Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

वयानुसार मुलांना या प्रकारे नैतिक मूल्यांची शिकवण

आपली मुलं ही भविष्यात सभ्य व्यक्ती म्हणून ओळखली जावीत, असं प्रत्येकालाच वाटतं. आपल्या पालकांनी आपल्यावर जे संस्कार केले, जी मुल्य आपल्यात रुजवली तसेच संसंक्रा आपल्याही मुलावर व्हावेत असं आपल्याला वाटतं असतं. नैतिकता ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे आपण योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखू शकतो. त्यामुळे योग्य गोष्ट ही नेहमी तेवढी सहज असेल असं नाही. त्यामुळे अशावेळी निर्णय घेत असताना आपण मुलभूत मुल्यांचा विचार करतो. मुल्य आणि नैतिकता ही काही दिवसांत शिकण्याची गोष्ट नाही. ती एक आयुष्यातील प्रक्रिया आहे.

१. बाल्यावस्था

लहान मुलांना ते आईच्या गर्भात असतात तेव्हापासून पोषक आहार दिला जातो. प्रतिसाद न देणे, भूख आणि एकाकीपणा या गोष्टींमुळे त्यांच्यात भीती निर्माण होते. जर त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले, योग्य पोषक आहार यामुळे प्रेमाची भावना तयार होते.

२. १ ते ३ वर्षांचे बाळ

या काळात बाळ नैतिक मुल्य शिकण्यास सुरूवात करते. या काळात तुम्ही बाळाला सर्व चांगल्या सवयी लावण्याचा, त्यांना चांगली मुल्य शिकवण्याचा प्रयत्न करायला हवा. इतरांची खेळणी त्यांनी घेऊ नये, कारण ती त्यांची या साध्या गोष्टीतूनही तुम्ही त्यांच्यावर संस्कार करू शकता. पण ते अजून खूप लहान आहेत, त्यामुळे ते नेहमीच तुम्हाला मदत करतील अशी अपेक्षा करू नका.

३. शाळेत जाण्यापुर्वी

या वयात मुल कुंटूंब आणि नातेसबंधाविषयीची मूल्य चांगल्या प्रकारे शिकू शकतात. या वयात ते शिस्त पाळण्याविषयीही शिकतात. तसेच त्यांच्या एखाद्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात हे त्यांना या वयात कळते. त्यामुळे या सर्व गोष्टींसंबधी त्यांच्यावर संस्कार करण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच या वयात मुलांच्या जास्त चुका न दाखवाता, त्यांना सकाराताम्क पद्धतीने काय योग्य आणि अयोग्य यातील फरक पटवून द्या.

४. मुलं 

या वयात मुल प्रत्येक गोष्टींवर प्रश्न विचारायला सुरूवात करतात. ते वयाने खूप मोटे असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रत्येक कृतीसाठी प्रश्न विचारतात. अशावेळी बरेच पालक अतार्किकपणे वागत ज्येष्ठांचा वय आणि अनुभव जास्त असल्यामुळे आदर करायला हवा असं सांगतात. तसं करू नका. त्याऐवजी त्यांना प्रत्येकाला समान वागणूक द्यावी, प्रत्येकाचा आदर करायला हवा, असं शिकवा. या वयात निष्पक्षता आणि लवचिकता या गोष्टींचे महत्त्व त्यांना पटवून द्या. 

५.  पौगंडावस्था 

पालक आणि पाल्याच्या नात्यातील हा सर्वात अवघड आणि महत्त्वाचा काळ आहे. तुमच्या प्रत्येक कृतीवर तुमच्या किशोरवयीन मुसाकडून प्रश्न विचारम्यात येणार आहे याची तयारी ठेवा. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार राहा. या काळात तुम्ही त्यांचे मन समाज आणि मानवजातीच्या कल्याणाच्या बाजूने वळवू शकता. त्यांच्याशी बोलताना, वागताना खूप संयम बाळगा. तसेच त्यांच्यावर जास्त रागावू नका. पण त्याचवेळी त्यांच्या चुका योग्य पद्धतीने समजावून देणंही महत्त्वाच आहे हेही विसरू नका.

नैतिक विकास ही एक खूप गुंतागुतीची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा. मानसशास्त्रज्ञांनी त्यावर अनेक सिद्धांत मांडले आहेत, ते तुम्ही इंटरनेटवर वाचू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांवर योग्य संस्कार करू शकत नाहीत असं वाटतं असेल तर वाईट वाटू देऊ नका. तुम्ही तुमच्या परीने पूर्ण प्रयत्न करा. समाज आणि बाहेरच वातावरण हेही तुमच्या बाळाच्या नैतिक विकासासाठी तेवढंच महत्त्वाच आहे.
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon