आपले हेडफोन्स बरोबर ठेवा. कारण कोणत्याही वेदनेपासून लक्ष विचलित करण्यासाठी संगीत किंवा गाणी ऐकण्याशिवाय उत्तम पर्याय नाही. त्यामुळे मन वेगळीकडे गुंतते आणि वेदना जाणवत नाहीत.

अर्थात फक्त गाणी ऐकणे हाच पर्याय आहे असे नाही तर आपण ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्ट ही ऐकू शकता. अर्थात त्यामुळे वेदना जाणवणार नाहीत किंवा वेदना अजिबात होणार नाही असे ठामपणे सांगता येत नाही.

वेदनामुक्त करणारे नियमित उपाय

वॅक्सिंग करताना खूप जास्त वेदना होत असतील तर वेदनाशामक क्रीमचा वापर करू शकता. वॅक्सिंग करण्यापुर्वी हे क्रीम ३० मिनिट आधी लावा.

त्याशिवाय काही वेदनाशामक गोळ्या म्हणजे आयबुप्रोफेन सारखी गोळी अर्धा तास आधी सेवन करु शकता. या दोन गोष्टींमुळे वेदना फारश्या जाणवणार नाहीत म्हणूया किंवा वॅक्सिंग करताना वेदना होणार नाहीत. अर्थात त्वचा अतिसंवेदनशील असेल तर मात्र असा गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

नियमित वॅक्सिंग करावे

मऊ त्वचा ही नियमित वॅक्सिंग करण्यासाठी प्रेरणा ठरु शकते. नियमित वॅक्सिंग केल्याने त्वचेवर येणारे केस कमकुवत होतात त्यामुळे वॅक्सिंगची प्रक्रिया सोपी आणि कमी वेदना देणारी ठरते. तसेच वेदना सहन करण्याची आपली क्षमताही वाढू शकते.

घरच्या घरी वॅक्सिंग करण्याचा प्रयत्न करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. केसाच्या वाढीच्या उलट दिशेने ते खेचले पाहिजेत. त्यामुळे वेदना कमी प्रमाणात होतात. पार्लरमध्ये गेल्यानंतरही तेथील कर्मचारी याच पद्धतीने वॅक्सिंग करताहेत ना याकडे लक्ष द्यावे.

वॅक्सिंग आधी कॅफेन टाळावे

ज्या दिवशी वॅक्सिंग करणार असाल त्यादिवशी सकाळची चहा किंवा कॉफी टाळलेलीच बरी. संशोधनानुसार कॅफेनमुळे वेदना सहन क़रण्याची क्षमता कमी होते. विशेषतः स्त्रियांमध्ये ती कमी होते.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार कॅफेन मुळे वेदना सहन करण्याची क्षमता कमी होतेच पण जेव्हा सुरुवातीला गरम वॅक्स लावले जाते ते देखील सहन करता येत नाही. अर्थात हे सर्व प्राथमिक स्तरावरील संशोधन, अभ्यास आहेत. अजूनही कॅफेन आणि वेदना सहन करण्याची क्षमता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट झालेले नाहीत.

 

 

 

 

त्याशिाय वॅक्सिंग करताना व्यावसायिक व्यक्तीची मदत घ्यावी. स्वतःच स्वतःचे वॅक्सिंग करणे हे कधीकधी वैताग आणणारे आणि वेदनादायीही ठरू शकते. कारण स्वतःच वॅक्सिंग करताना वेदनेच्या भीतीपोटी वॅक्सिंगची पट्टी नीट ओढली जाणार नाही. वॅक्सिंग अगदी नियमितपणे करत असाल किंवा प्रसंगोपात करत असाल वरील काही टिप्स वेदना कमी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon