Link copied!
Sign in / Sign up
981
Shares

मराठी मुला-मुलींसाठी नवीन नावे 2018 ह्या वर्षासाठी


बाळाचा जन्म झाल्यावर आईला आणि कुटुंबाला सर्वात जास्त उत्सुकता असते की, आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे ? आणि आपल्याकडे बाळाचे नाव ठेवण्यासाठी कोणत्या साधूचा किंवा कुटुंब ज्या व्यक्तीला मानत असेल त्या व्यक्तीचा सल्ला घेतला जातो. पण आता काहीशी ही पद्धत बंद पडायला लागली आहे आता आई-वडील नाहीतर कुटुंबातीलच व्यक्ती नाव ठरवून मोकळे होतात. आणि नामकरणाला १६ संस्कारात स्थान आहे. शेक्सपियर नावाविषयी बोलला होता की, नावात काय आहे ? पण नाव म्हणजे बाळाची ओळख असते. तो मोठा झाल्यावर त्याच नावाने त्याचे कर्तृत्व सिद्ध होत असते. त्याच नावाने तो ओळखला जाऊन यश मिळवत असतो. आणि हेच नाव कागदोपत्री खूप महत्वाचे असते. हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे.

अशीच एक गोष्ट आहे. एका आईवडिलांना बाळाचे नाव ठेवायचे होते आणि त्यांना बाळाचे नाव असे पाहिजे होते की, ते नाव ह्या जगात कोणीच ठेवले नसेल. त्यासाठी त्यांनी खूप पुस्तके घेऊन ठेवली पण सारी पुस्तके वाचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, ही पुस्तके जर आपण वाचली असतील तर इतरांनीही वाचली असतील तेव्हा हे नाव त्यांच्याही बाळाला ठेवले असेल. मग त्यांनी साधू, ब्राम्हण, आणि गुरु असतील त्यांना भेटलेत आणि त्यांना दुर्मिळ आणि कोणीच न ठेवलेले नाव विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, पण ह्या ठिकाणीही एकच शंका, की ही सुद्धा नावे ठेवली असतील. ह्यांना आपल्यासारखे कित्येक लोक भेटत असतात तेव्हा हाही पर्याय त्यांनी सोडला. आणि शेवटी त्या वडिलांनी चिडून त्यांच्या पूर्वजांचे नाव ठेवले आणि त्यातून त्यांची पत्नी अजूनही नावाबाबत राग धरून आहे. तेव्हा tinystep मराठी तुम्हाला बाळाच्या जन्मापासून ते नाव ठेवण्याबाबत प्रत्येक बाबतीत मदतशील असू. 

नावे पुराणानुसार ठेवण्याची प्रथा

मराठी नावे ही मुखत्वे हिंदू पुराणानुसार( रामायण, महाभारत, इतर) संस्कृत नावे, लोकसहित्यामधून किंवा काही दंतकथा असतील त्यामधून घेत असायची. बरेच पालक संत व देवांची नावे द्यायची. महाराष्ट्रमध्ये संतांची नावे देण्याची चांगली परंपरा होती विशेषतः इतर राज्यात पालक योद्धयांची नावे द्यायची. पण आता कुणाचे नाव एकनाथ, जनार्दन, नवनाथ अशी कमीच ठेवायला लागली आहेत. त्याचे कारण कदाचित इतकी मोठे नावे ठेवायला अडचण वाटत असेल किंवा मॉडर्न ट्रेंड मुळे आता शॉर्ट आणि हटके नावे ठेवण्याचा ट्रेंड आहे.

बारसे - नावे राशीनुसार काढली जातात, तसे जन्माच्या बाराव्या दिवशी बारसे केले जाते आणि मुलींसाठी तेराव्या दिवशी बारसे केले जाते. पण हे सर्वच घरात आणि कुटुंबात केले जात नाही. काही कुटुंबात राशीनुसार एक बाराखडीतले अक्षर घेतले जाते आणि त्यानुसार आई -वडील त्या अक्षराचे नावे शोधतात. जसे की, राशीनुसार जर “प” हे नाव आले तर त्याचे नाव पूर्ण शोधणे, त्याचबरोबर अचूकपणे अक्षराचे नाव सापडत नसेल तर त्या अक्षराची व्याप्ती वाढवली जाते.

१) नावे पुराणानुसार ठेवण्याची प्रथा

२) नाव ठेवण्याबाबत चित्रपटाचा आधार

३) ऐतिहासिक नावे ठेवण्याचा नवीन ट्रेंड

४) काही गोष्टी ज्यांना आजही मानले जाते

५) तुम्हाला शिव वरून नाव ठेवायचे असेल तर

६) काही ट्रेंडिंग मिक्स नावे
नाव ठेवण्याबाबत चित्रपटाचा आधार

पण आता बरेच बदल झाले आहेत, आता प्रत्येक आईवडील स्वतःच नाव ठेवायला लागली आहेत. त्यासाठी ते कुणाकडेच जात नाहीत. आणि ते ही नाव आता, ट्रेंडी आणि मॉडर्न ठेवली जातात. चित्रपटातील नावे काही वेळा खूपच लोकप्रिय झाल्यावर तेच नाव ठेवले जाते. उदा. आशिकी - २ ह्या चित्रपटानंतर खूप मुलींची नावे “चित्रपटातील नायिकेचे नाव “आरोही” ठेवले गेले. शाहरुखच्या बऱ्याच चित्रपटात राहुल हे नाव होते तेच बऱ्याच मुलांना मिळाले. आणि सचिन तेंडुलकरवरती खूप प्रेम असल्याने बऱ्याच मुलांची नावे ‘सचिन’ ठेवली गेली.

ऐतिहासिक नावे ठेवण्याचा नवीन ट्रेंड

सध्या ‘वीर’ शौर्य, हिंदवी, स्वराज, असे नावे जास्त ठेवली जात आहेत. त्याला कदाचित ऐतिहासिक सिरियल्सची किनार असू शकते. उत्तर भारतात पृथ्वीराज हे नाव अजूनही ठेवले जाते. तर दक्षिण भारतात मुरुगन, चिदंबरम, अशी नावे असतात.

आणि आज पुन्हा हा ट्रेंड आलाय पण त्याला काहीसे शॉर्ट स्वरूप आलेय. केरळमध्ये खूप नावे ही मल्याळम भाषेतून आलेली असतात त्यात मग संस्कृत असू शकतात किंवा तामिळ सदृश, कारण मल्याळम ही भाषा संस्कृत आणि तामिळ मधून आलेली आहे.

तुम्हाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले असेल की, भारत इतका विविधता असलेला असूनही तामिळनाडू मधले नाव ही सेम मराठी वाटते. नंतर कन्नड मधली नावेही ही बिहारमध्ये दिसतात. विजय हे नाव उत्तर भारतीय तर दक्षिण भारतीय असे पोहोचले आहे. आणि ही नावे सर्व भारतात एकच असल्याने आपल्याला सर्वच भारतीय लोकांप्रती आत्मीयता वाटते. ह्याचे कारण आपले साहित्य व भाषा.

https://www.tinystep.in/blog/ya-varshatil-balasathichi-utkrusht-aashi-10-nave-marathi-name

मुलामुलींची नावे 

प्रशवी - प्रेमाची खूण, प्रेमाचे चिन्ह

प्रसंग - एकनिष्ठ असणे, खूप श्रद्धा असलेला

प्रसिद्धी - हा शब्द प्रत्येकालाच माहिती आहे, पण तुम्ही हे नावही ठेऊ शकता.

प्रकाशी - खूप हुशार असणारी

प्रेमन - आकंठ प्रेमात बुडालेला

रुजूल - स्वतःला सदैव सिद्ध करणारा आणि मृदू हृदयाचा

शुमी - प्रकाश आणणारी आणि चकाकणारी

वेदाक्षी - ज्ञानाचा प्रवाह, सर्व प्रकारचे ज्ञान स्वतःमध्ये विद्यमान असलेली

नकूशी - हे नाव महाराष्ट्राला चांगलेच परिचित झाले आहे कारण ज्यांना मुली नको असतात म्हणून ज्यांना मुली आवडतात त्यांनी हे नाव ठेवले आहे. आणि ह्या नावाची सिरीयल सुद्धा आली आहे.

वेदांगी - वेदाचेच रूप असलेले नाव, वेदाचे पूर्ण आकलन असलेली

मनवा - गोड आवाजाची असणारी आणि गोडवा पसरवणारी

नृपल - देशाला चालवणारी

अधीर - उगम, सुरुवात, ज्याचा उगम शून्यातून होता असा

याचन - प्रार्थना

यक्षीत - नित्य असणारा, कधीही नष्ट न होणारा असा

यथार्थ - सत्य, असत्य त्याच्याकडे नाहीच असा सत्यवान आणि योग्य असणारा

परुल - खूप आनंदी असणारी आणि सुखाचा झरा

पर्वणी - विशेष दिवस

केया - हे मुलींसाठी नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे.

काही गोष्टी ज्यांना आजही मानले जाते

जन्मदिवसापासून १०, ११, १२ आणि १३ व्या दिवशीच अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. नाहीतर तुम्ही शुभदिवशी, शुभमुहूर्तावर सुद्धा तुम्हाला नाव ठेवता येते. नाव ठेवण्यासाठी नक्षत्र, नक्षत्रांचे चक्र, त्याचबरोबर जन्मनक्षत्र वरून अक्षर घेता येते. आणि ते अक्षर घेऊन मुलाच्या उजव्या कानात आणि मुलीच्या डाव्या कानात सांगावे. त्याचवेळेस मंगल वाद्ये वाजवून स्वागत करावे. नावामध्ये ऋ,लृ हे स्वर किंवा अक्षर बिलकुल घेऊ नये. मुलांच्या नावात समसंख्यांक आणि स्त्रियांच्या नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा पूर्वापार नियम आणि परंपरा चालत आलेली आहे. आणि ह्याबाबत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता. की, परंपरे प्रमाणे नाव ठेवायची की, तुम्हाला वाटेल तसे नाव ठेवायची. पण सध्या वेळ कुणालाच नसल्याने ह्यात बराच बदल झालेला आहे. आता मंगल वाद्य काही वाजवली जात नाही. 

आदिवासी समाजात नाव कशी ठेवली जातात 

ह्या समाजात आता बराच बदल झाला आहे. पण काही डोंगर-दऱ्यात राहणारी लोक आजही नाव ठेवण्याचा बाबत जुनीच पद्धत अवलंबतात. म्हणजे त्यांच्याकडे कुणाचा जन्म झालाच तर सकाळी आईला उठल्यावर जे दिसेल त्यावरून नाव ठेवले जाते. जसे की, त्या आईने जर पण पाहिले तर त्याचे नाव 'पाण्या' ठेवले जाते. दगड पाहिला तर दगड्या. पण ह्यावरून ह्या समाजाला मागास समजू नका.   

आणखी नावे जाणून घेण्यासाठी ह्या ठिकाणी पाहू शकता. 
https://www.tinystep.in/blog/marathi-navin-nave

तुम्हाला शिव वरून नाव ठेवायचे असेल तर

शिवगामी - हे बाहुबळीमुळे प्रचंढ लोकप्रिय झालेले नाव. पण ह्याचा अर्थ असा आहे की, हे नाव शिवाचेच आहे.

शिवंती - शिवाचा भाग व शिवाची भक्त

शिवण्या - हे सुद्धा शिवाचेच एक रूप असलेले नाव आहे.

शिवाय - हे सुद्धा शिवाचेच नाव आहे.

देवांग, देवांश, दक्षेश - शिव

 

काही ट्रेंडिंग मिक्स नावे

आग्नेय - दिशा आणि ऐतिहासिकतेचा संगम

अजातशत्रू - नाव खूप मोठे पण अर्थ तसा मोठाच आहे.

कल्पक - ज्याच्याकडे कल्पनांचे भांडार आहे असा

आशय - अर्थ असलेला

गौरांग, गौरीश - गौरीचे दैवत

तरल - खूप सोज्वळ स्वभावाचा, स्वच्छ पाण्यासारखा निर्मल

निलज - पाण्यात राहणारे

मिहीर - सूर्य, हे संस्कृत नाव आहे. पुरातन काळी ह्या नावाचा बराच उल्लेख केला आहे.

पहल - नवीन सुरुवात

पाखी - जुने परिचित सुंदर नाव 

शिमीन - हे मल्याळम नाव आहे. 

काव्या - हे कावेरी नावापासून बनलेले आहे. 

ओविया - हे मुलींसाठी नवीन मॉडर्न नाव आहे.

यस्मिता - अस्मिता नावाला नवीन पर्याय.

अनन्या - हे बंगालमध्ये खूप लोकप्रिय आहे ह्याला ती लोक ओनन्या म्हणतात.

बिंदी - जुने पण छान आहे.

लिपी - हे सुद्धा नाव तुम्ही विचारात घेऊ शकता.

तुम्हाला तुमच्या बाळासबंधी कोणतीही अडचण आली तर @ tinystep मराठी वर भेट द्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon